mrityunjaymahanews
अन्य

हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचारी गंभीर जखमी

 

हत्तीच्या हल्ल्यात वनकर्मचारी गंभीर जखमी घाटकरवाडी जंगलातील घटना

गेले आठ दिवस घाटगरवाडी परिसरात धुमाकूळ घातलेल्या हत्तीला हूसकावण्याची मोहीम आज वनविभाग व ग्रामस्थांनी राबवली. सदर मोहीम राबवत असताना हत्ती बाजूला गेला आहे असे समजून त्याच्या पाठीमागून जात असताना अचानकपणे समोरच्या झुडपातून येऊन हत्तीने हुसकावण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हत्तीने हल्ला केला यामध्ये वनकर्मचारी प्रकाश पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

आजपासून सावंतवाडीच्या दिशेने लाँग मार्च

शाळा बचाव आंदोलन

                     ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

शाळा बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर आज आजरा येथून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानापर्यंत लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी बारा वाजता या लॉंग मार्चला सुरुवात होणार आहे.

मागण्या :-

१.राज्यातील २० पटसंख्येपेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण सांगून अशा शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घेतला पाहिजे. गाव, तांडा, वाडी, वस्ती तिथे शाळा हेच धोरण कायम ठेवले पाहिजे. एक (१) विद्यार्थी असला तरी ती शाळा चालू ठेवली पाहिजे.

२. शासकीय शाळांच्या सक्षमिकरणासाठी आवश्यक असलेले शिक्षक, सुसज्ज इमारती, ग्रंथालय, अभ्यासिका, खेळाचे मैदान यासह गरजेच्या असलेल्या सर्व सुविधा शासकीय शाळांना तात्काळ दिल्या पाहिजेत.

३. गेल्या दहा वर्षांत शिक्षक भरती केलेली नसल्याने राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विषय शिकवायला शिक्षक नाहीत. कला, क्रीडा शिक्षकांसह ही रिक्त पदे तातडीने भरली जावीत.

४. शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे शिक्षकांना देणे बंद केले पाहिजे. . जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून मानधन तत्वावर कंत्राटी शिक्षक भरती करण्याची तरतूद

५. शिक्षण हक्क कायद्यात आहे. ही नवी वेठबिगारी असून त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणार असल्याने ही प्रक्रिया तातडीने थांबली पाहिजे. तशी दुरुस्ती कायद्यात केली पाहिजे.

६. कंत्राटी पद्धतीने चालवलेली शासकीय नोकर भरती तातडीने थांबवली पाहिजे.

शनिवार दि.२८ रोजी दुपारी १२ वाजता शिवाजी पुतळा आजरा येथून सुरूवात

मार्ग….

आजरा-पारेवाडी-वेळवट्टी-माद्याळ- गवसे मुक्काम

रविवार दि.२९ रोजी गवसे येथून सुरूवात
धनगरमोळा-दुपारी घाटकरवाडी- जेवण व विश्रांती नांगरतास-आंबोली मुक्काम

सोमवार दि.३०
दानोली-धवडकी-माडखोल-सावंतवाडी मार्गे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे निवासस्थान

सुलगाव येथे दुरंगी लढत


                      ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

       सुलगाव ता. आजरा येथील ग्रामपंचायती करिता दुरंगी लढत होत असून राष्ट्रवादी विरुद्ध शिंपी – चराटी – शिवसेना गट अशी ही लढत आहे.

          प्रभाग एक मधून राष्ट्रवादीतून प्रल्हाद देसाई, रंजना देसाई,नंदिनी डोंगरे व विरोधी आघाडीतून परशराम डोंगरे,विजया नार्वेकर, अंजना शिवगण अशी लढत होत आहे. तर प्रभाग एक मधून सुरेखा देसाई यांनी आपली अपक्ष उमेदवारी ठेवली आहे.

         प्रभाग दोन मधून राष्ट्रवादीचे सदानंद कदम, विमल लांडे यांच्यासमोर नितीन कुंभार व संजीवनी संदीप खरे यांचे आव्हान आहे.प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादीचे सागर व सुजाता गुरव आणि विरोधी आघाडीचे शिवाजी डोंगरे रूपाली गुरव हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

        सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून राष्ट्रवादीचे पांडुरंग खवरे व विरोधी आघाडीचे नंदकुमार वसंतराव देसाई यांच्यात थेट लढत आहे.

        राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व जनता बँकेचे संचालक रणजीत देसाई, अनिल देसाई, दिनकर देसाई तर विरोधी शिंपी – चराटी – शिवसेना आघाडीचे नेतृत्व संदीप खवरे, शिवाजी डोंगरे, नंदकुमार नारायण देसाई ही मंडळींनी स्थानिक पातळीवर करत आहेत.

आज-यात सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी साखळी उपोषण


                  ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. त्याला आजरा तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला असून यासाठी सोमवार (ता.३) आजरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाणार आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आले.

सोमवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत उपोषण केले जाईल. तालुक्यातील सर्वच गावातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी उपोषणात सहभागी होणार आहेत. त्यामुळे मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देवून पन्नास टक्केच्या आतील आरक्षण देण्यासाठी आपण शासनाला कळवावे अशी विनंती केली आहे. निवेदनावर जिल्हा समन्वयक मारूती मोरे, उपसमन्वयक चंद्रकांत देसाई, कार्याध्यक्ष संभाजीराव इंजल, तालुका समन्वयक बंडीत चव्हाण, कार्यकारणी सदस्य चंद्रकांत सरदेसाई, सूर्यकांत आजगेकर यांच्या सहया आहेत.

सरिता पाटील यांची यरंडोळ च्या सरपंच पदी निवड


                   ◼️आजरा : प्रतिनिधी◼️

         यरंडोळ तालुका आजरा या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सरिता सुभाष पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी उपसरपंच भीमराव माधव,संतोष ढोनुक्षे, सुप्रिया पाटील, गुंडू मारुती पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, शिवाजी सुपल,श्रीकांत हातकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

निधन वार्ता

शि. गो.पाटील

         ग्रामीण कथा लेखक व धामणे ता.आजरा गावचे माजी पोलीस पाटील शिवराम गोविंद तथा श्री.शि.गो.पाटील यांचे  वयाच्या ८५ व्या वर्षी शनिवारी ( दि.२८ ) पहाटे वृद्धापकाळाने निधन  झाले.

      अंत्यसंस्कार सकाळी १०.३० वाजता धामणे येथे होणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे. धामणे गावचे पोलीस पाटील भूपाल पाटील यांचे ते वडील होत.


कॉल फॉरवर्डिंग स्कॅम’ची प्रकरणे वाढली; मोबाईल कंपन्यांचा गंभीर इशारा

         जिओ, एअरटेल यासह अन्य काही टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना गंभीर इशारा दिला आहे. कॉल फॉरवर्डिंग स्कॅमच्या माध्यमातून फसवणूक होण्याची प्रकरणे वाढल्यामुळे, सावध राहण्याचा सल्ला कंपन्यांनी ग्राहकांना दिला आहे.

काय आहे कॉल फॉरवर्डिंग स्कॅम?

          कॉल फॉरवर्ड होणे, म्हणजे तुम्हाला आलेला फोन दुसऱ्याच एका नंबरवर पुढे जाणे. स्कॅमर्स तुमच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग हा ऑप्शन सुरू करतात. त्यानंतर तुम्हाला येणारे सर्व कॉल किंवा मेसेज देखील त्यांच्या नंबरवर जातात. यामुळे तुमची मोठी आर्थिक फसवणूक देखील होऊ शकते.

कशा प्रकारे होते फसवणूक?

        स्कॅमर्स सगळ्यात आधी मोबाईल कंपनी किंवा इंटरनेट प्रोव्हाईडर कंपनीतून बोलत असल्याचं सांगून तुम्हाला फोन करतात. यावेळी ते तुम्हाला काही समस्या येत आहे का याबाबत विचारणा करतात, किंवा सर्व्हिसबद्दल फीडबॅक मागतात.

         यानंतर तुमची एखादी समस्या सोडवण्यासाठी ते काही स्टेप्स फॉलो करण्यास सांगतात. या प्रोसेसमध्ये ते कॉल फॉरवर्डिंग नंबर डाएल करायला सांगतात. यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करताच तुमच्या नंबरवर कॉल फॉरवर्डिंग सेवा सुरू होते.

       यानंतर तुम्हाला येणारे कॉल, मेसेज त्या स्कॅमर्सकडे जातात आणि तुम्हाला याबाबत कळतही नाही. या माध्यमातून ओटीपी, महत्त्वाचे कॉल अशा गोष्टी स्कॅमर्सना सहज मिळू शकतात.

काय घ्यावी खबरदारी?

        सर्वात आधी तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग कोडबद्दल माहिती हवी. तुमच्या मोबाईल नंबरवर ही सेवा सुरू करण्यासाठी *401* आणि पुढे तुमचा मोबाईल नंबर डाएल करावा लागतो. जर तुम्हाला कोणी असं करण्यास सांगत असेल, तर सावध व्हा.

        मोबाईल कंपन्या तुम्हाला कधीही स्वतःहून कॉल फॉरवर्डिंग सुरू करण्यास सांगत नाहीत. तसंच मोबाईल कंपन्यांचे कर्मचारी तुम्हाला पर्सनल नंबरवरुन फोन करत नाहीत. त्यामुळे असं होत असल्यास सावध व्हा.

News Source :- https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq



 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!