mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

ती सापडली …
तो गजाआड…

                      आजरा:प्रतिनिधी

          गेल्या पंधरा दिवसांपासून आजरा येथील कुंभार गल्लीतील बेपत्ता असणारी एक अल्पवयीन मुलगी अखेर सापडली असून याप्रकरणी पवन कांबळे ( रा .आडीबेनाडी , ता . निपाणी ) याला आजरा पोलीसांनी बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्याअंतर्गत (पोक्सो )अटक केली आहे.

        याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी,पंधरा दिवसांपूर्वी एका अल्पवयीन शाळकरी मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पिडीत मुलीच्या पालकांनी पोलीसांत दिली होती . पोलीसांनी बुधवार दि. १७ रोजी पिडीत मुलीसह कांबळे याला ताब्यात घेतले आहे.

          पिडीत मुलीला बालसुधार गृहात पाठविण्यात आले असून कांबळे याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर लैंगिक बाल अत्याचार कायद्यांतर्गत (पोक्सो ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कुमार ढेरे करीत आहेत


आजरा अर्बन बँकेची कर्मचाऱ्यांना ७० लाखाची वेतन वाढ


                  आजरा : प्रतिनिधी

      दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि, आजरा (मल्टी-स्टेट) आणि कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बैंक एम्प्लॉईज युनियन (युनिट दि आजरा अर्बन को-ऑप. बँक) यांचेमध्ये कर्मचारी पातळीवर द्विपक्षीय वेतनाचा करार जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त वि. वि. घोडके यांचे समोर संम्मत झाला,

        याप्रसंगी कामगार नेते कॉ. गोविंदराव पानसरे युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील, आजरा अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष रमेश गुरुलिंगाप्पा कुरुणकर उपस्थित होते. सदर करारामुळे कर्मचान्यांना एकूण वार्षिक ७० लाखाची भरघोस वाढ देणेत आलेली आहे. सदर वाढ मासिक कमीत कमी रु. ७००/- तर अधिकाधिक रु.६,०००/- इतकी आहे.

     दि आजरा अर्बन को-ऑप. बँकेचा मिश्र व्यवसाय जवळ जवळ १५०० कोटींच्या घरात असून बँकेने आपल्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील ३२ शाखाद्वारे एक सशक्त व सक्षम आर्थिक बैंक म्हणून मान्यता मिळवलेली आहे. याप्रसंगी बोलताना कामगार नेते भगवान पाटील यांनी सदर द्विपक्षीय करार अत्यंत सलोख्याच्या वातावरणात झाल्याचे सांगितले, तर बँकेचे अध्यक्ष रमेश गुरुलिंगाप्पा कुरुणकर यांनी यावेळी बँकेचे व्यवस्थापन सतत कर्मचा-यांच्या हिताचे निर्णय घेत असून सदर करार कर्मचाऱ्यांना नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी स्फूर्तीदायक ठरेल असे सांगीतले.

       सदर द्विपक्षीय करार करण्यासाठी आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख य बँकेचे जेष्ठ संचालक अशोकअण्णा चराटी यांनी विशेष प्रयत्न केले. या कराराच्यावेळी व्यवस्थापनातर्फे व्हा. चेअरमन सुनील मगदुम, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. अनिल देशपांडे उपस्थित होते. या करारामुळे मिळालेल्या वेतनवाढीमुळे आजरा बैंकच्या कर्मचाऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला आणि व्यवस्थापनाला आपला व्यवसायवाढीचे आश्वासन दिले. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर, प्रशासन व बोर्डचे मुख्याधिकारी नितीन बेल्लद, सेवक प्रतिनिधी प्रकाश परळकर, गौतम देशपांडे आदी उपस्थित होते.


रवळनाथ पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध


                     आजरा: प्रतिनिधी

       येथील श्री. रवळनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. स्पप्नील पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

    बिनविरोध निवडले गेलेले संचालक असे अभिषेक जयवंतराव शिंपी, समीर विश्वनाथ गुंजाटी, मजीद इब्राहीम मुराद, यूसुफ आदम गवसेकर, विश्वास कृष्णा जाधव, विक्रम अर्जुन पटेकर, माघ्री अशोक पाचवडेकर, अर्चना संतोष मराठे, किरण शंकर कांबळे, विलास जोतीबा कुंभार, इब्राहीम महम्मद इंचनाळकर अशी त्यांची नावे आहेत.

निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्व सभासदांचे नगरसेवक अभिषेक शिंपी व किरण कांबळे यांनी आभार मानले.


सिरसंगी येथे बाळूमामा भंडारा उत्सव साजरा


                     आजरा: प्रतिनिधी

          श्री बाळूमामा ट्रस्ट सिरसंगी यांच्यावतीने बाळूमामा भंडारा उत्सव कार्यक्रम भाविकांच्या प्रचंड उपस्थितीत व उत्साहात पार पडला.

          या कार्यक्रमाला व्यासपीठ अधिकारी म्हणून श्री दत्त योगीराज आश्रमचे उपाध्यक्ष तुळशीराम अण्णा यांनी काम पाहिले.

          शनिवारी जालना येथील कार्तिक आगलावे महाराज व कीर्तनकार श्वेता हालसीकर यांचे , रविवारी शेगाव येथील भक्ती तेलोरे व आष्टी येथील आदिनाथ झिंजुकरे यांचे, सोमवार दिनांक १५ रोजी अहमदनगर येथील सरगम खंडागळे व आकाश फुले यांचे तर मंगळवार दिनांक १६ रोजी ज्ञानतृप्ती सुद्रिक पाटील व महादेव थोडके महाराज यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम झाले. रात्री नऊ वाजता तीर्थक्षेत्र आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ येथील भाकणूक सांगणारे श्री. भगवान आप्पासो डोणे महाराज यांचा भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला. बुधवार दि. १७ रोजी महाप्रसाद वाटप करण्यात आले.


रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा आजरा

      श्री राम मंदिर,अयोध्या येथे येथे काल पासून सर्व प्राणप्रतिष्ठापणा विधी सुरू झाले आहेत त्यानिमित्ताने  आजरा नगरीतील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथील श्री राम मंदिरात दुग्धअभिषेक व आरतीने अभियानाची सुरुवात झाली.
      तसेच कालपासून २२ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक विधींचे आयोजन आजरा शहरातील श्री राम मंदिरात करण्यात आले आहे.

आज….

  ‘  गंध रामभक्तीचा ‘ या निवडक गीतरामायण व रामभक्ती गीतांचा कार्यक्रम….

वेळ – संध्याकाळी ठीक ७ वाजता
स्थळ – राम मंदिर,आजरा


निधन वार्ता

आनंदा रायकर


कोरीवडे त्या.आजरा येथील सेवा निवृत्त कृषी पर्यवेक्षक आनंदराव तुकाराम रायकर ( वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मूलगा,सुन, नातू ,दोन विवाहीत मूली आहेत.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप रायकर यांचे वडील होत.

इस्माईल चांद

आजरा येथील इस्माईल इब्राहिम चांद ( वय ७४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुले, दोन मुली, सूना, जावई नातवंडे असा परिवार आहे. आजरा येथील खासदार धनंजय महाडिक यांचे कट्टर समर्थक समीर चांद यांचे ते वडील होत.


कै.रमेश टोपले नाट्य महोत्सव

आजचा नाट्यप्रयोग

आम्ही दोघेच राहायचो घरात

लेखक.. विक्रमसिंह बल्लाळ


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!