शनिवार
४ जुलै २०२६


न.

६
होते.


वडिलांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसा निमित्ताने @75 या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
उत्तूर : मृत् होते .
आजरा महाविद्यालयात बार्टीच्या विविध योजना व जात वैधता प्रक्रियेवर मार्गदर्शन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
.

राईसमिल ते गांधीनगर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; तात्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील राईसमिल ते गांधीनगर या महत्त्वाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, तात्काळ डागडुजी करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
शिवसेना तालुका प्रमुख युवराज शामराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राईसमिल ते गांधीनगर हा रस्ता आजरा नगरपंचायतीच्या हद्दीत येतो. या रस्त्यावरून एरंडोळ, पोळगांव अशा १० ते १२ गावांचा संपर्क आहे. गांधीनगर येथे ग्रामीण रुग्णालय असल्याने दररोज अनेक रुग्ण, अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतून व एस.टी. बसने याच मार्गाने ये-जा करतात. सध्या रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्यात गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे वाहन चालवताना चालकांच्या अंगावर चिखल उडतो. रुग्णांना रुग्णालयात नेताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक व वाहनचालक यांना रोजचा प्रवास जिकिरीचा झाला आहे.
“मागणीची दखल न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, कामगार सेना शहरप्रमुख बिलाल लतिफ, युवासेना उपतालुका प्रमुख अमित गुरव, तालुका उपसंघटक हरिश्चंद्र व्हरकटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

फोटो क्लिक
(स्थळ : सोहाळे- दोरूगडेवाडी परिसर)


हत्तींच्या उपद्रवावर चर्चा करण्यासाठी वनविभागाचे शिवसेनेला निमंत्रण;आज बैठक
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात वन्य हत्तींमुळे शेतकरी व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुकारलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने चर्चेची तयारी दर्शवली आहे.आज शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, मोर्चा स्थगित करून चर्चेत सहभागी होण्याची विनंती वन विभागाने केली आहे.
परिक्षेत्र वन अधिकारी, आजरा यांनी शिवसेना तालुका प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, हत्तींच्या उपद्रवाबाबत शिवसेनेने दिलेल्या निवेदनाची वन विभागाने गंभीर दखल घेतली आहे.वन विभागाने हत्ती प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहितीही दिली आहे:
मोर्चा काढण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून हा विषय सकारात्मक व समन्वयाने मार्गी लागेल. त्यामुळे प्रस्तावित मोर्चा स्थगित करून वन विभागाशी प्रत्यक्ष चर्चा करावी, अशी विनंती वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वनविभाग कार्यालय सुलगाव येथे बैठक होणार आहे.


आजचे पंचांग
दिनांक : ३ जुलै २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : तृतीया तिथी (सकाळी ११.२० पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (सकाळी ११.४६ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : विष्कुम्भ योग (सायंकाळी ०४.५९ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ११.२० पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मकर राशी (४ जुलै रात्री १२.४७ पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०४ ते दुपारी १२.४३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.०६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत




