mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


हुकुमशाही विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या राजाला संसदेत पाठवा : उमेश आपटे

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    लोकसभा निवडणूक एका वेगळ्या वळणावर आली आहे महात्मा गांधींचे विचार मागे पडून आता गोडसेंच्या विचारांची माणसे सरकार चालवत आहेत जगाच्या पोशिंदाला पाच किलो धान्य मोफत देऊन त्याची थट्टा सरकारने चालवली आहे देशाच्या संरक्षणासाठी उपस्थित कर यांची हीच साधण्यासाठी हुकुमशाही विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या छत्रपती यांना संसदेत पाठवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले ते आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

      सभेपूर्वी उत्तूर शहरातून सवाद्य प्रचार रॅली काढण्यात आली.रॅलीमध्ये नागरिकांनी उस्फूर्त सहभाग दर्शविला. शाहू छत्रपती यांचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले.

      कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, हुकुमशाही भांडवलशाही विरोधात लोकशाहीचा पुरस्कार करणारी सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक आहे .अदानी, अंबानी यांचा विकास करणाऱ्या सरकारने पायाभूत सुविधा सुद्धा विक्रीस काढल्या आहेत. जाती -धर्मामध्ये भांडणे लावून मुख्य प्रश्नाला बगल देण्याचे काम भाजप सरकार करत आहे. अशावेळी निष्कलंक व राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचेच नव्हे तर विचारांचे वारसदार ठरलेल्या शाहू छत्रपती यांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले.

       मुकुंदराव देसाई म्हणाले, भाजपा सरकारला जनतेने दोन वेळा संधी दिली पण आश्वासनामध्ये सांगितलेले १५ लाख रुपये कुठे गेले ? बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पत्ता नाही, महागाई गगनाला भिडली आहे. महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशावेळी शाहू महाराजांचे पुरोगामी विचार जोपासणाऱ्या उमेदवाराला संसदेत पाठवण्याशिवाय पर्याय नाही असे स्पष्ट केले.

      शिवानंद माळी म्हणाले, एकदा विकल्या गेलेल्या खासदाराला परत घेऊन नका. संविधान वाचवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. हुकुमशाहीचा चेहरा असणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या नावाने विरोधक मते मागू लागले आहेत. उपकाराची जाण नसणाऱ्या विरोधी उमेदवाराने गद्दारी केली आहे. एक वेळ शिवसेनेतून जाणाऱ्यांना बेन्टेक्स कार्यकर्ते म्हणणाऱ्या प्रा. मंडलिक यांची अवस्था बेन्टेक्स पेक्षाही वाईट अशी रस्त्यावर बसून विकल्या जाणाऱ्या दागिन्यांसाठी झाली आहे अशी टीका केली.

     यावेळी शाहू छत्रपती म्हणाले, पर्यटन रोजगाराला आजारा तालुक्यामध्ये मोठी संधी आहे. भात, बांबू यासारखी शेती पिके विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. रोजगार वाढवणे, शासनाच्या सवलती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, काजूला हमीभाव मिळवून देणे यासाठी आपला प्रयत्न राहील शेतकरी बंधूंना संपर्क साधता यावा यासाठी तालुक्याच्या ठिकाणी संपर्क केंद्र उभारण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.

     यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील,माजी अध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रा. सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, किसन कुराडे, संजयभाऊ सावंत, नौशाद बुड्ढेखान,युवराज पोवार, अनिकेत  कुवळेकर,संजय तर्डेकर, अशोक तर्डेकर,हरिबा कांबळे, अभिषेक शिंपी,अमित खेडेकर, रणजीत देसाई, अमित सामंत, किरण कांबळे, सरपंच किरण अमनगी, संजय उत्तूरकर, महेश करंबळी, भैरू कुंभार, जोतिबा सकपाळ, माजी सरपंच सौ. वैशाली आपटे, राजू खोराटे, सुनिता घोडके, सुरेश कडाकणे, अमोल भांबरे, संपत चोरगे, गोपाळ सावंत, सुरेश कडाकणे, विद्याधर गुरव, भरत हातकर, विजय गुरव, सखाराम कदम, अशोक पाटील ,संग्राम घोडके, दादू सावंत, व्यंकटेश मुळीक, अमित येसादे , रविंद्र भाटले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदींच्या गॅरंटीचा जाहीरनामा घरोघरी पोहोचवा : समरजितसिंह घाटगे

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

          शेतकरी, महिला, युवा वर्ग व गरीब नागरिकांच्या सशक्तीकरणासह देशाला महासत्ता बनवणारा भाजपचा जाहीरनामा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीचा हा जाहीरनामा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहोचवावा.असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

       भादवण (ता.आजरा)येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भादवण पंचायत समिती मतदार संघातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास भादवण, भादवणवाडी, खोराटवाडी,मासेवाडी,मडिलगे, हालेवाडी, वझरे,आर्दाळ,महागोंड,होन्याळी,चिमणे या गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवड पत्राचे वाटप श्री. घाटगे यांच्या हस्ते केले.

श्री. घाटगे पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणे, काश्मीरमधील ३७० कलम हटवणे यासारखे महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले.विकसित भारताची संकल्पना घेऊन नरेंद्र मोदी अहोरात्र कार्यरत आहे. त्यांच्या स्वप्नातील बलशाली भारत जागतिक महासत्ता बनवण्यासाठी एक-एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून देऊया.

      यावेळी तुळशीराम मुळीक, सूर्यकांत पाटील संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विठ्ठल उत्तुरकर डाॕ.जी.एच. केसरकर, संदीप पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

     यावेळी संजय मुळीक, संदीप गुरव, प्रविण लोकरे, मंदार हाळवणकर ,संदीप पाटील, ज्योतिबा नांदवडेकर ,संजय चौगुले,डाॕ. बबन बारदेसकर, संदीप देसाई, गणपतराव पाटील, अनिल खोराटे, धनाजी खवरे, राजू इंगळे, श्रीमंत कदम, जालंदर येसणे, प्रदीप लोकरे आदी उपस्थित होते.

     स्वागत हरीश देवलकर यांनी केले.आभार जिल्हा उपाध्यक्ष शैलेश मुळीक यांनी मानले.


खोटी आश्वासने देऊन फसवणाऱ्या भाजपा सरकारला पराभूत करा : जयवंतराव शिंपी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        सलग दोन वेळा खोटी आश्वासने देऊन केंद्रात सत्तेत येऊन सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भाजपा सरकारला येत्या निवडणुकीत पराभूत करा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पेरणोली येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

       ईडी, सीबीआय, आयकर यासारख्या माध्यमांचा गैरवापर करून सत्तेत आलेल्या भाजपाने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे. रोजगार, महिला संरक्षण, महागाई, आरोग्य या सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या सरकारला यावेळी पराभूत करण्याची गरज आहे. यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

      कॉ. संपत देसाई म्हणाले, देशाचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असून भाजपाला पराभूत करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मूठभर भांडवलदारांना पोषक धोरणे स्वीकारण्या बरोबरच पायाभूत सेवा विक्रीस काढण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. आरक्षणाचे जनक असणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या वारसांना या निवडणुकीत घसघशीत मताने विजयी करून देशांमध्ये अजूनही लोकशाही जिवंत आहे याची प्रचिती आणून देऊया असे आवाहन केले.

     शाहू छत्रपती म्हणाले ,तालुक्यामध्ये भाताच्या नवनवीन जाती विकसित करणे, बांबू सारख्या पिकावर संशोधन करून बांबू उत्पादन वाढीकरता प्रयत्न करणे, काजू बियांना हमीभाव मिळवून देणे यासाठी आपला प्रयत्न राहील. सर्वसामान्य नागरिकांना भेटता यावे यासाठी निवडणुकीनंतर तालुक्यामध्ये संपर्क कार्यालय उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

     यावेळी प्रकाश पाटील यांचेही भाषण झाले ‌यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी .पाटील, ए.वाय.पाटील, मुकुंदराव देसाई, उदयराज पवार,युवराज पोवार, रशिद पठाण, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, नगरसेवक अभिषेक शिंपी, किरण कांबळे, संकेत सावंत, हरिबा कांबळे, एस.पी. कांबळे,उत्तम देसाई ,सरपंच प्रियांका जाधव,विक्रम देसाई, हर्षल सुर्वे, रणजीत देसाई, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्रसिंह सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ही माझी गॅरंटी

      देशपातळीवर अव्वल क्रमांकावर असणारे महाराष्ट्र राज्य सध्या चौथ्या- पाचव्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे. महाराष्ट्राला पुन्हा अव्वल स्थानी आणण्यासाठी, शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम करणार ही माझी गॅरंटी आहे असे यावेळी शाहू छत्रपती यांनी सांगितले.


एक वेळ त्यांच्यासाठी अनवाणी फिरलो…
या निवडणुकीत मात्र त्यांना धडा शिकवणार...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गत लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रा. संजय मंडलिक हे विजयी झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही असा संकल्प करून साडेतीन महिने त्यांच्यासाठी उन्हातान्हातून वणवण फिरलो. आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी जीवाचे रान केले परंतु ऐनवेळी त्यांनी आम्हाला दगा फटका देऊन कोणत्याही प्रकारे विचारात न घेता शिंदे गटात प्रवेश केला. ज्यांच्यासाठी आम्ही अनवाणी फिरलो त्यांनी आमच्याशी केलेली ही प्रतारणा असून आता त्यांना या निवडणुकीत निश्चितच त्यांची जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन शिवसेना ( उबाठा ) उपतालुकाप्रमुख संजय येसादे यांनी केले.

      गत लोकसभा निवडणुकीत येसादे यांनी केलेल्या संकल्पामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. येसादे पुढे म्हणाले, खासदार प्रा. मंडलिक यांनी राजकीय पलटी मारताना किमान आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. स्वार्थासाठी त्यांनी भूमिका बदलली पण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही कशी भूमिका बदलू शकतो ? आमच्या रक्तातच शिवसेना आहे. आम्ही उसने शिवसैनिक नाही आहोत. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी शाहू छत्रपती यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांनी आदेश दिला आहे. या आदेशाशी बांधील राहून छत्रपतींच्यासाठी तसूभरही कमी पडणार नाही.

      शाहू छत्रपती यांना तालुक्यातून घसघशीत मताधिक्य देऊन प्रा. मंडलिक यांनी केलेल्या गद्दारीचे प्रायश्चित्त त्यांना यावेळी निश्चितच भोगावयास लावू असेही येसादे यांनी यावेळी सांगितले.

त्यांना पराभूत करणे हा संकल्प…

  गत वेळी प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी संकल्प केला होता. तू पूर्णही करून दाखवला. पण यावेळी श्रीराम नवमीचे औचित्य साधून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना निवडून आणण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला असून निश्चितच त्यांना निवडून आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा बुद्धिजीवींच्या बैठकीत निर्णय…

       गडहिंग्लज: मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

       राजकारण हे आपले क्षेत्र नाही असा समज करून घेऊन बुद्धिजीवी वर्ग नेहमीच राजकारणापासून अलिप्त राहत आला आहे त्याचा गैरफायदा राजकारणातील वाईट प्रवृत्ती घेत आल्या आहेत. आज देशात लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, हुकूमशाही येऊ लागली आहे, गुंड मवाली सत्तेच्या स्थानावर जाऊन बसले आहेत अशावेळी बुद्धिजीवी वर्गाने गप्प बसणे म्हणजे समाजाचा घात केल्यासारखे होईल. आज खऱ्या अर्थाने बुद्धिजीवी वर्गाने भूमिका घेऊन मैदानात उतरण्याची गरज आहे ही गरज ओळखूनच गडहिंग्लज, आजरा, आणि चंदगड तालुक्यातील लेखक, कवी, प्राध्यापक अशा बुद्धिजीवी वर्गाने एकत्र येत सकारात्मक हस्तक्षेप करण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. संपत देसाई होते. बैठकीला गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधानिक अधिकारांसाठी या निवडणुकीत प्रभावी हस्तक्षेप करण्याचा निर्णय सर्वानुमते करण्यात आला. यासाठी शंभर लेखक कवी सह बुद्धिजीवी लोकांच्या सहीने भूमिका घेणारे पत्रक प्रकाशित करून तिन्ही तालुक्यात आशा बैठका आयोजित करण्याचे ठरले. याबरोबर बुद्धिजीवी लोकांची प्रबोधनात्मक रॅली काढण्याचे ठरले.

     या वेळी अरविंद बारदेसकर, प्रा. एस. व्ही. गुरबे, प्राचार्य जे. बी. पाटील, प्रा. पी. डी. पाटील,प्रा. सुभाष कोरे, डॉ. नवनाथ शिंदे, प्रकाश कांबळे, कल्याणराव पुजारी, किसनराव कुऱ्हाडे, प्रा शिवाजीराव होडगे, दत्ता गुरव यांनी मनोगते व्यक्त केली.

      यावेळी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, बाळेश नाईक, प्रकाश मोरे, आप्पासाहेब कमलाकर, उदय देसाई, सुभाष निकम, अनिल कलगुटकी, अमर झोन्ड, युवराज जाधव, कृष्णा सावंत, ईश्वर दावणे, महादेव शिंगे, सुरेश दास यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

फोटोगॅलरी



 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

mrityunjay mahanews

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews

सुपडा साफ…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews
error: Content is protected !!