कोरीवडे येथील विकास सेवा संस्थेचे ९० सभासद अपात्र : सहाय्यक निबंधक यांचा निर्णय…?
कोरीवडे(ता.आजरा) येथील महादेव विकास सेवा संस्थेचे ९० सभासद अपात्र असल्याचा आदेश अ सहाय्यक निबंधक एस.व्ही. पाटील यांनी दिला असल्याचे या प्रकरणातील तक्रारदारानी सांगितले. अपात्र ठरविण्यात आलेले सभासद हे कार्यक्षेत्रातील रहिवासी नसणे,कार्यक्षेत्रातील रहिवासी असून शेतकरी नसणे, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी व खातेदार शेतकरी नसणे, सभासद मयत असणे, सभासद यादीत दुबार नावे असणे अशा वेगवेगळ्या बाबींमुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले असल्याचा निर्णयही सहाय्यक निबंधकांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत नाना बाबू पाटील, सयाजी नार्वेकर, नेताजी पाटील, धनाजी चौगुले आदींनी सहायक निबंधकांकडे तक्रार करून दाद मागितली होती. तब्बल ९० सभासदांना अपात्र ठरवल्याच्या चर्चेमुळे या संस्थेमध्ये खळबळ माजली आहे.दरम्यान संस्थेचे अध्यक्ष दौलती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता असा कोणताही स्पष्ट निर्णय सहाय्यक निबंधकांनी दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजऱ्यात सतेज पाटील समर्थकांचा जल्लोष
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार आतषबाजी केली. कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच आजरा येथील टीम सतेज व पालकमंत्री पाटील यांच्या समर्थकांसह महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संभाजी चौक फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर,पं.स. सभापती उदय पवार, अनिरुद्ध रेडेकर, सुधिर देसाई, कॉ. संपत देसाई, नगरसेवक अभिषेक शिंपी नगरसेवक किरण कांबळे पं.स.सदस्य शिरिष देसाई, प्रकाश कांबळे, बशीर खेडेकर, कारखान्याचे माजी संचालक आनंदराव कुंभार, विटेचे सरपंच विलास पाटील, खानापुरचे सरपंच विश्वास जाधव, तालुका यांच्यासह आजरा शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आजरा साखर कारखान्यातर्फे ऊस विकास परिसंवादाचे आयोज
आजरा साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक बागायतदारांना तंत्रशुद्ध व शास्त्रीय पद्धतीने आधुनिक ऊस शेती संदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता सोमवार दि. २९ रोजी दुपारी बारा वाजता श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर सभागृहामध्ये ‘ऊस उत्पादकता वाढ’ या विषयावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी दिली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश बाळासाहेब माने-पाटील हे यावेळी मार्गदर्शन करणार असून तालुका कृषी अधिकारी के.एच.मोमीन व आजरा तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर मेळावा होणार आहे असेही प्रा.शिंत्रे यांनी सांगितले.
आजरा महाविद्यालयात संविधान दिन साजरा
आजरा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास कक्ष आणि ग्रंथालयाच्यावतीने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यार्थ्याना संविधानाप्रती आदर राखण्याची आणि त्याचे रक्षण करण्याची शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थी विकास कक्ष प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले. उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले यांनी संविधानिक मुल्यांविषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी आयक्युएसी प्रमुख डॉ. किरण पोतदार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. रणजित भादवणकर, ग्रंथपाल श्री. आर. एच आजगेकर, श्री. योगेश पाटील आणि इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थीत होते.
व्यंकटराव च्या शिक्षिकांचे यश
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पत संस्था कोल्हापूर.(को.जि.मा.शि.)अंतर्गत कोजीमा महीला सखी मंच च्या वतीने कोल्हापूर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, तसेच गायन स्पर्धेमध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज ,आजरा या प्रशालेतील शिक्षिका श्रीमती आशा कृष्णा गुरव, श्रीमती अस्मिता भीमराव पुंडपळ व सौ. वैशाली आनंदा वडवळेकर यांनी सहभाग घेऊन त्यामध्ये उज्वल यश संपादन केले.
श्रीमती गुरव यांनी गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक, पुंडपळ यांनी निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक व सौ. वडवळेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व शिक्षिकांना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य.. श्री. शिवाजी गुरव, पर्यवेक्षक श्री.सुरेशराव खोराटे यांचे प्रोत्साहन लाभले.
.


कोरीवडे येथील विकास सेवा संस्थेचे ९० सभासद अपात्र : सहाय्यक निबंधक यांचा निर्णय…?
आजऱ्यात सतेज पाटील समर्थकांचा जल्लोष
आजरा साखर कारखान्यातर्फे ऊस विकास परिसंवादाचे आयोज
आजरा महाविद्यालयात संविधान दिन साजरा
व्यंकटराव च्या शिक्षिकांचे यश