mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

मंगळवार  ११ नोव्हेंबर २०२५

एक आत्महत्या…एक विनयभंग…एक बेपत्ता

रोजगारासाठी आलेले

पर राज्यातील कामगार ठरत आहेत पोलिसांची डोकेदुखी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेल्या आठवडाभरात रोजगारासाठी आलेला
छत्तीसगड येथील पुरुषोत्तम गोड या कामगाराने हाजगोळी बुll. येथे केलेली गळफास घेऊन आत्महत्या, मध्य प्रदेशातील निकिता राहुल ठाकूर ही २४ वर्षीय ऊसतोड कामगार महिला वाटंगी येथून बेपत्ता व शनिवारी खेडे येथे कर्नाटक येथील दुसऱ्या एका प्रमोद दोडरेड्डी या कामगाराने नोकरदार महिलेचा केलेला विनयभंग हे तीनही परप्रांतीयांकडून घडलेले प्रकार पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरले आहेत.

ऊस तोडीसह सेंट्रींग बांधकाम व इतर कामाकरिता दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार आजरा तालुक्यात आले आहेत. या मंडळींकडून दररोज किरकोळ भांडणासह विविध प्रकार घडू लागले आहेत. मुळातच तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे तपास यंत्रणेवर मर्यादा येत असतानाच सुरू असणारे असे विविध प्रकार हाताळताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.

एका प्रकरणाची कागदपत्रे तयार करण्यापासून ते तपासाची प्रक्रिया पार पडेपर्यंत दुसऱ्या एका प्रकरणाची नोंद होत आहे. मुळातच हे सर्व परप्रांतीय कामगारांच्या बाबत घडत असल्याने त्यांच्या मूळ ठिकाणापर्यंत पोहोचण्याचे आव्हानही असते हा भागही आहे. एकंदर गळीत हंगाम संपेपर्यंत पोलीस खात्याची डोकेदुखी सुरूच राहणार असे दिसत आहे.

नुसती चर्चाच…
एकही अर्ज दाखल नाही
आजरा नगरपंचायत निवडणुक धुमशान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. दिवसभर आघाड्यांची रचना व उमेदवारांची यादी निश्चित करण्यामध्ये नेते मंडळी गुंतलेली दिसत होती.आघाड्यांबाबतही नुसतीच चर्चा दिवसभर सुरू होती.

मुळातच आघाड्यांची रचना न झाल्याने उमेदवारी अर्ज कोणाच्या जीवावर दाखल करायचा असा प्रश्न अनेक इच्छुकांसमोर आहे. अद्यापही अनेक इच्छुक कागदपत्रांची जोडणा करण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.
सूचक, अनुमोदक यांची ही आवश्यक ती कागदपत्रे शासकीय देणी काल दिवसभर भागवली जात होती.

अशोकण्णा चराटी / भाजपाचे कार्यकर्ते काल दिवसभर संभाव्य उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी येथील आजरा अर्बन बँक परिसरात वावरताना दिसत होते. तर दुसरीकडे विरोधी आघाडीच्या प्रमुखांच्या ठिकठिकाणी बैठका सुरू होत्या.

अधून मधून जिल्हास्तरीय नेते मंडळींशी संपर्क साधून प्राप्त परिस्थितीचा आढावा दिला जात होता.

आज मंगळवारी मात्र काही मंडळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मानसिकतेत आहेत.

पुढचे पुढे बघू…

उमेदवारीसह आघाड्यांबाबत अधिकृत शिक्कामोर्तब होण्यास विलंब होत असल्याने कांही इच्छुकांनी अर्ज भरून ठेवू,पुढचे पुढे बघू… असा पवित्रा घेऊन अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दाभिल उपसरपंच पदी श्रावण वाजे

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दाभिल ता. आजरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी श्रावण गणपती वाजे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवड प्रसंगी सरपंच युवराज पाटील यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

शेतकरीपुत्र अधिकाऱ्याची शेतकऱ्यांसाठी सेवाभावाची वाट डॉ. निखिल यादव यांच्या कार्याची चर्चा

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल यादव हे सेवाभावाचे उदाहरण ठरत आहेत. सव्वा वर्षापूर्वी येथील दवाखान्यात कायमस्वरूपी डॉक्टर नव्हते. आठवड्यातून फक्त दोन दिवसच सेवा मिळत होती. सप्टेंबर २०२४ मध्ये डॉ. यादव यांची नियुक्ती झाल्यानंतर परिस्थितीत बदल झाला आहे.

डॉ. यादव यांनी जनावरांच्या रक्त तपासणीसाठी शेतकऱ्यांना कोल्हापूरला जावे लागते ही अडचण ओळखली. त्यांनी स्वतःच्या खर्चाने महागडा मायक्रोस्कोप व तपासणी साहित्य खरेदी करून उत्तूरमध्येच तपासणीची सुविधा सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचू लागले. अचूक निदानामुळे जनावरांना वेळेत उपचार मिळू लागले आहेत.सध्या उत्तूरसह दहा गावांतील शेतकरी या सुविधेचा लाभ घेत आहेत. कॉल आला की त्वरित प्रतिसाद देणे, दिवसभर सेवेत तत्पर राहणे हे डॉ. यादव यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. त्यांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत असून पंचायत समिती आजरा येथील वरिष्ठांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे.

मनसेच्या मुम्मेवाडी शाखेचे उद्घाटन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुम्मेवाडी ता. आजरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन नुकतेच पार पडले.

यावेळी मुम्मेवाडी शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत इंगळे , उपाध्यक्ष निवृत्ती कडाकणे,सचीव सचिन माद्याळकर यांच्यासह रामदास साठे, विजय सातेकर, संतोष काटे,अशोक कांबळे, तालुका अध्यक्ष आनंदा घंटे, उपाध्यक्ष ॲड. सुशांत पोवार, वसंत घाटगे, सुनील पाटील, अनिल बेलकर, संजय काटे, प्रतीक देसाई ,अवधूत सुतार, धनंजय पाटील, संदीप गुरव, मानकू काटे, मोहन पाटील,अनिल पाटील, रुपेश घोरपडे, अवधूत घाटगे, सातापा लोहार, दयानंद परीट, आदित्य काटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

‘ उचंगी ‘चे उद्या (शुक्रवारी) पाणीपूजन… माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,हसनसो मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित रहाणार…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोळगाव येथील महाविद्यालयीन तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी महागाव येथील तरुणाविरोधात गुन्हा नोंद ….

mrityunjay mahanews
error: Content is protected !!