mrityunjaymahanews
अन्य

रविवार – सातच्या बातम्या

रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२६ 

कोरीवडे येथे गव्यांकडून भात पिकांचे नुकसान.

आजरा : प्रतिनिधी

कोरीवडे (ता. आजरा) येथे रानगवे यांच्या कळपाने चांगलाच धुडगूस घातला आहे. कापणीला आलेली उभी पिके गव्याकडून फस्त होत आहेत. गोव्याच्या कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

तिठ्ठा या जंगलात गव्यांचे कळप वास्तव्याला आहेत. सायंकाळच्या दरम्यान हे कळप जंगलातून उतरतात व उभ्या पिकात शिरतात. कापणीला आलेली पिके फस्त करून टाकत आहेत. आधीच दुष्काळामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आलेली असताना. रानग्याकडून होत असलेल्या नुकसान मुळे शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही असे चित्र आहे. नावा शेतातील तातेराव पाटील रघुनाथ पाटील यांच्या भात पिकाचे गळ्याच्या करताना नुकसान केले आहे . वन विभागाने याची पाहणी केली आहे. गवळ्यांच्या कळपासोबत तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

आजरा  रिक्षा चालक-मालकांचा सोमवारी बंद

आजरा : प्रतिनिधी

आजरा शहरातील सर्व रिक्षा सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ५.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. रिक्षा मित्र मंडळ, आजरा यांच्यावतीने याबाबत आजरा तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

रिक्षा व्यवसाय हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

रिक्षा चालक-मालकांच्या प्रमुख मागण्या :

मशिनद्वारे केल्या जाणाऱ्या पासिंगमधून रिक्षांना वगळणे.

ई-रिक्षांना परमिट बंधनकारक करण्यात यावे.

गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तीन तालुक्यातील सर्व रिक्षांचे पासिंग पूर्वीप्रमाणे गडहिंग्लज शहरात आर.टी.ओ. कॅम्पद्वारे करण्यात यावे.

रिक्षा व्यावसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात यावी.

यावेळी रिक्षा मित्र मंडळाचे अध्यक्ष  प्रकाश रेडेकर, उपाध्यक्ष तनवीर मकानदार, सेक्रेटरी समीर चौगुले, सदस्य  जावेद दरवाजकर, उत्तम जाधव, सखाराम सोंडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

वांटगी परिसरात  तीन वनराई कच्च्या बंधाऱ्यांची  बांधणी

आजरा : प्रतिनिधी,

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज आणि परम पूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेतून, रामानंद संप्रदाय आजरा तालुका सेवा समितीच्या वतीने शनिवारी (दि. २१) वांटगी या परिसरात सामाजिक उपक्रमाअंतर्गत तीन वनराई कच्चे बंधारे बांधण्यात आले. दुष्काळजन्य परिस्थितीत राबवलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

रामानंद संप्रदाय आजरा तालुका सेवा समितीच्या वतीने अशा प्रकारे एकूण १५ वनराई बंधारे बांधण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे व त्यातील ७ पूर्ण झाले आहेत ज्याचे ग्रामस्थांमधून स्वागत होत आहे.

या उपक्रमात कोल्हापूर जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख श्री. महेश पाटील, आजरा तालुका अध्यक्ष श्री. आकाराम देसाई, आजरा तालुका सचिव श्री. शिवाजी सरंबळे, आजरा तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख श्री. महादेव कुंभार, आजरा तालुका धर्मक्षेत्र प्रमुख वैभव तेरसे, वांटगी आरती केंद्र प्रमुख गंगाराम माटले‌ व सुवर्णा गिलबिले, श्रीमंता गाईंगडे, सिंधू चौगुले, इंदूताई कसलकर, भिमराव गाडीवडर, संजय जाधव, दिपक सरंबळे उपस्थित होते.

महिला-बालकल्याण निधीतून अंगणवाड्यांना पोषण आहार साहित्य वाटप.

उत्तूर : प्रतिनिधी

ग्रामपंचायत कसबा उत्तूरच्या १० टक्के महिला व बालकल्याण निधीतून गावातील सर्व अंगणवाड्यांना पोषण आहार शिजविण्यासाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची व्यवस्था अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने ग्रामपंचायतीकडून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी सरपंच किरण शंकर आमनगी, उपसरपंच सुनीता हत्तरगे, ग्रामपंचायत अधिकारी सचिन येसादे, सदस्य राजाराम खोराटे, भैरू कुंभार, महेश करंबळी, संभाजी कुराडे, संदेश रायकर, सुशांत आमनगी तसेच मारुती सावंत, संजय हत्तरगे व सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.यावेळी सुनिता जांभळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

निधन वार्ता

जयसिंग जाधव

आमराई गल्ली / शिवाजीनगर येथील जयसिंग बाळू जाधव (वय ७० वर्षे ) यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुले, मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.

जकोबा गाइंगडे

कोळींद्रे ता. आजरा येथील जगबा बाबू गायंगडे ( वय ८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग

दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी (२३ नोव्हेंबर पहाटे ०२.३६ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : अश्विनी नक्षत्र (२३ नोव्हेंबर पहाटे ०४.१५ पर्यंत) त्यानंतर भरणी नक्षत्र
योग : व्यातीपात योग (२३ नोव्हेंबर रात्री ०१.२९ पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
करण : कौलव करण (दुपारी ०३.५१ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : वृश्चिक राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सायंकाळी ०४.३५ ते सायंकाळी ०५.५८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०२ ते दुपारी १२.४७
सूर्योदय : सकाळी ०६.५१
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

विजय गवंडळकर यांचे निधन

mrityunjay mahanews

सातची बातमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखाना निवडणूक अपडेट

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!