

मंदिरे आणि देव- देवतांवरील श्रद्धेमुळेच समाजात सत्कार्याची ओढ. : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आजरा: प्रतिनिधी
विविध देव-देवता आणि मंदिरे ही समाजाची श्रद्धास्थळे आहेत. त्यामुळे समाज अनीतीपासून दूर राहुन सत्कार्याची ओढ लागते, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
उत्तूर ता. आजरा येथे इंदिरा नगरातील श्री. स्वामी समर्थ कॉलनीमध्ये पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या ७० लाख निधीतून बांधलेल्या श्री. दत्त पंत समर्थ मंदिराच्या वास्तुशांती व लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उत्तुरकर ग्रामस्थ, मुंबई व पुणे येथील उत्तुर ग्रामस्थांचे अवधूत भजनी मंडळ यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. डाॅ. श्री. एस. डी. पन्हाळकर महाराज होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, मंदिरांमुळे समाजात सदाचाराची वृत्ती वाढीस लागते. उत्तुरच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचेही, त्यांनी सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीमध्ये सातशेहून अधिक मंदिरे बांधली. या माध्यमातून त्यांनी धार्मिक, अध्यात्मिक आणि सांप्रदायिक चळवळीला नेहमीच पाठबळ दिले आहे. उत्तुर गावासह उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील सर्वच गावांना मंत्री मुश्रीफ यांनी कोट्यावधींचा निधी देऊन या भागाचा कायापालट केला आहे.

यावेळी सरपंच किरण अमनगी, वसंतराव धुरे, मारुतीराव घोरपडे, शिरीष देसाई, महादेवराव पाटील, काशिनाथअण्णा तेली, गंगाधर हराळे, गुरुवर्य आकाराम महाराज, दिपकराव देसाई, विजय वांगणेकर, मारुती दिंडे, जोतिबा पोवार, पांडुरंग सांगले, सुधीर जाधव, प्रभाकर फाळके, दिनकर कुंभार, भिकाजी येजरे, समीर कुंभार, परसू तिबिले आदी प्रमुख उपस्थित होते.


नाताळच्या पार्श्वभूमीवर रोजरी चर्चमध्ये विद्युत रोषणाई

आजरा: प्रतिनिधी
नाताळच्या पार्श्वभूमीवर आजरा येथील रोजरी चर्चमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली असून नाताळची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शहरातील चर्च गल्लीमध्ये ठीक ठिकाणी आकर्षक असे ख्रिसमस ट्री तयार करण्याबरोबरच सर्वत्र विद्युत रोषणाई केली आहे. पॅरिस प्रिस्ट मॅलविन पायस यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवारी रात्री अकरा वाजता पूजा व त्यानंतर रात्री बारा वाजता प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेले आठवडाभर नाताळ उत्साहात साजरा करण्याच्या उद्देशाने सूचना बांधवांची लगबग सुरू आहे. बाहेरगावी असणारे चाकरमानी नाताळसाठी मोठ्या संख्येने शहरात आले आहेत. आजरा शहराबरोबरच वाटंगी,गवसे व तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांनी नाताळची जोरदार तयारी केली आहे.



निसर्गाच्या विरोधात जाऊ नका: वैद्य सुविनय दामले

आजरा : प्रतिनिधी
निसर्ग म्हणजे शरीर आहे. या शरीराच्या नियमाच्या विरोधात जाऊ नका. नियम मोडला तर शिक्षाही भोगावी लागणारच आहे असे स्पष्ट प्रतिपादन कुडाळचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य सुविनय दामले यांनी केले. ते आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या व्याख्यानमालेत ‘ बदलता आहार आणि बदलते आरोग्य ‘ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थांनी वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.अशोक बाचुळकर होते.
आम्ही पाश्चात्य विचार व संस्कारांचे गुलाम बनलो आहोत. त्यामुळे सर्व आजारांना आपले शरीर निमंत्रण देत आहे. आहारावर कंट्रोल नसेल तर सर्व आजार चुकीच्या जीवन पद्धतीतून निर्माण होतात. शरीरातील ९९ टक्के आजार हृदय व मनाशी संबंधित आहेत. त्या मनाला खंबीर बनवा. संतुलित ठेवा. शांत ठेवा असेही आवाहन वैद्य सुविनय दामले यांनी केले. खाण्यावर बंधन घालू नका मात्र जेवताना पूर्ण आनंद घेऊन जेवा. जेवल्यानंतर काय जेवलो हे विसरून जा. मनात भिती असेल तर सगळे माती होईल. शरीर विहीरीसारखे आहेत त्याची पाण्याची टाकी बनवू नका. श्वास, आहार व नामस्मरण आयुष्यभर करीत रहा असे आवाहन वैद्य सुविनय दामले यांनी केले.
कार्यक्रमास वाचनालयाचे पदाधिकारी व शहरवासीय उपस्थित होते.



आमदार राजेश पाटील यांच्या वतीने सत्कार सोहळा

आजरा : प्रतिनिधी
हलकर्णी फाटा ता.चंदगड येथे आजरा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या विजयी झालेल्या सर्व नूतन संचालकाचा सत्कार आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
प्रास्ताविक गडहिंग्लज बाजार समितीचे चेअरमन अभयकुमार देसाई यांनी केले.यावेळी आमदार राजेश पाटील यांनी कारखान्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी के.डी.सी.सी संचालक सुधिर देसाई,के.डी.सी.सी संचालक संतोष पाटील,अल्बर्ट डिसोझा,संचालक मुकुंदादा देसाई,मधुकर देसाई,सुभाष देसाई,मनीषा देसाई,रचना होलम,शिवाजी नांदवडेकर,नामदेव नार्वेकर,अनिल फडके,राजेश जोशिलकर, संभाजी पाटील,राजू मुरकुटे,दिंगबर देसाई,बामणे तसेच आघाडीचे सर्व उमेदवार तसेच चंदगड राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष भिकू गावडे,संघाचे व्हा.चेअरमन तानाजी गडकरी,संघाचे सर्वसंचालक,आजरा,गडहिंग्लज भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते.



निधन वार्ता
प्रतापसिंह येसणे

मडीलगे ता्.आजरा येथील श्री.प्रतापसिंह दत्तात्रय येसणे ( वय ६५ ) यांची अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुन सा परीवार आहे.भावेश्वरी संस्था समुहातील प्रमुख व श्री राम दुध संस्थेचे माजी चेअरमन होते.
सौ.प्रेमा शिप्पूरकर

आजरा येथील सौ. प्रेमा विष्णू शिप्पूरकर (वय ६० वर्षे) यांचे अल्पश: आजारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.





