mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि.१४ मार्च २०२५

      आजऱ्यात पोलीस अलर्ट मोडवर...

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       छत्रपती संभाजी राजे बलिदान मास,रमजान महिना व होळीच्या पार्श्वभूमीवर आजरा पोलीस अलर्ट मोडवर असून शहरांमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

        एकाच वेळी होळी, बलिदान मास व रमजान महिना आल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोक्याच्या ठिकाणी, धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . पोलिसांच्या जोडीला गृहरक्षक दलाच्या जवानांनाही मदतीला घेतले जात आहे.

       वरिष्ठ पोलीस अधिकारी आजरा पोलीस ठाण्याला वारंवार भेट देऊन शहरामध्ये पेट्रोलिंग करताना दिसत आहेत. एकंदर आजरा पोलीस अलर्ट मोडवर दिसत आहेत.

आजऱ्यात होळीची धूम…
आज धुळवड

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा शहरामध्ये पारंपारिक पद्धतीने होळी उत्सवास सुरुवात झाली आहे. काल गुरुवारी घरगुती व सार्वजनिक होळीपूजन करण्यात आले. होळी निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज शुक्रवारी धुळवड साजरी करण्यात येत आहे.

             होळीच्या पोळ्या केल्या दान…

    होळीच्या नैवेद्यासाठी आणलेल्या पोळ्या बाहेरगावाहून मोलमजुरीसाठी शहरात आलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना दान करण्यात आल्या. रवळनाथ कॉलनी येथील तरुणांनी याकरीता पुढाकार घेतला.

         होळी दरम्यान शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

आजरा महाविद्यालय आजरा कनिष्ठ विभागात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा महाविद्यालय ,आजरा कनिष्ठ विज्ञान विभागातर्फे विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

       इयत्ता अकरावी विज्ञान या वर्गातील विद्यार्थ्यांनी विज्ञानातील मूलभूत संकल्पना समजून घेत या विषयांतर्गत त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असणाऱ्या मूलभूत संकल्पना वर प्रयोगांचे सादरीकरण केले. त्यात अनुक्रमे सृष्टी माद्याळकर, तनुजा कांबळे, आदिती गावडे ,सानिका रेडेकर, असिफा जमादार, मसीरा आगलावे ,आसावरी कालेकर ,श्रावणी दळवी, मधुरा पारपोलकर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

        कार्यक्रमाचे नियोजन भक्ती परुळेकर ,राखी नवार, आहाना मुराद आणि विज्ञान विभागातील सर्व शिक्षकांनी केले. प्राचार्य डॉक्टर ए .एन. सादळे, उपप्राचार्य डी.पी. संकपाळ व कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

पेद्रेवाडीतील शालेय वक्तृत्व स्पर्धत सिमरन पाटील प्रथम

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       कै. केदारी रेडेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजीत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्पत सिमरन भिकाजी पाटील (व्यंकटराव हायस्कूल, आजरा) हीने प्रथम क्रमांक पटकावला .जिल्ह्यातून चाळीस स्पर्धक सहभागी झाले होते.

      पेद्रेवाडी (ता. आजरा) केदारी रेडेकर हायस्कूल येथे स्पर्धा झाल्या. संस्थेच्या संस्थापिका व गोकूळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होल्या. वाचनकट्टा बहुद्देशीय संस्था कोल्हापूरचे संकल्पक व संस्थापक अध्यक्ष युवराज कदम प्रमुख पाहूणे होते. मान्यवरांच्या हस्ते (कै) केदारी रेहेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. श्री. कदम यांनी वाचनाचे महत्व स्पष्ट केले. श्रीमती रेडेकर यांचे भाषण झाले.

       वक्तृत्व स्पर्धेतील विजेते असे… चारवी रविंद्र कुंभार (जागृती हायस्कूल ,गडहिंग्लज), प्रणिती प्रमाद देशभाडे, पद्यभान मंथन कुलकर्णी (छ. शिवाजी वि‌द्यालय, गडहिंग्लज), वरद भैरु दळवी (अशोक वि‌द्यामंदिर, इचलकरंजी) यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. विजेत्यांना चौकटीच्या बाहर हे पुस्तक सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.  

आज-यात मोफत नेत्र शिबिर

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      साफल्य डोळयांचे हॉस्पिटल, आजरा येथे दिनांक १७ मार्च २०२५ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

      नेत्रतज्ञ डॉ. अनिकेत मगदूम हे रुग्णांची तपासणी करणार असून गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

खोक्याचं कुटुंब रस्त्यावर?

घरावर बुलडोजर फिरवला ; सतीश भोसलेला वनविभागाचा मोठा दणका!

        बीड : आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या बेकायदा घरावर वनविभागाने बुलडोझर फिरवला आहे. वनविभागाने ही बेधडक कारवाई करून खोक्याचा माज उतरवला आहे. शिरूर कासारपासून काही अंतरावर सतीश भोसले याचं घर आहे. बुलडोजर फिरवण्याआधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली होती.

       त्याच्या घरातील सामान बाहेर काढले. त्यानंतर त्याच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर चालवण्यात आला. सतीश भोसले उर्फ खोक्याचे घर वन विभागाच्या जमिनीवर अधिकृतपणे असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिसही उपस्थित होते.

       विभागाचा मोठा दणका…

ढाकणे पिता-पुत्राला मारहाण, पैशांची उधळण करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या हा चर्चेत आला होता. त्याच्यावर मागील 20 दिवसांत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून तो फरार झाला होता. पोलिसांनी काल त्याला प्रयागराज येथून अटक केली होती. मात्र, तो बीडमध्ये येण्याआधीच त्याला वन विभागाने मोठा दणका दिला आहे.

      कांही दिवसांपूर्वी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडती घेतली होती. या कारवाईत खोक्याच्या घरात शिकारीसाठी लागणारे साहित्य, प्राण्यांचे मांस सापडले होते. त्यानंतर त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला होता. तसेच वन विभागाच्या जमिनीवर घर बांधल्याने दुसरा गुन्हा शिरुर कासार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. वन विभागाने खोक्याला घरासंदर्भात नोटीसही पाठवली होती. परंतु, ४८ तास उलटूनही नोटीसीला उत्तर न आल्याने आता वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

       खोक्या बीड जिल्ह्यातून हद्दपार

खोक्यावर शिरुर कासार, पाटोदा, अंमळनेर पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे नोंद होते. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोक्या भोसलेवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलिसांनी त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याची बीड जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे. याबाबचे पत्र शिरुर कासार पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे, उत्तर प्रदेशच्या दिशेने पळून गेलेला खोक्या आता बीड जिल्ह्यातून हद्दपार असणार आहे.

       कोण आहे सतीश भोसले ?

सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले.अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.(Source…online news)

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शिक्षक भरतीत शासनाची फसवणूक, मुख्याध्यापकासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंद…डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मोटर सायकलवरच हृदयविकाराचा झटका… आज-यातील एकाचा मृत्यू…  

mrityunjay mahanews

हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचारी ठार…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!