mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार दि.१८ सप्टेंबर २०२६

सरकारला नमवल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही – अंकुश कदम यांचा इशारा

आजरा : प्रतिनिधी

शिक्षणाची लढाई आजऱ्यातून सुरू झाली आहे, ही लढणाऱ्यांची भूमी आहे. महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या या भूमीतून ठिणगी पडलेले हे आंदोलन आता महाराष्ट्रव्यापी बनले आहे. शिक्षणाचा मुद्दा पहिल्यांदाच राजकीय मुद्दा बनला असून सरकारला नमवल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचचे नेते अंकुश कदम यांनी आजरा येथील शिक्षण हक्क परिषदेत दिला.

५ ऑक्टोबर २०२६ पासून आझाद मैदान, मुंबई येथे मंचच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर ही परिषद घेण्यात आली. मुंबईकर, गाववाले आणि स्थानिक पालकांनी मोठ्या संख्येने मुंबई आंदोलनात उतरण्याचा निर्धार केला.

सुरुवातीला कॉम्रेड संजय तरडेकर यांनी स्वागत करून हेतू स्पष्ट केला. प्रस्ताविकात राज्य निमंत्रक कॉ. संपत देसाई म्हणाले, गाव तिथे शाळा, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक, केजी टू पीजी समान दर्जाचे मोफत शिक्षण, एकही महाविद्यालय बंद होता कामा नये आणि शिक्षणावर किमान १०% खर्च झाला पाहिजे, या मागण्यांवर हे आंदोलन उभे आहे.

परिषदेत सुनील शिंदे म्हणाले, प्राथमिक शाळांप्रमाणे महाविद्यालयेही बंद होणार असून सरकारने यूजीसी बंद करून सुरुवात केली आहे. जी.प.चे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, लोकशाहीत शिक्षण व्यवस्था मोडली जाणे म्हणजे सर्वसामान्यांच्या शिकण्याच्या अधिकारावर बंधने आणण्यातला प्रकार आहे. या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, शिक्षक समन्वय समितीचे प्रकाश तिबिले, डॉ. नवनाथ शिंदे, राजू होलम, कॉ. शांताराम पाटील, पालक समितीचे संजय गुरव, शिक्षक समितीचे शिवाजी बोलके, माध्यमिकचे संजय देवेकर, शिक्षक संघाचे मायकल फर्नांडिस, बजरंग पुंडपळ, व्ही. डी. जाधव, दशरथ घुरे, यांनी मनोगते व्यक्त केली.

परिषदेला युवराज पोवार, नामदेव मोहिते, सुजाता पाटील, आनंदराव कुंभार, रामदास मोरवाडकर, गणपतराव शेटगे, संजय घाटगे, काशिनाथ मोरे, प्रकाश मोरुस्कर, इनास फर्नांडिस, संजय गुरव, सुभाष विभूते, सुनील कामत, श्रीधर देऊस्कर, रवी भाटले, नामदेव फगरे, सुरेश देशमुख यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल देसाई यांनी आभार मानले.

आजऱ्यात तबला व मृदंग वादन स्पर्धा उत्साहात : मोठ्या गटात सुमित गुरव तर लहान गटात ऋत्विक पाटील व समर्थ चौकुळकर प्रथम

आजरा : प्रतिनिधी

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने ) आयोजित तबला व मृदंग वादन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये चंदगड येथील सुमित ज्ञानेश्वर गुरव याने मोठ्या गटात तर ऋत्विक मनोहर पाटील व समर्थ बाबुराव चौकुळकर यांनी लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरुण भाई दुधवडकर सुनील शिंत्रे, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, उद्योजक बाळासाहेब नाईक, सभापती सौ. यशोदा पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, नगरसेवक अभिषेक शिंपी, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. स्पर्धेमध्ये एकूण ६२ स्पर्धकांनी भाग घेतला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे…

मोठा गट :
प्रथम क्रमांक सुमित ज्ञानेश्वर गुरव, द्वितीय क्रमांक वैभव रामा कुंभार, तृतीय क्रमांक अभिषेक मच्छिंद्रनाथ बुचडे, चतुर्थ क्रमांक करण कृष्णा धनवडे, पाचवा क्रमांक वैष्णवी दशरथ सावंत, सहावा क्रमांक संचित आबाजी पाटील, सातवा क्रमांक श्रिया भरत परीट

लहान गट :
प्रथम क्रमांक ऋत्विक मनोहर पाटील व समर्थ बाबुराव चौकुळकर (विभागून), द्वितीय क्रमांक अविष्कार संतोष हरेर,तृतीय क्रमांक सार्थक संजय मुळीक, चतुर्थ क्रमांक विहान रुपेश ढवळ, पाचवा क्रमांक प्रज्ञा महादेव पोटे, सहावा क्रमांक रुद्रस्वराज अमित ढवळ, सातवा क्रमांक राजवीर युवराज पोवार

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी अनिकेत चराटी, राजू होलम, शांताराम पाटील, रणजित देसाई, अजित खोत, संजूभाई सावंत, अमित गुरव, चंदर व्हरकटे, गटविकास अधिकारी सुभाष सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, शिवाजी आढाव, रोहित शेंडे, नारायण कांबळे, रवी सावंत, विजय डोंगरे, रोहित शेंडे,दिनेश कांबळे, प्रदीप पाचवडेकर, मायकल फर्नांडिस , महेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुंगूसवाडीत ‘एक गौरी, प्रत्येक घरात एक झाड’ उपक्रम

आजरा प्रतिनिधी :

गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोड देत आजरा तालुक्यातील मुंगूसवाडी येथील सिद्धिविनायक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने ‘एक गौरी, प्रत्येक घरात एक झाड’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे.

गौरी-गणपती पूजनाच्या परंपरेसोबतच प्रत्येक घराने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ‘एक गौरी घरात आणि एक झाड अंगणात’ या संकल्पनेतून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.

धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा मेळ घालणारा हा उपक्रम तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत असून, इतर गावांसाठीही आदर्शवत ठरला आहे.

प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहीम


आजरा: प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार ‘स्वछताही सेवा” या उपक्रमांतर्गत तहसिलदार कार्यालय आजरा ते ग्राम महसूल अधिकारी कार्यालयपर्यत सर्व कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली .

या मोहिमेमध्ये सर्व महसूल अधिकारी,कर्मचारी,मंडळ अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,महसूल सेवक यांनी सदर मोहिमेत वैयक्तीक सहभाग नोंदवला व.

गवसे येथे सेवा संकल्प अभियान शुभारंभ

गवसे : प्रतिनिधी

भारताचे माननीय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिनांक 1१७  ते दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दिनांक १७ सप्टेंबर, २०२६ रोजी ग्रामपंचायत गवसे, तालुका आजरा येथे सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ आजरा पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी श्री. सुभाष सावंत  यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मानवी साखळी करून आणि उपस्थित ग्रामस्थांना कापडी पिशव्या वाटप करून सदर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  अभियानाबाबत श्री. सुभाष सावंत, गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा यांनी उपस्थित ग्रामस्थांना सखोल माहिती दिली.तसेच तिन्ही अभियाने यशस्वीरित्या पार पाडणेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री. पुजारी, सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती आजरा, श्री. दिनेश शेटे, कृषी अधिकारी पंचायत समिती आजरा, श्री.बी टी कुंभार , विस्तार अधिकारी पंचायत समिती आजरा, आजरा तालुका संघाचे चेअरमन श्री महादेव हेब्बाळकर,माजी सरपंच सौ. रेखा पाटील,माजी उपसरपंच श्री यल्लाप्पा बागडी, श्री अविनाश हेब्बाळकर,सौ. शैलजा पाटील, श्री तातोबा पाटील, श्री विशाल दुंडगेकर ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आजचे पंचांग

आजचे पंचांग
दिनांक : १८ सप्टेंबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (दुपारी ०१.०० पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (रात्री १०.४४ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : प्रीति योग (दुपारी ०१.३४ पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०१.०० पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (रात्री १०.४४ पर्यंत) त्यानंतर धनु राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०१ ते दुपारी १२.३२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०८ ते दुपारी १२.५७
सूर्योदय : सकाळी ०६.२८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

गणेश दर्शन

बाजारपेठ मित्र मंडळ. उत्तुर 

अध्यक्ष : श्री. राहुल धुरे
उपाध्यक्ष : श्री. मंदार कोळेकर
सचिव : श्री प्रितेश पटेल
खजिनदार : कु. ओम धुरे

महादेव तरुण मंडळ,उत्तूर

अध्यक्ष : विनायक तानाजी कातोरे
उपाध्यक्ष : विनायक वसंत जवाहिरे
खजिनदार : रोहित जाणबा कुरुणकर
सचिव : सर्वेश आप्पासो जाधव
कार्यअध्यक्ष : अभिजित पांडुरंग सावंत

ज्योतिर्लिंग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ साळगाव 

अध्यक्ष : अनिल रामा पाटील                    उपाध्यक्ष : विलास लक्ष्मण दोरूगडे              सचिव : जयसिंग गोपाळ दोरूगडे

देवर्डे येथे रक्तदान शिबिर…

एकता सार्वजनिक गणेशोत्सव देवर्डे यांच्यावतीने अध्यक्ष रमेश गुंडू तेजम व उपाध्यक्ष महेंद्र दिनकर तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मारुती वामन चाळके यांच्या उपस्थितीत आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकूण २७ जणांनी रक्तदान केेले.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डॉ.अशोक फर्नांडिस यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीला पाच वर्षे पूर्ण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!