
आम. आबिटकर यांची आज-यात बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये शिवसेनेचे कोल्हापुर लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार प्रा संजय मंडलीक यांच्या प्रचाराचे नियोजन करणेसाठीआमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बौठक घेणेत आली.
स्वागत प्रास्तावीकामध्ये खा.मंडलिक यांनी गेल्या पाच वर्षा मध्ये आजरा शहराबरोबरच ग्रामीण भागातील गावाना २७ कोटी रु. चा निधी केंद्र आणी राज्य शासनाच्या विविध योजने मधून दिला परंतु त्याची कधी जाहीरातबाजी केली नाही. अजूनही ज्या गावाना निधी दिला नाही त्यांना निधी उपलब्ध करून देणे बाबतची चर्चा झालेली आहे आसे सांगीतले.
आमदार आबिटकर यांनी प्रा.मंडलिकच उमेदवार कसे योग्य आहेत त्या बाबत कार्यकर्त्याना सविस्तर सांगून विरोधी गटाचे उमेदवार व आपले उमेदवार यांची जनतेतील कामाचा एक्सरेच या निवडणुकीच्या निमिताने झाला पाहीजेत आसे सांगून आजरा तालुक्याच्या तिन्ही मतदार संघातील गावात आपण जाऊन जनतेशी संवाद साधणार आहे आसे सांगीतले. होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रत्येक गावतून मोठ्या संख्येने धनुष्यबाणावर मतदान करून प्रा.मंडलीक यांना विजयी करणेचे आवाहन करून कोणत्याही गावाला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली .
कार्यक्रमाला शिवसेनेचे उपतालुका प्रमख काका देसाई, आनिल डोंगरे, विभाग प्रमुख संजय रेणवी प्रकाश पाटील, युवराज पाटील,किरण हणबर, संजय गांधी निराधार योजना समिती चे सदस्य दत्ता पाटील, रणजीत देसाईं कृषी कमीटीच आध्यक्ष इंद्रजीत देसाई, शहर प्रमख विजय थोरवत संतोष भाटले, गोविंद गुरव, जितेद्र भोसले व विवीध गावातून आलेले प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत होते. आभर गोविंद गुरव यांनी मानले.

फुगलेले आकडे आणि बोगस ताळेबंद…

ज्योतिप्रसाद सावंत
आर्थिक संस्थांच्या वार्षिक ताळेबंदात बराच गोलमाल दिसत असून काही संस्थांनी बोगस आकडेवारीच्या साह्याने ताळेबंद तयार केले असून सभासदांची ही दिशाभूल थांबवण्याची गरज आहे.
मार्च महिना संपून आठवडाभराचा कालावधीत होत आला तरी अनेक संस्थांचे ताळेबंद अद्याप तयार झालेले नाहीत. कांही आर्थिक संस्थांनी तर तात्पुरत्या स्वरूपात ठेवी जमा करून ठेवींचे आकडे मार्च अखेर फुगवले असल्याची चर्चा सभासद मंडळीत होत आहे.
मार्च महिन्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात गोळा केलेल्या या ठेवी सभासदांनी एप्रिलमध्ये उचलल्यानंतर नेमक्या ठेवींची अवस्था काय आहे हे चित्र स्पष्ट होणार आहे . काही संस्थांचा आता उलट्या दिशेने प्रवास सुरू असल्याचे जाणवत आहे. अशा मंडळींची कर्ज वसुलीसाठी अद्यापही धावपळ सुरूच आहे. म्हणजेच ताळेबंद अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. एकंदर परिस्थिती पाहता तालुक्यातील बऱ्याच आर्थिक संस्थांनी ताळेबंदामध्ये गोलमाल केल्याचे चित्र दिसत आहे.हि सभासदांची दिशाभूल थांबवण्याची गरज आहे. काही सभासदांनी याबाबत थेट वार्षिक सभेमध्ये संचालक मंडळाला धारेवर जाणार असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे.
अद्यापही वसुली सुरूच…
मार्च महिना संपला तरीही वसुलीची डोकेदुखी ताळेबंद निश्चित करण्यात मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहे. आहे त्या परिस्थितीत ताळेबंद निश्चित केले तर थकबाकी वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम सर्वच आर्थिक व्यवहारावर होणार असल्याचेही स्पष्ट आहे .यामुळे आजही काही संस्थांची मंडळी थकबाकीदारांच्या दारात वसुलीसाठी थखेटे मारताना दिसत आहेत.

बंधाऱ्यातील पाणी गायब
पारेवाडी, पेठेवाडीत पाणी बाणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पारेवाडी बंधारा कोरडा पडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपासून बंधाऱ्यातील पाणी संपले आहे. बंधाऱ्यालगत पारेवाडी व पेठेवाडी या गावांना पाणी पुरवणारे जॅकवेल आहे. जॅकवेलमध्ये पाणी नाही. बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली असून पाटबंधारे विभागाला पत्राद्वारे कळवले आहे.
मार्च सुरू झाला की हिरण्यकेशी नदी तळ गाठते. त्यामुळे वेळवट्टी, पारेवाडी, पेठेवाडी, साळगाव व सोहाळे या गावांना टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही हीच स्थिती होती. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी धनगरबाडी, घाटकरवाडी या तलावातून हिरण्यकेशी नदीच्या पात्रात पाणी सोडले होते. त्यामुळे हिरण्यकेशी नदी काठावरील
१४ गावांची पाणीटंचाई दूर झाली होती. पण पारेवाडी बंधाऱ्यातील बरगे काढल्यामुळे बंधारा कोरडा पडला आहे. नदीपात्रातील खडक उघडे पडले आहेत. त्यामुळे पारेवाडी व पेठेवाडी या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहेत. ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू झाले आहेत. सरपंच मारुती पोवार, उपसरपंच शोभा संजय माने, इंद्रजित देसाई, शामराव पोवार, ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांनी पाटबंधारे विभागात धाव घेत अडचण मांडली.

जनता गृहतारण संस्थेला ४३ लाखांवर नफा : मारुती मोरे
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सभासद, कर्जदार व ठेवीदारांशी विश्वासाचे नाते जपल्यामुळे गत आर्थिक वर्षात संस्थेने २४३ कोटींची उलाढाल केली आहे. यामध्ये संस्थेला ४३ लाख ५७ हजार ९२३ रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली आहे.
संस्थेकडे ८२ कोटी ८४ लाख १८ हजारांच्या ठेवी आहेत. ५८ कोटी ४१ लाख ६४ हजार रुपये कर्जाचे वाटप केले आहे. संस्थेचे खेळते भांडवल ११९ कोटींचे असून, २६ कोटी ३३ लाख ३४ हजारांची गुंतवणूक केली आहे. गडहिंग्लज व कोल्हापूर येथे स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेने ग्राहकांना घरपोच सेवा दिली आहे. गृहकर्जासाठी १ कोटीपर्यंत व प्लॉट खरेदीसाठी ७५ लाख रुपये कर्ज दिले जाते. सोने तारणासाठी कर्जपुरवठा केला जातो, असे सांगितले. उपाध्यक्ष गणपतराव अरळगुंडकर, संचालक डॉ. अशोक सादळे, प्रा. डॉ. अशोक बाचुळकर, प्रा. विनायक चव्हाण, प्रा. बळवंत कडवाले, प्रा. मनोज देसाई, अॅड. सुभाष डोंगरे, प्रा. डॉ. तानाजी कावळे आदी उपस्थित होते.

मंगळवारी आज-यात स्वर प्रभात
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज-याची रंगपंचमी व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील स्वरमयी पहाटेची खंडीत झालेली परंपरा पुन्हा एक वेळ सुरू करण्यात येत असून मंगळवार दिनांक ९ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजता चैतन्य सभागृह, महाजन गल्ली आजरा येथे स्वर प्रभात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
उपशास्त्रीय व भक्ती गीतांची ही मैफिल मच्छिंद्र बुवा आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत.



