mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार २१ मे  २०२६

न्यायालयाचा अवमान करून रस्त्यावर अतिक्रमण…
किणे – पोश्रातवाडी रस्ता प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

किणे ते पोश्रातवाडी ग्रामीण रस्ता क्रमांक 66 मध्ये रस्त्यात अतिक्रमण करून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे व जेसीबीच्या  सहाय्याने  उकरून न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधितांवर पोलीस कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी तहसीलदार ,आजरा यांच्याकडे अरुण नारायण पाटील, नारायण शंकर केसरकर व विजय विष्णू केसरकर यांनी लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

यापूर्वी  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तहसीलदार यांनी गट नंबर ५३१ मधील अतिक्रमण १३.५ .२०१५ रोजी १६ मीटर रुंद व तीनशे मीटर लांब इतके काढून रस्ता खुला करून तसा पंचनामा करून बांधकाम विभाग, कोल्हापूर जिल्हा परिषद विभाग, आजरा यांचेकडे वर्ग केलेला आहे . यामध्ये रिट पिटीशन नंबर २८/ २०१५ अन्वये उच्च न्यायालयाचा लेखी आदेश झाला आहे. या सार्वजनिक रस्त्यावर पुन्हा केव्हाही कोणीही कोणत्याही प्रकारचा अडथळा करू नये व त्या रस्त्याच्या वापरास हरकत करू नये अशी कायमची मनाई/ ताकीद करण्यात आली आहे. असे असतानाही जेसीबीच्या साह्याने रस्ता उकडून तो बंद केल्याप्रकरणी जेसीबी चालकासह अन्य पाच जण अशा सहा जणांवर गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यामुळे पुन्हा एक वेळ या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून बांधकाम विभाग कोणती भूमिका घेणार याकडे किणे पंचक्रोशीचे लक्ष लागून आहे. 

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेला ४ कोटी ४६ लाख ढोबळ नफा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या पतसंस्थेने सन २०२५ २०२६ सालात रू. ३४९ कोटी ५० लाख ५३ हजार ६४० इतका एकूण व्यवसाय केला आहे. संस्थेला ४ कोटी ४६ लाख ८८ हजार ७०० इतका ढोबळ नफा झाला असून आवश्यक त्या तरतुदी करून रू. १ कोटी २५ लाख २५ हजार ९९० इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री.दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी दिली.

सभासदांचा आणि ठेवीदारांचा वाढता विश्वास हीच संस्थेच्या प्रगतीची खरी ताकद आहे. सभासदांच्या हिताचे दृष्टीने व संस्थेच्या आर्थिक स्थैर्यासाठी संस्था सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबवते. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेच्या स्थैर्यात आणखी भर पडली आहे तसेच समाजाला आर्थिक दृष्टया भक्कम आधार देण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेकडे वसुल भागभांडवल रू. ४ कोटी ५८ लाख इतके असून आर्थिक वर्षात एकूण रू. १९२ कोटी ८८ लाख ठेवी, रू. १५६ कोटी ७२ लाख कर्जवाटप, रू. ५८ कोटी ५९ लाख गुंतवणूक, संस्थेचा राखीव व इतर निधी रू. २१ कोटी पेक्षा अधिक आहे. ऑडिट वर्ग सतत ‘अ’ असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून सभासदांना जलद व ऑनलाईन सेवा देणेसाठी संस्था लवकरच कोअर बँकिंग सिस्टीम लागू करत आहे.

संस्थेच्या प्रगतीसाठी योगदान देणारे संस्थेचे सन्माननिय सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी संस्थेच्या वाढ व विकासासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी व्हा. चेअरमन श्री सुधीर बाबुराव कुंभार, संचालक श्री. नारायण नाना सावंत, श्री. रविंद्र दामोदर दामले, श्री. रणजित ईश्वर पाटील, श्री शिवाजी जिवबा येसणे, श्री. गणपत धोंडीबा जाधव, श्री. सुधीर मधुकर चोडणकर, श्री विश्वजित धोंडीबा मुंज, श्री. राजेंद्र परशराम चंदनवाले, श्री. मुकुंद लक्ष्मण कांबळे, संचालिका सौ. सुनिता सुरेश कुंभार, सौ. सारिका नाथ देसाई, सरव्यवस्थापक श्री. अर्जुन रामा कुंभार त्याचबरोबर संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निधन वार्ता

राजेंद्र सावंत 

शिवाजीनगर/नबापूर आजरा येथील सेवानिवृत्त माजी सैनिक राजेंद्र शंकर सावंत ( वय ५७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले असा परिवार आहे. येथील औषध व्यावसायिक प्रकाश सावंत व बांधकाम विभागाचे सेवन कर्मचारी दिलीप सावंत यांचे ते बंधू होत.

रक्षाविसर्जन उद्या शुक्रवारी सकाळी आहे.

कृष्णा घाटगे

मडिलगे तालुका आजरा येथील कृष्णा जोतिबा घाटगे ( वय ७० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात सुभाष व आनंदा ही दोन मुले, सुना, नातवंडे अशा परिवार आहे.

आशादायक…

वाहतूक शिस्तप्रकरणी नगरपंचायत ॲक्शन मोडवर आली असून वनवेसह ठीकठिकाणी नो पार्किंगची व्यवस्था करण्याचे काम नगरपंचायतीकडून हाती घेण्यात आले आहे. नगरपंचायत ॲक्शन मोडवर आल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येतून शहराला मुक्ती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चिंतनिय….

नगरपंचायतीकडून वारंवार आजरा आंबोली मार्गावर कचरा न टाकण्याबाबत सूचना करूनही स्थानिक रहिवासी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नगरपंचायत आरोग्य विभागाची यामुळे चांगलीच दमछाक होताना दिसते.

 महत्त्वाच्या बातम्या 

♦ इचलकरंजी येथील थोरात चौकातील विकी सुरेश अग्रवाल या सफाई कर्मचाऱ्यांचा डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी मित्र रिमोन आवळे, अलोक देवर्षी व एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

♦ जिल्ह्यातील चार हजाराहून अधिक औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन औषध विक्रीच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

♦ जागतिक पातळीवरील घडामोडींच्या फटका भारतीय रुपयाला बसला असून बुधवारी रुपयात सलग नवव्या सत्रात घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रूपया १३ पैशांनी घसरून ९६.८६ या ऐतिहासिक पातळीवर बंद झाला आहे.

आयपीएल न्यूज

काल झालेल्या कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्यांमध्ये कोलकाताने मुंबईला चार गड्यांनी नामवले.


आजचा सामना

गुजरात विरुद्ध चेन्नई

वेळ ; सायंकाळी ७: ३० पासून


गुण तक्ता

बंगळुरू. १८

गुजरात १६

हैदराबाद. १६

राजस्थान १४

पंजाब १३

कोलकाता १३

चेन्नई १२

दिल्ली १२

मुंबई ८

लखनऊ ८

आजचे पंचांग

दिनांक : २१ मे २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पंचमी (सकाळी ०८.२६ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : पुष्य नक्षत्र (पहाटे ०२.४८ पर्यंत) त्यानंतर आश्लेषा नक्षत्र
योग : गण्ड योग (सकाळी १०.५७ पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : बलवा करण (सकाळी ०८.२६पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : कर्क राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१३ ते दुपारी ०३.५१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत : १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तरुणीची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!