रविवार १९ एप्रिल २०२६

संयुक्त शिवजयंती निमित्त आजऱ्यात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संयुक्त शिवजयंती निमित्त आज रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी आजरा शहरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सकाळी आठ वाजता शिवतीर्थावर महाराजांच्या अश्वारूढ मुर्तीस अभिषेक घालण्यात येईल व त्यानंतर पाळण्याचा कार्यक्रम होईल.
सायंकाळी पाच वाजता व्यंकटराव हायस्कूल येथून संयुक्त शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ होईल. मिरवणुकीमध्ये महाराजांची पालखी, हलगी वादन, मर्दानी खेळ, लेझीम पथक, लहान मुलांच्या वेशभूषा, वारकरी दिंडी, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास शहरवासीय व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

ब्रह्माकुमारीज् आजरा केंद्रा मार्फत मान्यवरांचे सत्कार

ब्रह्माकुमारी आजरा या ठिकाणी नूतन जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती उपसभापती व सदस्य, तसेच कारखाना व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल अनिल फडके यांचा स्नेहमिलन व सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या संचालिका ब्रह्माकुमारी गीता बहन जी ( खेड/ रत्नागिरी ) जिल्हा रत्नागिरी, ब्रह्माकुमारी संचालिका संध्या बेहेनजी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार पार पडला. यावेळी उपस्थित सभापती सौ. जयश्री गाडे , यशोदा युवराज पोवार , जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, पंचायत समिती सदस्य समीर पारधे , पंचायत समिती सदस्य विकास चोथे , आजरा कारखाना व्हाईस चेअरमन अनिल फडके उपस्थित होते.
सूत्रसंचालन विनायक भाई यांनी केले कार्यक्रमाचा उद्देश व प्रस्तावना देऊळवाडी गावचे उपसरपंच व ब्रह्माकुमारीचे सदस्य संजूभाई यांनी केले ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय चा परिचय ब्रह्माकुमारी मनीषा बहेनजी कोवाड संचालिका यांनी दिला. अखंड बालब्रह्मचारी राज योगी संध्या बेहेनजी यांनी सर्वांना आशीर्वचन दिले.
जीवनामध्ये मेडिटेशन चे महत्व काय आहे याचे प्रात्यक्षिक गीता बहन जी यांनी करून घेतले सर्व समस्यावर शांती हाच उपाय आहे असे परखड मत यावेळी गीता बहेनजी यांनी मांडले.
सुधीर देसाई व शिरीष देसाई यांनी मनोगते व्यक्त केली.

व्यंकटराव हायस्कूलचे मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत घवघवीत यश
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी मराठी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत यश संपादन केले.
मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून मराठी भाषेच्या आणि मराठी विश्वकोशाच्या प्रचार व प्रसाराकरिता ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळ,वाई, सातारायांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम राबवण्यात आला. या स्पर्धेत व्यंकटराव हायस्कूल, आजरा मधील इयत्ता नववी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.शहरी शाळांतून राज्यस्तर, जिल्हा स्तर व तालुकास्तरअशा तिन्ही स्तरावर विद्यार्थी यशस्वी झाले आहेत
शहरी राज्यस्तर तृतीय क्रमांक
कु. प्रतीक रमेश येसणे
जिल्हा स्तर प्रथम
कु. ध्रुव राजाराम हरमळकर
कु. संस्कृती धनाजी इलगे
जिल्हास्तर द्वितीय
कु. रुद्र विशाल गुरव
शहरी तालुकास्तर प्रथम
कु. सृष्टी सुनील भिकले
कु. आस्था सचिन गुरव
कु. विभावरी विक्रम जावळे
कु.तृप्ती पांडुरंग नवार
तालुकास्तर द्वितीय
कु. अमृता बाळकृष्ण दोरूगडे
कु. अन्मया रणजीत देसाई
कु. आर्या अशोक कांबळे
कु. आयुष ओमकार गिरी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विजेत्या स्पर्धकांना राज्यस्तर तृतीय क्रमांकाला रोख रक्कम १०,००० रु. व प्रमाणपत्र , जिल्हास्तर प्रथम क्रमांक रोख रक्कम ३००० रु. व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक २००० रु.व प्रमाणपत्र तालुकास्तर प्रथम क्रमांक रोख रक्कम १००० रु. व प्रमाणपत्र , द्वितीय क्रमांक ७५०रु. व प्रमाणपत्र , तृतीय क्रमांक ५०० रु. व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .
या स्पर्धेसाठी शाळेतील इयत्ता नवावीचे एकूण २२विद्यार्थी बसले होते . सादर परीक्षा ही आॕनलाईन स्वरूपात घेण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे . यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मराठी विषय शिक्षिका श्रीमती एस. के, कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

आजरा मर्चंटस् सोसायटीला ४६ लाख ९२ हजारांचा नफा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा मर्चेंटस् को- आप क्रेडिट सोसायटी लि. आजरा या संस्थेला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४६ लाख ९२ हजार इतका ढोबळ नफा झाला आहे. अशी माहीती संस्थेचे अध्यक्ष रमेश महादेव कारेकर यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली.
संस्थेकडे १९ कोटी ६९ लाख ९८ हजार इतक्या ठेवी आहेत. १३ कोटी ४५ लाख ८० हजातर इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे. ९ कोटी २१ लाख १७ हजार इतकी गुंतवणूक आहे. कर्ज थकबाकी ०.४७ टक्के, ठोबळ एनपीए ०.४७ टक्के व निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. आडीट वर्ग सतत ‘अ’ वर्ग आहे. संस्थेचा वार्षिक व्यवसाय ८२ कोटी ३२ लाख ७२ हजार इतका झाला आहे. संस्थेचे खेळते भाडंवल २३ कोटी ८९ लाख १७ हजार इतका आहे. संस्थेच्या महागाव, तारळे, राशिवडे बुद्रुक, मलकापुर येथे शाखा आहेत. संगणीकृत आहेत. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरज जाधव, ज्येष्ठ संचालक बसवराज गुजांटी, दिवाकर नलवडे, शिवलिंगाप्पा तेरणी, गोपाळ पाटील, रुद्राप्पा पाटील, गोपाळ जाधव, शामराव कारंडे, ऋषीकेश महाळंक, संचालिका श्रीमती उमा हुक्केरी, सौ.स्मिता टोपले व व्यवस्थापक गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.

निधन वार्ता
श्रीपाद मायदेव

आजरा येथील श्रीपाद दत्तात्रय मायदेव (वय ९३) यांचे कल्याण (मुंबई) येथे निधन झाले. स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे माजी व्यवस्थापक नाना मायदेव यांचे ते चुलते होत.
त्यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवारी सकाळी कल्याण येथे आहे.
राजाराम पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे या.आजरा येथील मुंबई स्थित राजाराम सखाराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असे. पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे ते कट्टर कार्यकर्ते होते.

छाया वृत्त

महालक्ष्मी यात्रा कांही दिवसावर येऊन ठेपली असताना गावच्या प्रवेश द्वारावरच सुरू असणारे रस्त्याचे काम व बंधाऱ्यावरून करण्यात आलेली वाहनांना प्रवेश बंदी यामुळे साळगावकरांचे टेन्शन वाढले आहे.
तूर्तास बंधाऱ्याचे डागडुजीचे काम पूर्णत्वास जाणे अशक्य असले तरी रस्त्याचे काम यात्रे पूर्वी होईल अशी अपेक्षा साळगावकर व्यक्त करत आहेत.
आजचे पंचांग
दिनांक : १९ एप्रिल २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वितीया (सकाळी १०.४९ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : भरणी नक्षत्र (सकाळी ०७.०९ पर्यंत) त्यानंतर कृत्तिका नक्षत्र
योग : आयुष्मान योग (रात्री ०८.०१ पर्यंत) त्यानंतर सौभाग्य योग
करण : कौलव करण (सकाळी १०.४९ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मेष राशी (दुपारी १२.३० पर्यंत) त्यानंतर वृषभ राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.२१ ते सायंकाळी ०६.५६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.२०
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
हैदराबादने शनिवारी झालेल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला दहा धावांनी पराभूत केले. इशान मलिंगा सामनावीर ठरला.
तर बंगळूरु येथे झालेल्या दिल्ली विरुद्ध बंगळुरू या चुरशीच्या सामन्यामध्ये दिल्लीने बंगळूरला सहा गड्यांनी पराभूत केले. ट्रिस्टन स्टब्स सामनावीर ठरला.
आजचे सामने
कोलकता विरुद्ध राजस्थान स्थळ : कोलकता. वेळ : दुपारी ३.३० पासून
पंजाब विरुद्ध लखनौ स्थळ : न्यू चंदिगड. वेळ : सायंकाळी ७.३० पासून



