mrityunjaymahanews
अन्य

मसोलीत हत्ती… नुकसानसत्र सुरू


हत्तीचे मसोलीत पुनरागमन…

ट्रॅक्टरचे केले नुकसान


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

 

गेले कांही दिवस मसोली ता. आजरा येथून गायब असणाऱ्या हत्तीचे रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुनरागमन झाले. गावाची वेस ओलांडत हत्तीने गावामध्ये प्रवेश करून तानाजी शिवाजी तेजम यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरचे नुकसान केले. त्याचबरोबर शेतामध्ये रचून ठेवलेली भुईमूग शेंगांची पोती, गवताचे भारे विस्कटून टाकले .

 

गेले काही महिने हत्ती मसोली भागातून गायब झाल्याने ऊस व काजू उत्पादक शेतकरी सुखावला होता.असे असतानाच रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चाळोबा डोंगरातून हत्तीने मसोली गावांमध्ये प्रवेश केला. यावेळी तानाजी तेजम यांच्या रस्त्याशेजारी लावलेल्या ट्रॅक्टरला धडक देऊन ट्रॅक्टरचे सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान केले आहे. त्याचबरोबर येथील उसातून हत्तीने ये-जा केल्याने गुरव कुटुंबीयांच्या ऊस पिकाचेही नुकसान झाले आहे.

 

गवे आणि हत्ती…

 

तालुक्याच्या पश्चिम भागासह अनेक ठिकाणी गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. एकीकडे तालुक्यात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने गव्यांनी आपला मोर्चा शेती पिकांकडे वळवला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच आता हत्तीने पुन्हा आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केल्याने शेतीपिके घ्यायची की नाही ? असा प्रश्न शेतकरी वर्ग उपस्थित करू लागला आहे.


संबंधित पोस्ट

आवंडी धनगर वाड्यावर आठ देशी गाईंचा आकस्मिक मृत्यू..मलिग्रे येथील आगीत 5 म्हैशी जखमी,एक मयत…जिल्हा बँकेची आजरा तालुक्यात ९९.७१ टक्के वसुली…आजऱ्यात  कृषि दिन कार्यक्रम उत्साहात…संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे १ कोटी ५७ लाख जमा. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनुदान जमा…पुन्हा गजराजाचे  वेळवट्टी येथे आगमन…..

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निवडणूक विशेष… ताराराणी आघाडी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मंगळवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!