आजरा तालुक्यातील गवसे येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी
आजरा तालुक्यातील गावसे येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. सध्या कारखाना गळीत हंगाम सुरू असल्याने आजरा -आंबोली मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची व गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची मोठी गर्दी होताना दिसते. वळणदार रस्त्यावरून उसाने भरलेले ट्रॅक्टर्स नेताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. मंगळवारी सायंकाळी ऊस वाहतूक ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चे मोठे नुकसान तर झालेच पण त्याचबरोबर वाहतुकीचाही खोळंबा झाला होता.
साळगाव बंधाऱ्यावर ट्रक व कारची धडक
आजरा- पेरणोली मार्गावर असणाऱ्या हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधाऱ्यावर मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ट्रक व कारची जोरदार धडक झाली संरक्षक असल्यामुळे कार नदीत पडण्यापासून बचावली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलीस मास्टरमाइंडसह तपासासाठी पुन्हा चंदगडात
बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित ॲड. राजकुमार राजहंसला घेवून मुंबई पोलिस पुन्हा एकदा चंदगड तालुक्यात दाखल झाले आहेत.या प्रकरणात एमडी ड्रग्ज बनवण्यासंबंधीत अधिक माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे .तालुक्यातील इतर काही ठीकाणी सर्च ऑपरेशन करुन परिस्थितीजन्य पुरावे एकत्र करण्याकामी मुंबई गुन्हे अन्वेशन विभागातील अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी पथकाकडून संशयित आरोपी राजहंस व फार्म हाऊसचा केअरटेकर निखिल लोहार यांना घेवून ढोलगरवाडी येेेथील फार्म हाऊसवर पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली . तसेच बेळगाव या ठिकाणी देखील तपासणी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ड्रग्ज प्रकरणाचा थेट संबंध चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीशी असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. ठिकाणी मुख्य आरोपीं कडून मिळणाऱ्या माहिती नुसार पुढील तपासाची दिशा ठरवली जात आहे. मुंबई येथील तपास पथकाने चंदगड येथे धाडी टाकून एमडी ड्रग्स बनवण्याचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने आक्रमक भूमिका घेत अवैध व्यवसाय काम विरोधात कारवाईचे सत्र सुरू केले आहे.



शेवाळे येथील शेतकऱ्याच्या पिकांचे हत्तींकडून मोठे नुकसान
शेवाळे (ता.चंदगड) येथील पांडुरंग बाळु मळविकर.यांच्या शेतात सोमवारी सायंकाळी पाच वाजता शेत जमिनीत प्रवेश करून पिकांचे हत्तीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून शेत अवजारे व पिकांचे नुकसान झाले असल्याने वन विभागाकडे तसे कळवूनही कोणीही परिस्थिती पाहण्यासाठी किंवा पंचनामा करण्यासाठी आले नसल्याने संबंधित अधिका-यांनी पाहणी करून पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वन विभाग कार्यालय समोर उपोषणास सर्व कुटुंब बसेल असा इशारा मळविकर कुटुंबाने दिला आहे.


