mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


मेलेल्या कोंबड्या थेट दाभिल बंधाऱ्यात…


                    आजरा : प्रतिनिधी

    पोल्ट्री शेडमधील व वाहतूक करताना मृत पावलेल्या कोंबड्या पोती भरून दाभिल बंधाऱ्याच्या पाण्यात टाकण्याचे प्रकार निदर्शनास आले असून याबाबत दाभिल पंचक्रोशीत संताप व्यक्त केला जात आहे.

      पोत्यामध्ये बांधून सदर कोंबड्या टाकल्या जात असल्याने येथे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे व पाणी दुषीत होत आहे. याच पाण्यावर आजूबाजूच्या पाणी योजना असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. आरोग्य विभागाने तातडीने याची दखल घेऊन संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.



भारतीय जनता पार्टीची तालुका कार्यकारिणी जाहीर


                     आजरा:प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीची आजरा तालुका पदाधिकारी/कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना नेमणूक पत्रे देण्यात आली.

नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे…

तालुका उपाध्यक्ष-विठ्ठल उत्तूरक, लहू वाकर, समीर पारदे, पांडुरंग लोंढे, निवृत्ती शेंडे, शैलेश मुळीक   तालुका सरचिटणीस- आतिशकुमार देसाई, प्रकाश शिंदे, तालुका चिटणीस- अनिल पाटील, राजाराम पोतनीस, अनिल नार्वेकर, नंदाताई गुरव, प्रकाश कविटकर, सुरेश सावंत, उमेश घोरपडे, आजरा शहर अध्यक्ष- अभिजीत रांगणेकर

भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी…

तालुकाध्यक्ष- रुपेश परीट, तालुका सरचिटणीस -राहुल पेंडसे, शहर अध्यक्ष- शुभम पाटील, तालुका उपाध्यक्ष- विशाल आढाव, तालुका चिटणीस- सुरज पाटील

इतर सेल…

आजरा शहर व्यापारी सेल शहराध्यक्ष- अभिजीत इंजल, अनुसूचित जाती जमाती सेल तालुकाध्यक्ष- शशिकांत कांबळे, उपाध्यक्ष- मुकुंद कांबळे, शहराध्यक्ष- अभिजीत शिंदे, इतर मागासवर्गीय सेल तालुका चिटणीस -गौतम भोसले

          यावेळी सौ. सुनीता रेडेकर, ज्योत्स्ना चराटी, दशरथ अमृते, सी. आर. देसाई आशिष कुमार देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



मागणी…
क्रीडा संकुलाच्या शेजारील कचरा डेपो हलवा


                     आजरा: प्रतिनिधी

       आजरा शह‌रातील व परीसरातील सर्व ओला व सुका कचरा क्रीडासंकुलाच्या शेजारी टाकला जात आहे. वर्षानुवर्षे हा कचरा क्रीडासंकुलाच्या शेजारी टाकला जात असल्यामुळे ह्या परिसरात खूपच दुर्गंधी सुटत आहे.

या मैदानावर अशा प्रकारे दुर्गंधी असणे ही आपल्या आजरेकरांसाठी खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. लवकरात लवकर सदर कचरा डेपो येथून स्थलांतरित करावा अशी मागणी स्थानिक क्रीडाप्रेमींनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.


स्थगित ..आंदोलन स्थगित 


                   आजरा: प्रतिनिधी

             राष्ट्रीय महामार्गाच्या अन्यायी कामकाजाविरोधात समीर मोरजकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता, त्याची दखल घेऊन नायब तहसीलदार यांनी महामार्ग कॉन्ट्रॅक्टरांशी  बैठक घडवून आणली. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता अनिल पाटील यांनी जागेवर येऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यावेळी मोरजकर यांची मागणी त्यांनी समजावून घेतली व ती योग्य आहे हे त्यांच्या लक्षात आले . त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ कामावरील अभियंत्याला बोलवून रस्ता गट नंबरला घासून घेण्याची मागणी होती ती मान्य झालेली असल्याने त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे पत्रक मोरजकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.


स्नेहसंमेलन…
आजरा महाविद्यालयाचे उद्यापासून स्नेहसंमेलन


                    आजरा : प्रतिनिधी

        आजरा महाविद्यालयाचे वार्षिक परितोषिक वितरण व स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक १२ व शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संमेलन प्रमुख प्रा. मनोज देसाई यांनी दिली.

       शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘ हसायदान ‘ फेम विनोदी वक्ते संजय कळमकर उपस्थित राहणार आहेत. तर शनिवार दिनांक १३ रोजी आजारा महाविद्यालय सभागृहात दुपारी तीन वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे.

      याव्यतिरिक्त दोन दिवस रांगोळी व हस्तकला प्रदर्शन, विविध भित्तीपत्रकांचे उद्घाटन,शेलापागोटे, फनी गेम्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले आहे.


आंदोलन…
आज शिवसेनेची ‌निदर्शने

.                   आजरा :प्रतिनिधी

          आज गुरुवार दि ११ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजी चौकात सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील , तालुका प्रमुख युवराज पोवार, राजु सावंत यांनी दिली.



धार्मिक…
श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांची पालखी आज येणार

                    आजरा: प्रतिनिधी

        सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांची पालखी व पादुका आजरा शहरात गुरुवार दि ,११ रोजी येत असून श्री रवळनाथ मंदिर मध्ये दुपारी २ ते ५ या वेळेत स्वामी भक्तांना दर्शनाची संधी मिळणार आहे.


निवड…
अमोल बांबरे

                    आजरा: प्रतिनिधी

        आरदाळ गावचे उपसरपंच अमोल बांबरे यांची अखिल भारतीय मराठा महासंघ, आजरा तालुका ( युवा )  अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र त्यांना तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी दिले आहे. यावेळी मारुती मोरे, प्रकाश देसाई, राजू पोतनिस, संभाजी इंजल, संदीप चौगुले, सी.आर. देसाई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!