सोमवार
दि.१९ ऑक्टोबर २०२६


आजऱ्यात ‘गोकुळ’ साठी चुरशीने मतदान

आजरा : प्रतिनिधी
कोल्हापुर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) साठी चुरशीने, खेळीमेळीत, संथगतीने व शांततेच्या वातावरणात ९९.६७ मतदान झाले.आजरा तालुक्यात मतदानासाठी पात्र असलेल्या ३०५ पैकी ३०४ संस्था मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला-मतदान केंद्रावर महायुतीची छ. शाहू शेतकरी विकास आघाडी व महाविकास आघाडीची राजर्षी शाहू शेतकरी समविचारी या दोनही आघाड्यांनी शक्तीप्रदर्शन केले.
येथील व्यंकटराव हायस्कूलवर दोन निवडणुक केंद्र होती. केंद्र क्रमांक १ – १६० तर केंद्र क्रमांक २ – १४५ मतदान होते. केंद्र क्रमांक १ वर पैकीच्या पैकी तर केंद्र क्रमांक २ वर मात्र १४५ पैकी १४४ मतदान झाले. पहिल्या दोन तासात ९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. राजर्षी शाहू समविचारी आघाडीच्या उमेदवार श्रीमती अंजनाताई रेडेकर तदानाचा हक्क बजावला. दरम्यान छ. शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार अशोक चराटी निवडणुक केंद्रावर आले. दुपारी साडे अकरानंतर राष्ट्रवादीचे मतदार आराम बसमधून फेटे बांधून गटाने मतदानस्थळी आले. मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली. पाठोपाठ भाजप व शिवसेना शिंदे पक्षाने मतदारांना आराम बसमधून मतदानस्थळी आले. सायंकाळी चार नंतर उमेदवार अशोक चराटी यांनी मतदान केले.
आमदार शिवाजीराव पाटील, आमदार अमल महाडीक यांच्यासह नेतेमंडळीनी मतदान केंद्राला भेट देवून माहीती घेतली.
फेटे आणि टोप्या…
महायुतीच्या मतदारांनी फेटे बांधून मतदान स्थळी हजेरी लावली. तर महाविकास आघाडीच्या मतदारांनी पिवळ्या टोप्या घालून मतदान स्थळी हजेरी लावली.

गवसे येथील घरफोडीत दागिन्यासह रोख रकमेवर डल्ला
आजरा : प्रतिनिधी
गवसे (ता. आजरा) येथे घराची कौले काढून लोखंडी कपाटातील सोन्याची लगड व रोख रक्कम ९ हजार ५०० रुपये चोरट्यांने लंपास केले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ६९ हजार ५०० रुपये इतकी आहे. शनिवार (ता. १७) सायंकाळी साडेपाच ते आज सकाळी ७ वाजताच्या दरम्यान चोरी झाली आहे.
याबाबतची फिर्याद सुयश प्रकाश पाटील रा. गवसे (ता. आजरा) यांनी आजरा पोलीसात दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. श्री. पाटील हे पत्नीसह देवदर्शनाला गेले होते. त्यांच्या आई घरी होत्या. त्या भावाकडे रात्री गावात मुक्कामी राहील्या. घरात कोणी नसल्याची चोरट्यानी संधी साधली. घरामागील छप्परावर चढून कौले काढली. घरात उतरून लोखंडी कपाटाचे दार चावीने उघडले. कपाटातील रोख रक्कम व सोन्याची लगड पळवली आहे.
पोलीस हवालदार अनिल सरंबळे अधिक तपास करीत आहेत.

आरदाळ माध्यमिक विद्यालयात शाही दसरा

उत्तूर : प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय, आरदाळमध्ये दसरा सणाचे औचित्य साधून ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत ‘शाही दसरा’ महोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांनी परिधान केलेले विविध पारंपरिक शाही पोशाख होते. पारंपरिक वेशभूषेमुळे संपूर्ण शालेय परिसरात राजेशाही थाट आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
यानिमित्ताने रास दांडिया, गरबा नृत्य तसेच विविध मनोरंजक ‘फनी गेम्स’चे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक गाण्यांच्या तालावर ठेका धरत विद्यार्थी आणि शिक्षकांनी गरबा व दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मनोरंजनासोबतच आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेची ओळख नव्या पिढीला व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश यशस्वीपणे साध्य झाला.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालक वर्गातून व गावातून कौतुक होत आहे.

आज जागर आरती

आजरा: प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री रवळनाथ नवरात्र उत्सव उपसमितीच्या वतीने आज मंदिर परिसरात डोक्यावरील आरती/ जागर आरती व दुर्गा प्रसादाचे वाटप कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी ७:३० वाजता हा कार्यक्रम होईल. शहरातील भाविकांचे ही आरती म्हणजे मोठे आकर्षण आहे. आरती वेळी भाविक प्रचंड संख्येने उपस्थित राहतात.

दुर्गा माता दर्शन
मराठा तरुण मंडळ गजरगाव…


आजचे पंचांग
दिनांक : १९ ऑक्टोबर २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (सकाळी १०.५१ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (दुपारी ०३.३८ पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : धृति योग (२० ऑक्टोबर रात्री १२.३४ पर्यंत) त्यानंतर शूल योग
करण : भाव करण (सकाळी १०.५१ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०८.०२ ते सकाळी ०९.२९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०० ते दुपारी १२.४७
सूर्योदय : सकाळी ०६.३५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

छाया वृत्त…

कोळींद्रे ता. आजरा येथील गट नंबर ७८ व ७९ मधील ऊसाचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे जळून मोठे नुकसान झाले आहे. अरुण सदानंद दावलभक्त व विष्णू चाळू वाके यांचे मोठे नुकसान झाले आहे.

