शुक्रवार दि. २६ डिसेंबर २०२५


दुध ऊत्पादनातून बेरोजगारांना स्थैर्य देवूया : सुधीर देसाई

आजरा तालुका दुध उत्पादनांत आघाडीवर येण्यासाठी परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेत कर्ज योजनांच्या माध्यमातून दुध संस्था व दुध ऊत्पादक शेतकरी बेरोजगार युवकाना स्थैर्य देऊया असे मत सिरसंगी येथील हनुमान दुध सभागृहात बोलताना जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यानी व्यक्त केले.
स्वागत कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई यानी केले. प्रास्ताविकात दुध संकलन अधिकारी एस. एम. कोले यानी दुध धंदा यशस्वी करण्यासाठी जातिवंत म्हैस खरेदीसाठी पन्नास हजार अनुदान बँकेचे दहा हजार अनूदान मिळत असून याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मेळावा आयोजित केलेचे सांगितले. बँकेचे विभागीय अधिकारी सुनिल दिवटे यानी म्हैस कर्ज, पिक कर्जासह विविध योजनाची माहीती दिली.
यावेळी तालुका संघाचे संचालक मधूकर यलगार, साखर कारखाना संचालक शिवाजी नांदवडेकर, विजय देसाई, बँक निरीक्षक आर. आर. देसाई, विजय सरदेसाई गोकूळचे सुपरवायजर डी. जी. होलम, व्हि. बी. चव्हाण, बि. टी. धुमाळ, विजय केसरकर याच्यासह दुध व विकास सेवा संस्था सचिव व पदाधिकारी उपस्थित होते. कारखाना संचालक दिगंबर देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुक्ताबाई आपगे यांचे निधन

कानोली गावचे सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत फौजदार अरविंद आपगे यांच्या आई मुक्ताबाई सखाराम आपगे वय (८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली,सुना, जावई ,नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.

वाटंगीची जान्हवी कांबळे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

तोडकर ॲकॅडमी गडहिंग्लज यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लहान गटाच्या वक्तृत्व स्पर्धेत वाटंगी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु जान्हवी विश्वास कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला . सुमारे ९९ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता . ॲकॅडमीचे प्रमुख महेश तोडकर यांचे हस्ते तिला १५०० रु . ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . सौ. स्नेहल पाटील .श्री . अर्जून हराडे, श्री पुंडलिक केसरकर, श्री .राम कुंभार, श्री. जयवंत शेवाळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले .
तिला श्रीमती रंजना हसुरे, श्री .विश्वास कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक श्री. सुनिल कामत, सौ.अनिता कुंभार श्रीम. अनुजा केने यांचे प्रोत्साहन लाभले .

रामानुज गणित प्राविण्य परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या श्रीनिवास रामानुज गणित प्राविण्य परीक्षेमध्ये पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथील इ.५ वी मधील कु .करण अमोल कुंभार, कु.साक्षी सागर कुंभार, कु. शरंण्या सुधीर कुंभार या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून प्राविण्य पात्र होऊन पुढील परीक्षेत पात्र झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना प्रकाश प्रभू ,विजय राजोपाध्ये तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले.

आज शहरात
आज शुक्रवार दि.२६ रोजी सकाळी ११:०० वा . कोकण विकास सोसायटी, पणजी व सामाजिक संवेदना संस्था, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल मॉर्निंग स्टार,आजरा येथे पंचायतराज प्रशिक्षण कार्यक्रमाचे ग्रामपंचायत सदस्य,महिला सदस्याचे पती, गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी आयोजन करण्यात आले आहे.

मोर्चे बांधणी पं.स. व जिल्हा परिषद निवडणुकांची…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महाजन गल्ली येथील जे.पी. नाईक पतसंस्थेच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल फडके यांनी दिली आहे.

विशेष सूचना…
मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.
यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी.
…मुख्य संपादक



