mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार २२ मे  २०२६

सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडाः
: इंधन दरवाढीविरोधात आजरा तालुका कॉग्रेसच्या वतीने आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

देशात सातत्याने वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या महागाईचा तीव्र निषेध नोंदवत, आज आजरा तालुका कॉग्रेसच्या वतीने आजरा येथील मिनर्वा पेट्रोल पंप येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.

वाढत्या इंधन दरामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली असून, याचा थेट फटका शेतकरी, कामकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या बजेटला बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट पेट्रोल पंपावर नागरिकांना पत्रक वाटून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
वाढत्या इंधनामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.’पेट्रोल-डिझेलचे दर तात्काळ कमी करा’, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात आजरा नगरपंचायतचे गटनेते अभिषेक जयवंतराव शिंपी, नगरसेवक श्री. असिफ इस्माईल पटेल, नगरसेवक मा. निसार लाडजी, नगरसेवक श्री. असिफ सोनेखान, नगरसेवक श्री. विक्रम पटेकर, सामाजीक कार्यकर्ते श्री. इब्राहीम इंचनाळकर, श्री. अमित खेडेकर, श्री. सुफियान खेडेकर, श्री. मुज्जमिल खेडेकर तसेच कॉग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हिंद भारतीय कामगार सेनेच्या आजरा शहर प्रमुख पदी बिलाल लतीफ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिवसेनेच्या हिंदू भारतीय जनरल कामगार सेनेच्या आजरा शहर प्रमुख पदी बिलाल हुसेन लतीफ यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू सांगावकर व शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी त्यांना दिले आहे.

हात्तीवडे येथे आज लेझीम स्पर्धा

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

ग्रामस्थ मंडळ हात्तीवडे व मुंबईकर, सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळ यांच्या वतीने लक्ष्मी यात्रेनिमित्त शुक्रवार दिनांक २२ मे रोजी रवळनाथ मंदिर पटांगण येथे महिलांच्या लेझीम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे१०,००१/-,७०००/-,५०००/-,३०००/-१५००/- रुपये रोख व शील्ड देऊन गौरवण्यात येणार आहे .

छाया वृत्त

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत राधानगरी, भुदरगड आजरा विधानसभा क्षेत्र समितीपदी इंद्रजीत रावसाहेब देसाई यांची नियुक्ती झाल्याबद्दल स्वागत करताना उपविभागीय अधिकारी हरेश सूळ,अर्जुन आबिटकर , समिती अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, भुदरगड तहसीलदार डॉ. अर्चना पाटील. यावेळी राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

निधन वार्ता… कमळाबाई चौगुले

वाटंगी ता. आजरा येथील कमळाबाई धोंडीराम चौगुले (वय ६५ वर्षें )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील रवींद्र व युवराज यांच्या त्या आई होत.

 महत्त्वाच्या बातम्या 

♦ सोशल मीडियावर झालेल्या कमेंटचा राग मनात धरून जयसिंगपूर येथे साहिल झाकीर काजी याचा भर दिवसा चाकूने वार करून खून करण्यात आला.या प्रकरणी राजू लक्ष्मण कांबळे ( वय ३० राहणार शाहूनगर, जयसिंगपूर ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

♦ शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रजनीश कमलाकर उर्फ डॉ. आर. के. कामत यांची निवड करण्यात आली आहे. ते शिवाजी विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू आहेत.

♦ सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीने खळबळ माजवली असून इन्स्टावर ५ दिवसात तब्बल एक कोटी ३५ लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे.

♦ वास्तुशांती कार्यक्रमाला आलेल्या महिलेचे दोन लाखांचे गंठण अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना लिंगनूर ता. गडहिंग्लज येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

आयपीएल न्यूज

काल झालेल्या सामन्यात गुजरातने चेन्नईचा दारुण पराभव केला. २२९ गावांचे उद्दिष्ट करताना चेन्नईचा डाव १४० धावात गुंडाळला. यामुळे आता चेन्नईचा परतीचा प्रवास स्पष्ट झाला आहे.


गुण तक्ता

बंगळूर १८
गुजरात १८
हैदराबाद १६ राजस्थान १४
पंजाब १३
कोलकाता १३
चेन्नई १२
दिल्ली १२
मुंबई ८
लखनौ ८


आजचा सामना

हैदराबाद विरुद्ध बंगळुरू

वेळ : सायंकाळी ७.३० पासून

आजचे पंचांग

दिनांक : २२ मे २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : षष्ठी (सकाळी ०८.२४ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : आश्लेषा नक्षत्र (२३ मे पहाटे ०२.०७ पर्यंत) त्यानंतर मघा नक्षत्र
योग : वृद्धि योग (सकाळी ०८.१८ पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
करण : तैतुला करण (सकाळी ०६.२४ पर्यंत) त्यानंतर गराजा करण (सायंकाळी ०५.३८ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : कर्क राशी (२३ मे पहाटे ०२.०७ पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५७ ते दुपारी १२.३५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

mrityunjay mahanews

झेप ॲकॅडमीचे मंगळवारी आजरा शाखा उद्घाटन

mrityunjay mahanews

अल्पवयीन मुलीला दमदाटी व विनयभंग केल्याप्रकरणी चव्हाणवाडी येथील तिघा विरोधात गुन्हा नोंद…एकाचवेळी दोन हत्ती वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर…सुलगाव व वेळवट्टी येथील प्रकार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वाटंगी येथे आमदार खासदारांना रोखले…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!