mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


२७ गावातील ३६१ हेक्टर पिक क्षेत्र पाण्याखाली
जोर ओसरला पण पाऊस,पडझड सुरूच

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यामध्ये गेल्या पाच दिवसाच्या तुलनेमध्ये पावसाचे जोर थोडा कमी आला असला तरीही पाऊस सुरू असून पावसामुळे २७ गावातील सुमारे ३६१ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आले आहे. तर सुमारे १५० घरांची व गोठ्यांची पडझड झाली आहे. कांही पोल्ट्री शेडनाही पावसाचा फटका बसला आहे . कांही बंधारे वाहतुकीकरता खुले झाले आहेत.

      गेल्या २४ तासात आजरा मंडळ परिसरात ७५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आजरा- कोल्हापूर शहर आजरा – सावंतवाडी मार्ग वाहतुकीकरता खुला आहे या मार्गावर एस.टी. बस फेऱ्या सुरू असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

      जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझडही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

किणे येथे अपंग रहिवाशाच्या घरात पाणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गेले आठ दिवस सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे किणे ता. आजरा येथील ईश्वर परसू गावडे या चाळोबावाडी मार्गावर राहणाऱ्या अपंग व्यक्तीच्या  घरात पाणी शिरल्याने सदर कुटुंब अडचणीत आले आहे.

     एकीकडे घराशेजारी असणाऱ्या गटरसह इतर पाण्याला अडथळा करणारे घटक बाजूला करण्यासंदर्भात आपण ग्रामपंचायतीला वेळोवेळी कळवूनही याकडे दुर्लक्ष केले असल्याने आपल्यावर पावसात अडचणी निर्माण होत असल्याचे गावडे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. तर सदर इमारत धोकादायक बनली असल्याने तातडीने आपण स्थलांतर करावे अशा आशयाची नोटिस कुटुंबीयांना ग्रामपंचायतीने लागू केल्याने गावडे कुटुंबीय अडचणीत आले आहे.

     पावसामुळे घराचे काही नुकसान झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार आहे असा आरोप गावडे कुटुंबीयांनी केला आहे.

निधन वार्ता
तुकाराम बोलके

      माद्याळ ता. आजरा येथील तुकाराम आण्णा बोलके (वय वर्षे ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले,एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

    आजरा साखर कारखान्यांचे कर्मचारी विलास बोलके यांचे ते वडील होत.

जल्लोष तरुणाईचा



 

संबंधित पोस्ट

कुपवाड येथील तरुणाचा आजऱ्यात मृत्यू

mrityunjay mahanews

फड सांभाळ तुऱ्याला ग आला… आता फड सांभाळायचा कसा…?

mrityunjay mahanews

शुक्रवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रिक्षा चालकाचा रिक्षातच हृदयविकाराने मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!