mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार २७ एप्रिल २०२६

मोटर केबल चोरट्यांचा धुमाकूळ...
किणे येथे दहा शेतकऱ्यांची ५७ हजार रुपये किमतीची केबल चोरीला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

किणे ता.आजरा येथे मोटरची केबल चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घालत दहा शेतकऱ्यांची ५७ हजार रुपये किमतीची मोटरची केबल रातोरात लंपास केली. याप्रकरणी पांडुरंग महादेव शेंदरकर रा.किणे यांनी आजरा पोलिसात तक्रार दिली आहे.

अज्ञात चोरट्यांनी पांडुरंग शेंदरकर, संजय गुडूळकर, श्रीकांत बामणे, शिवाजी कांबळे, सागर कांबळे,मारुती दळवी, सचिन भातखंडे, ज्योतीराम दळवी, अक्काताई कांबळे, मारुती गिलबिले यांच्या मालकीची तार ओहोळ नदी काठावरील सदर केबल लंपास केली.

अज्ञातांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार राहुल पन्हाळकर पुढील तपास करीत आहेत.

चार चाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

रस्ता ओलांडताना भरधाव चारचाकीने धडक दिल्याने प्रशांत तुकाराम कोटकर (रा. हाजगोळी खुर्द वय ५३ वर्षे) हे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. आजरा गडहिंग्लज मार्गावरील हाजगोळी फाट्यानजीक सदर अपघात झाला. कोटकर यांच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते हाजगोळीचे उपसरपंच आहेत.

आचारी, मंडप मिळेनात…
उद्यापासून लक्ष्मी यात्रांचा धूमधडाका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यासह परिसरातील सुमारे पंधरा गावच्या महालक्ष्मी यात्रांचा धुमधडाका उद्यापासून सुरू होत असून एकाच वेळी होणाऱ्या या यात्रांसह विवाह समारंभ, वास्तुशांती कार्यक्रम यामुळे मंडपासह आचारी मिळणे अडचणीचे होऊन बसले आहे. अनेक जण आचाऱ्यांचा शोध घेत फिरत आहेत.

येत्या आठवडाभरात साळगाव, लाकूडवाडी, यमेकोंड, कोळिंद्रे, पोश्रातवाडी, हांदेवाडी, सोहाळे यासह गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील ठिकठिकाणीच्या महालक्ष्मी यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

गतवेळच्या पावसाचा अनुभव विचारात घेऊन मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणाऱ्या या यात्रांमुळे मंडप डेकोरेटर्स, आचारी यांची कमतरता भासू लागली आहे. ऐनवेळी मुंबई- पुणे येथून येणाऱ्या स्थानिक नागरिकांचे यामुळे चांगलेच हाल होत आहेत. आचारी कॅटरिंगवाले शोधताना वणवण करावी लागत आहे.

गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम

ज्यांना गॅस सिलेंडरचा वापर करून जेवण बनवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशा मंडळींचे सिलेंडर मिळवताना चांगलेच हाल होत आहेत. सिलेंडर पुरवठा अद्यापही सुरळीत नसल्याने दोन-चार दिवसावर यात्रा आली तरीही गॅसच्या रांगेत अनेक जण दिसत आहेत.

अवजड वाहनांनी लावली रस्त्यांची वाट

वाटंगी रस्त्याची दुर्दशा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खडी वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांनी आजरा वाटंगी रस्त्याची दुर्दशा तर केली आहेच परंतु दिवसभर आजरा शहरातील वाहतुकीची कोंडी करण्यास सदर वाहने जबाबदार ठरत असल्याने ही तालुका वासियांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.

ओव्हरलोड धावणारी वाहने, त्यातून खाली पडणारी खडी व अवजड वाहने विचारात न घेता केलेले रस्ते यामुळे रस्त्यांची पूर्णपणे दुर्दशा होऊ लागली आहे.

आजरा हायस्कूलचे गणित प्रज्ञा परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुख्याध्यापक संघ व गणित विषय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५ – २६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीनिवास रामानुजन गणित प्राविण्य प्रज्ञा परीक्षेमध्ये आजरा हायस्कूल आजाराचा विद्यार्थी कुमार अर्जुन सुरजकुमार नार्वेकर हा प्रज्ञा प्राप्त झाला असून त्याने जिल्ह्यामध्ये २४ वा क्रमांक पटकावला आहे. अर्जुनला श्रीनिवास रामानुजन गणित प्रज्ञा प्रमाणपत्र शिष्यवृत्ती व शील्ड प्राप्त झाले आहे .त्याला आजरा हायस्कूलचे शिक्षक श्री. आर.पी. केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

चांदेवाडी येथे आजपासून हरिनाम सप्ताह

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चांदेवाडी गावच्या हरीनाम सप्ताहास आज दि.२७ पासून सुरुवात होत असून सप्ताह २८/०४/२०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

कार्यक्रम खालीलप्रमाणे ..
दि.२७/०४/२०२६ सोमवार रोजी.सकाळी ६.३० वाजता श्री.विठ्ठल रुख्मिणी मुर्तिस अभिषेक व पुजा
सकाळी ८.०० वाजता ज्ञानेश्वरी व फोटो पुजन करून दिंडी सोहळा ला सुरुवात दिंडी करीता चांदेवाडी भजनी मंडळ.सुलगांव.खेडे व सर्व ग्रामस्थ चांदेवाडी.
१२.०० वाजता दिंडी सोहळा समाप्त होईल.तद्नंतर सर्वांना फराळ वाटप होईल.
दुपारी २.००वाजता.ह.भ.प श्री.सागर कसलकर महाराज यांचे आधिपत्याखाली ज्ञानेश्वरी पारायण होईल.
सायं.५.००वाजता ह.भ.प श्री.पाडुरंग सुतार महाराज यांचे आधिपत्याखाली व चांदेवाडी भक्तजन यांचा हारीपाठ .
रात्री ९.०० वाजता.ह.भ.प श्री. डॉ.पन्हाळकर महाराज बामणे यांचे किर्तन होईल.किर्तन करिता सुलगांव साळगांव वेळवट्टी जाधेवाडी पेरणोली
या गावच्या दिंडी उपस्थित राहतील.
रात्री १२.०० नंतर जागर खेडे सुलगांव मुंगुस वाडी भजनी मंडळ.
दि.२८/०४/२०२६ मंगळवार रोजी.पहाटे ५.००वाजता.काकड आरती. उपस्थितीत सर्व महिला चांदेवाडी.
सकाळी ८.३० वाजता ह.भ.प.श्री. जाधव महाराज यांचे काल्याचे किर्तन. सकाळी ११.०० वाजता . महाप्रसाद वाटप होईल.
वरील प्रमाणे सर्व कार्यक्रम ह.भ.प श्री.विठ्ठल कुंभार महाराज व ह.भ.प श्री.नारायण सुतार महाराज यांचे मार्गदर्शनाखाली होईल.

 आजचे पंचांग 

दिनांक : २७ एप्रिल २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : एकादशी (सायंकाळी ०६.१५ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (रात्री ०९.१८ पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
योग : ध्रुव योग (रात्री ०९.३५ पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
करण : विस्ती भद्रा करण (सायंकाळी ०६.१५ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : सिंह राशी (२८ एप्रिल पहाटे ०३.३५ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५० ते सकाळी ०९.२५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.१४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८

आयपीएल न्यूज

गुजरात विरुद्ध चेन्नई सामन्यांमध्ये गुजरातने चेन्नईला आठ गड्यांनी पराभूत केले. तर बरोबरीत सुटलेल्या सामन्यात सुपर ओव्हर मध्ये कोलकताने लखनौला नमावले

आजचा सामना

दिल्ली विरुद्ध बंगळूरू
वेळ : दुपारी ३.३०

गुण तक्ता- पहिले चार संघ

१. पंजाब -१३ गूण
२. बंगळुरू -१० गुण
३. हैदराबाद-१० गुण
४. राजस्थान-१० गुण

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजच्या बातम्या

mrityunjay mahanews

विधानपरिषद जोडणीसाठी राज्यमंत्री सतेज पाटील आजऱ्यात

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!