
विनयभंग प्रकरणी
किटवडे येथील दोघांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किटवडे ता. आजरा येथील चाळीस वर्षे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून उदय भिकाजी पाटील, सरिता उदय पाटील या दोघां विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी १२.४५ चे सुमारास फिर्यादी घराचे दारात व घरात किटवडे येथे दारात मिरच्या वाळत घालण्याच्या कारणावरून झालेला भांडणाचा राग मनात धरून उदय याने पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होइल असे वर्तन केले तर सरिता हिने जिवे मारण्याची धमकी दिल्याने उदय व सरिता पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास सपोनि नागेश यमगर यांचे आदेशाने सहा. फौजदार दत्तात्रय शिंदे हे करीत आहेत.

चाफवडेत शॉर्टसर्किटने गवत गंजी जळून खाक

आजरा: मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा
चाफवडे ता.आजरा येथे विद्युत वाहिनीत शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत येथील रचलेले गवतगंजी व पयाण जळून खाक झाले असून यामध्ये सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील संतोष विठोबा धडाम या शेतकऱ्याच्या गवताला शनिवारी दुपारी आग लागली. गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीने आग विझविण्यात आली यांच्या गोठ्यानजीक रचलेले पाच हजार पयान पेंडी व दोन ट्रॉली गवत विद्युत वाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाले आहे. यामध्ये धडाम यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

इंडिया आघाडीला आजऱ्याच्या ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघतील इंडिया आघाडीचे उमेदवार श्री. शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आजरा तालुक्यातील पश्चिम-दक्षिण विभागातील ४५ दुर्गम वाड्यावस्त्यांचा जनसंपर्क दौरा काल पूर्ण झाला. या दौ-याचे नियोजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाअध्यक्ष मुकुंद देसाई, राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश आपटे, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, गोकुळ संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, शिवसेना (उबाठा) युवराज पोवार, माजी सभापती उदयराज पवार,अभिषेक शिंपी, नौशाद बुडडेखान , राजू होलम, कॉ संजय तर्डेकर, संजयभाऊ सावंत, राजू देसाई वंचित बहुजन आघाडीचे संतोष मासाळे, इंडिया आघाडी समन्वयक रविंद्र भाटले यांनी केले होते.
पेरणोली येथून या दौऱ्याला सुरवात झाली. पश्चिम दक्षिण भागातील ४५ दुर्गम वाड्यावस्त्यांवर मतदारांशी थेट संपर्क साधत गावबैठका घेऊन इंडिया आघाडीची भूमिका मतदारांपर्यंत पोहाचवण्यावर भर देण्यात आला. या छोट्या बैठकांना लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने इंडिया आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला आहे.
काल संध्याकाळी चितळे धनगरवाडा येथून जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी यांच्या उपस्थितीत चौथ्या दिवसाच्या दौऱ्याला सुरवात झाली. भावेवाडी, चितळे, जेऊर, चाफवडे, कासारकांडगाव, परोली येथे मतदारांशी थेट संपर्क साधत गावबैठका झाल्या.
इंडिया आघाडीचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सावंत, विक्रम देसाई, विलास पाटील, रणजीत देसाई, अशोक पवार, राजू देसाई, संकेत सावंत, उत्तम देसाई, सुरेश कालेकर, प्रकाश मोरुस्कर, युवराज जाधव, जोतीबा चाळके, संतोष पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

भाजपा स्थापना दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टी स्थापना दिवसाच्या निमित्याने आजरा येथील भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अधक्ष बाळ केसरकर, जिल्हा सरचिटणीस सी. आर. देसाई , किट्टवडे सरपंच व तालुका उपाध्यक्ष लहू वाकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष चौगुले,तालुका उपाध्यक्ष रुपेश परीट, तालुका सरचिटणीस राहुल पेंडसे,ओबीसी सेल तालुका चिटणीस प्रवीण सुतार,राहुल खाडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

निधन वार्ता…
पांडुरंग पोवार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री.पांडूरंग तुकाराम पोवार रा. सोहाळे ता.आजरा यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
लक्ष्मीबाई देसाई
शिरसंगी ता.आजरा येथील लक्ष्मीबाई रामू देसाई (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पक्षात २ मुले २ मुली, सुन नातवंडेअसा परिवार आहे.



