mrityunjaymahanews
अन्य

BREAKING NEWS

बुधवार दि.४ नोव्हेंबर २०२६

आजरा – आंबोली मार्गावर भीषण अपघात

महाविद्यालयीन तरुण ठार : एक गंभीर जखमी

आजरा – प्रतिनिधी 

आजरा – आंबोली मार्गावर गवसे ते धनगरमोळा दरम्यान तीन अल्पवयीन महाविद्यालयीन तरुण प्रवास करत असलेल्या चार चाकी वाहनाचा गंभीर अपघात होऊन त्यामध्ये समर्थ पांडुरंग पांगम ( वय १७ वर्षे रा. परोली रोड,आजरा ) हा जागीच मृत पावला तर संस्कार अमित सुतार ( वय १७ वर्षे रा. बर्डे गल्ली, आजरा ) हा गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने यातील तिसरा तरुण प्रथमेश दुंडाप्पा वाजंत्री (वय १७ वर्षे रा. गांधीनगर,आजरा) याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी…

आजरा महाविद्यालयात अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिकणारा मृत समर्थ हा आपल्या प्रथमेश व संस्कार या मित्रांसोबत आज शेवटचा पेपर झाल्यानंतर फिरण्यासाठी चार चाकीतून धनगरमोळ्याच्या दिशेने गेला होता. एका हॉटेलला जेवण करून ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आजऱ्याच्या दिशेने परतत असताना समर्थ याचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली व चरीमध्ये कोसळली. यामध्ये समर्थ हा जागीच ठार झाला तर संस्कार हा गंभीर जखमी झाला आहे. संस्कार याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी गाडीमध्ये मागील सीटवर बसलेला प्रथमेश वाजंत्री हा बाकी सुदैवाने बचावला त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.

अपघातानंतर आजरा ग्रामीण रुग्णालयात तिघांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सरवदे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील माहिती घेत आहेत.

परीक्षा संपल्याचा आनंद अल्पकालीन ठरला…

आज शेवटचा पेपर झाल्यानंतर सुट्टी सुरू होणार होती त्यामुळे या तिघांनी गेले दोन दिवस सुट्टीची सुरुवात व परीक्षेचा शेवट एन्जॉय करण्यासाठी हा बेत आखला होता परंतु सुट्टीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेत समर्थ याला आपला जीव गमवावा लागला.

संघर्षातून घडलेले पांगम कुटुंबीय…

समर्थ याचे वडील २००४-०५ च्या सुमारास कोकणातून आजरा येथे आले. त्यानंतर त्यांनी स्वतःची नर्सरी विकसित करून फळ व फुल झाडांची रोपे विकून त्यामध्ये मोठी प्रगती केली. संघर्षातून आलेल्या पांडुरंग यांच्या समर्थ या एकुलत्या एक मुलाचे अपघाती निधन झाले. आजरेकरांतून याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

सर्वच अल्पवयीन…

मृत समर्थसह प्रथमेश व संस्कार ही सर्वच मुले अल्पवयीन असल्याने अल्पवयीन मुलांना वाहने देणे किती धोकादायक आहे याची प्रचिती आज समस्त आजरा तालुका वासियांना आली.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रविवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गांजा विक्री करणारे रॅकेट उघडकीस

mrityunjay mahanews

मंगळवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!