शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी २०२५


कटोरा घेऊन भीक मागून
नगरपंचायतीला निधी जमा करून देणार…अपंग व दिव्यांग आजऱ्यात आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीने अपंग व दिव्यांगांचा अंत पाहू नये. अपंगांच्या जीवनामध्ये अंधार निर्माण करण्याबरोबरच त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दिव्यांग निधी गेला कुठे ? असा प्रश्न अपंगांकडून उपस्थित केला जात आहे. अपंगांना रस्त्यावर आणण्याची वेळ कोणामुळे आली ? असे प्रश्न उपस्थित करत जोपर्यंत अपंगांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत नगरपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा पवित्रा अपंग व दिव्यांगांनी घेतल्याने काल दिवसभर या आंदोलनाची चर्चा होती. आज शुक्रवारी आठवडा बाजाराचे औचित्य साधून जर निधीचेच कारण असेल तर हातात कटोरा घेऊन भीक मागून नगरपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्याचा पवित्रा घेतला आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलन वाढवण्याचा निर्धारही आंदोलकांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चाने आंदोलन नगरपंचायत कार्यालयासमोर गेले. तेथे मुक्ती संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी बोलताना संग्राम सावंत म्हणाले, अपंगांच्या-दिव्यांगांच्या बाबतीतील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या त्याची ताबडतोब सोडवून होत नाही.अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार,मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांना निवेदन दिलेले होते.मात्र याबाबतीत तहसीलदार,ज्मु ख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांनी सकारात्मकरित्या प्रश्न सोडवण्यासाठीचा पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाहीत. त्यामुळे याबाबतीत अपंगांच्या विविध मागण्यांसाठी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत तहसिलदार स्तरावरील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असे स्पष्ट केले.
गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा यांनी संघटनेला पत्र देऊन त्या संदर्भातील एक बैठक त्यांच्या दालनात घेऊन याबाबतीत आम्ही काटेकोर पालन करून या मागण्यांचा सोडवणूक करणार आहोत असे लेखी पत्र दिले आहे.
आंदोलनाच्या स्थळी मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत यांनी भेट देऊन त्यांचे म्हणणे मांडले व संघटनेला पत्र दिले आहे. मात्र त्यामध्ये ठोस कार्यवाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असे त्यांना आंदोलनाच्या स्थळी त्यांना सांगण्यात आले.
तालुक्यातील अपंगांना/दिव्यांगांच्या गेली ४ महिने पेन्शनची रक्कम जमा झाली नाही ती ताबडतोब मिळावी, तालुक्यातील सर्व अपंग दिव्यांगांना अंत्योदय कार्ड मिळाले पाहिजे, भूमिहीन दिव्यांगांना किंवा अपंगांना गायरान मध्ये अथवा गावठाण मध्ये जागा देऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा, नगरपंचायतीने घरफळ्यामध्ये ५० टक्के सवलत दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला दिली पाहिजे यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात मजीद मुल्ला, समीर खेडेकर, रामचंद्र डोंगरे, सागर होडगे, निलेश चिमणे, रूजाय डिसोझा, आसिफ मुजावर, सुलेमान दरवाजकर, जगदीश करूणकर, बाळू सुतार,अहमदसाब नेसरीकर, इम्तियाज दिडबाग, सकिना माणगावकर, आस्मा नसरुद्दी, यास्मिन लतीफ, सुष्मिता चंदनवाले, नामदेव पाटील, बाळू सुतार, बेपारी मुस्ताक, अशोक हरेर, रमेश शेंद्रेकर रणजीत सावंत यांच्यासह अपंग दिव्यांग बांधव व मुक्ती संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाला शिवसेना उ.बा.ठा. गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख समीर चांद यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
शहर भकास होत आहे…
निसर्गरम्य अशी ओळख असणाऱ्या आजरा शहरांमध्ये सगळीकडे धूळच धूळ झाली आहे. शहरवासीयांना पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या सर्वांमध्ये अपंगांचे हाल होत आहेत. टप्प्याटप्प्याने हे आंदोलन व्यापक बनवण्याचा इशारा आहे यावेळी देण्यात आला.


सर्फनाला पारपोली शेळप वसाहत मॉडेल व्हिलेज बनवू…
ना आबिटकर यांचे प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला आश्वासन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्फनाला प्रकल्पाने विस्थापित झालेल्या पारपोली या गावची शेळप येथे नवीन वसाहत झाली आहे. शंभर टक्के सौरऊर्जेवर चालणारी राज्यातील ही पहिली वसाहत होणार असून यासाठी संपूर्ण सहभाग देण्याचे आश्वासन आज आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालक मंत्री ना प्रकाश आबिटकर यांनी दिले.
कॉम्रेड संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली सर्फनाला धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री ना. आबिटकर यांची भेट घेतली. महावितरणने ही संपूर्ण वसाहत सोलर व्हिलेज करण्यासाठी नुकतीच वसाहतीत बैठक घेतली होती. या बैठकीत महावितरणने पन्नास टक्के अनुदान देण्याचे मान्य केले होते. उर्वरित पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारच्या योजनेतून, सीएसआर फंडातून किंवा जिल्हापरिषद नाहीतर डीपीडिसीमधून खासबाब म्हणून धरणग्रस्त वसाहतीला दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील चिंचणी वसाहतीप्रमाणे पारपोली वसाहत निसर्गपुरक पर्यावरणासाठी एक मॉडेल व्हिलेज म्हणून बनविण्यासाठी आपण विशेष लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, अशोक मालव, प्रकाश शेटगे, अर्जुन शेटगे, परशुराम बामणे, यशवंत चव्हाण, मयुरेश देसाई, जावेद पठाण हे उपस्थित होते.


होनेवाडी येथे शिवजयंती उत्साहात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजर्षी शाहू व्यायाम शाळा, होनेवाडी यांच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव उत्साहात पार पडला.
सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकापासून शिवज्योत आणण्यात आली. ठिकठिकाणी शिवज्योतीच स्वागत करण्यात आले.गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शाळकरी मुले विविध वेशभूषा करून सहभागी झाली होती. यावेळी मर्दानी खेळाचे सादरीकरण केले. आराध्या बेळगुंकर , आराध्या पाटील, संस्कृती तुरूंबेकर, स्नेहा पाटील, सुरेश पाटील, व प्रज्वल कातकर यांनी लाठीकाठी प्रात्यक्षिके सादर केली.
छत्रपती शिवरायांच्या मृर्तीची पुजा सरपंच श्रीमती प्रियंका आजगेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विश्वास सुतार, गोविंद शेंडे यांच्या हस्ते शिवज्योत पूजन करण्यात आले, ज्येष्ठ नागरिक नारायण कातकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले,
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तातुआण्णा बटकडली, व्यायाम शाळेचे अध्यक्ष रमेश पाटील,लक्ष्मण पाटील, सिताराम पाटील, शामराव पाटील, रामचंद्र पाटील ,हुलजी पाटील,अरुण पाटील, ईश्वर शेंडे , धोंडीबा सासुलकर, सचिन पाटील ,प्रवीण कातकर युवराज पाटील, विश्वास शेंडे , सागर कातकर ,
व्यायामशाळेचे अध्यक्ष सुजल पाटील, उपाध्यक्ष श्रेयस पारस कातकर, पाटील, सचिव सिद्धेश कातकर, सदस्य पंकज कातकर, यश पाटील, साहिल कातकर, गिरीश आजगेकर, अक्षय सुतार ऋग्वेद कातकर, रोहित शेंडे, अनिकेत चव्हाण,सार्थक पाटील,अथर्व शेंडे आदी या सर्व कार्यक्रमात सहभागी झाले होते.


हजरत दावल मलिकसो यांचा उरुस संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या आजरा येथील हजरत दावल मलिकसो यांचा ऊरुस उत्साहात पार पडला.
उरुसानिमित्त संदल व गंधरात्र मिरवणूक
व गलेफ मिरवणूक काढण्यात आली. जिजामाता कॉलनी येथे उरूस स्थळी अनेक भाविकांनी भेट दिली.
यावेळी खेळण्यांसह, शीतपेये, मिठाई स्टॉल लावण्यात आले होते.

आजरा हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थांना शुभेच्छा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा कार्यक्रम झाला.
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नेव्हीचे सेवानिवृत्त अधिकारी सतीश नेवरेकर प्रमुख पाहूणे होते. श्री. नेवरेकर म्हणाले, कष्ट, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळते. विद्यार्थानी अभ्यासात सातत्य दाखवावे. श्री. चराटी म्हणाले, विद्यार्थांनी परीक्षेचा ताण घेवू नये. मोकळेपणाने परीक्षा द्यावी.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. पी. होलम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सा. एस. एस. पाटील यांनी सुत्रसंचालन तर पर्यवेक्षक सौ. एच. एस. कामत यांनी आभार मानले.



साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९
निधन वार्ता
बाबासाहेब पांडव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील चिकन व्यावसायिक बाबासाहेब दाजीबा पांडव ( वय ५२ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगी व मुलगा,भाऊ, भावजय, बहिणी असा परिवार आहे.



