mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्यामहाराष्ट्र

आज-याजवळ अपघातात दोघे जखमी…आजरा येथे शेतकरी मेळावा उत्साहात …शृंगारवाडी ग्रामपंचायतीला केंद्र शासनाचा पुरस्कार

 

 

⭕  आज-याजवळ अपघातात दोघे  जखमी

आजरा-गडहिंग्लज मार्गावर आजरा सूतगिरणीजवळ अपघातात दोघे गंभीर जखमी झाले.  सकाळी साडेअकराला अपघात घडला. शामराव कांबळे व रमेश शिप्पूरकर (रा. खेडे, ता. आजरा) अशी त्यांची नावे आहेत. श्री. शिप्पूरकर यांच्या दुचाकीवरून शामराव कांबळे आजऱ्याकडे येत होते. त्यांच्या दुचाकीला अचानक अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यांच्यावर गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

♦️   शृंगारवाडी ग्रामपंचायतीला केंद्र सरकारचा पुरस्कार♦️

पंचायत राज मंत्रालय, केंद्र सरकार यांचेकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सक्षमीकरण पुरस्कारासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून ग्रुप ग्रामपंचायत , शृंगारवाडी( उचंगी) ( ची निवड झाली आहे. तसेच चाईल्ड फ्रेंडली ग्रामपंचायत  पुरस्कारासाठी   राज्यातुन एक ग्रामपंचायत पुरस्कारास पात्र झाली असून त्यातही ग्रुप ग्रामपंचायत शृंगारवाडीने बाजी मारली आहे. दोन्ही पुरस्कार मिळवणारी गुप ग्रा. पं., शृंगारवाडी ( उचंगी) ही राज्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. सदर पुरस्काराची तपासणी २७ जानेवारी रोजी जि.प. सिंधुदुर्ग चे पथकाने कली होती. या कामी सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळ, बचत गट, संस्था, गटविकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, सर्व खात्याचे विभाग प्रमुख . तसेच ग्रामसेवक संवर्गाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 ⬜ पुरस्कार वितरण २४ एप्रील २०२२ रोजी पंचायत राज दिना निमीत्त दिल्ली येथे  आहे. ⬜

♦️🔹   पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज. – दिवीज  🔹♦️

आजरा येथील शेतकरी मेळावा उत्साहात

राम- राज्याच्या वेळेपासून ब्रिटिश येईपर्यंत भारतात शेती सेंद्रिय व समृद्ध होती. पण आता ही शेती कॅन्सर शेती झाली आहे. पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणे काळाची गरज असल्याचे दिवीज पठारे सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन  यांनी सांगितले. आजरा आजरा महाल शिक्षण सस्था, अण्णाभाऊ संस्था समूह, व आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनी च्या वतीने येथील शेतकऱ्यांना कार्बन क्रिएट फंडाचा शेतकऱ्यांना लाभ यासाठी यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. चे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी होते.

प्रास्ताविक आजरा समृद्धी प्रोडूसर कंपनीचे कार्यकारी संचालक बाळासाहेब वाघमारे यांनी केले. तर स्वागत आजरा अर्बनचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी  केले.

श्री. पठारे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी केमिकलयुक्त शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळले  पाहिजे .  सध्या पर्यावरणाच्या   दृष्टीने  कॅन्सर मुक्त शेती करणे काळाची गरज आहे, यापूर्वी हा कार्बन क्रेडीट फंड जागतिक बँक प्रदूषण कमी करण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी देत होती, सध्या सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी जागतिक बँक हा फंड शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर देत आहे. या नोंदणीची मुदत फक्त २२ एप्रिल २०२२ पर्यंतच आहे. तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे श्री.पठारे मार्गदर्शन करताना म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात श्री. शिंपी म्हणाले, कार्बन फंड या पूर्वी औद्योगिक क्षेत्रात दिला जात होता. आता जागतिक बँक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे व आपली शेती सुपीक व्हावी यासाठी हा फंड देत आहे. तरी आजरा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या शेतकरी मेळाव्यास भिकाजी गुरव, एस.पी.कांबळे, के. व्ही. येसने, रामचंद्र मुरुकटे यांच्यासह आजरा तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी, सरपंच उपसरपंच, आजी – माजी सरपंच सदस्य तालुक्यातील शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिवाजी पारळे यांनी केले. आजरा समृद्धीचे संचालक नारायण मुरुकटे   यांनी आभार मानले.

♦️♦️  पुंडलिक जाधव, शेतकरी मंडळाचे संभाजी सावंत, कृषिभूषण आप्पासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर शेतकरी मेळाव्याच्या चर्चासत्रात पांडुरंग लोंढे, संभाजी इंजल, बास्तु बारदेस्कर, संभाजी जाधव ,    अनिकेत  चराटी यांच्यासह मान्यवरांनी भाग घेतला.♦️♦️

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-याजवळ लक्झरी व तवेरा अपघातात दहा जखमी…अण्णाभाऊ सूतगिरणीच्या अध्यक्षपदी अन्नपूर्णा चराटी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Crime News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!