mrityunjaymahanews
अन्य

साळगाव येथे गव्याच्या धडकेत तरुण जखमी

आजरा:-प्रतिनिधी

साळगाव  मार्गावरील बंधा-यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर  गव्याच्या व मोटारसायकलच्या धडकेत पेरणोली येथील   संदिप निवृत्ती नावलकर (वय ३८) हा तरुण जखमी झाला  आहे. नावलकर हे सोमवार दि ८ रोजी सायंकाळी साडेसात वाजता आज-याच्या दिशेने  जात होते. यावेळी बंधाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर  सोहाळे मार्गाजवळ अचानक गवा आडवा आला. त्यामुळे त्यांचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने गव्याला  मोटारसायकल धडकली. यावेळी नावलकर खाली कोसळल्याने त्यांच्या तोंडाला व हाताला जखम झाली आहे. त्यांच्यावर तातडीने खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.         

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बुधवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मासेवाडी येथे तिघाविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शनिवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठलराव देसाई

mrityunjay mahanews
error: Content is protected !!