mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार २० एप्रिल २०२६

आजऱ्यात शिवजयंती उत्साहात :
मिरवणूकांनी शहर दणाणले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरात आज संयुक्त शिवजयंती सोहळा पारंपारिक पध्दतीने व उत्साहात झाला.

सकाळी शिवजन्मोत्सव शिवतीर्थ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित महिलांसह शिवप्रेमींनी पाळण्यासह विविध गीतांचे सादरीकरण केले. सायंकाळी झालेल्या मिरवणूक प्रसंगी आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते छ. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. येथील व्यंकटराव हायस्कूल पासून शिवजयंतीला सुरूवात झाली. संभाजी चौक, मुख्य बाजारपेठ मार्ग मिरवणुक शिवतिर्थावर गेली. बोलकेवाडीचे महीला लेझीम पथक व वेगरूळ येथील मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक या वेळी सादर करण्यात आली. जोरदार आतषबाजी करण्यात आली.

यावेळी उपनगराध्यक्षा पुजा डोंगरे, नगरसेवक परशराम बामणे, अभिषेक शिंपी, अनिकेत चराटी, डॉ. स्मिता कुंभार, असिफ सोनेखान, सरफराज पटेल, अश्विनी चव्हाण, विक्रम पटेकर, आनंदा कुंभार, विजयकु‌मार पाटील, विलास नाईक, सुधीर कुंभार, बाळ केसरकर, किरण कांबळे, विजयभाऊ थोरवत, संजय चव्हाण, अतुल पाटील, परेश पोतदार, अश्विन डोंगरे, प्रभाकर कोरवी, संजय सावंत, शरीफ खेडेकर, गौरव देशपांडे, मयूर कुंभार, अभिजीत रांगणेकर यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते.

दरम्यान वाघाची तालीम मंडळाच्या वतीने स्वतंत्र सवाद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची दणक्यात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये शैलेश पाटील, आकाश पाटील, राहुल नाईक, विजय थोरवत, संतोष भाटले, शिरीष देसाई, नितीन कांबळे, शरीफ खेडेकर, इंद्रजीत देसाई, संतोष गिरी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ‌.

कोरीवडे येथे आजोबा की नातू…?
दामाजी पाटील विरुद्ध विवेक पाटील लढत लक्षवेधी ठरणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोरीवडे ता. आजरा  ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक मोठ्या चुरशीने होत असून नात्याने नातू विवेक दिगंबर पाटील व आजोबा दामाजी पाटील यांच्यातील लढत ही चुरशीची होणार आहे.

माजी सरपंच शिवाजी पाटील यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्याने कोरीवडे ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागली आहे. विवेक पाटील यांच्या प्रचाराची सूत्रे संतोष पाटील, दत्तात्रय पाटील, सयाजी नार्वेकर, बबन चौगुले, विश्वास मिसाळ, संदीप रायकर, डि.के.कांबळे आदी मंडळी तर दामाजी पाटील यांच्या प्रचाराची सूत्रे तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष डी.ए. पाटील, राजाराम पाटील यांच्यासह पालकमंत्री आबिटकर व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक कार्यकर्ते सांभाळत आहेत.

एकूण ७५६ इतके मतदान आहे. दुबार मतदान व बाहेरगावी असणाऱ्या मतदारांची संख्या विचारात घेता ६५० इतके मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अखेर चाफेगल्ली रस्त्याचे काम सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील चाफे गल्लीतील बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या गटर्सच्या व रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष अशोक चराटी यांच्या हस्ते पार पडला. चाफे गल्लीतील बऱ्याच वर्षापासून साचलेल्या गटरच्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला होता. पालकमंत्री आमदार प्रकाश आबिटकर आणि प्रा.अर्जुन अबिटकर, अशोक चराटी यांनी  नवीन गटर व रस्ता मंजूर केला.

वार्ड क्रमांक १७ च्या नगरसेविका सौ. पूनम किरण लिचम, विलास नाईक, चाफे गल्लीतील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच विजय केसरकर, किरण पवार, अरुण सुरंगले, रवि जाधव ,विशाल पटेकर, रोहन पारपोलकर, योगेश पवार, प्रशांत जाधव, चेतन शिवगंड ,विजय पाटील सचिन पवार ,सतीश जाधव , अंकुश चौगुले चंदू निकम, विनोद पाटील, धनाजी पाटील, किरण लिचम ,अनिल नांदवडेकर, बाळू पवार, नितीन शिवगंड, प्रकाश पावस्कर, संभाजी मनगुतकर, रामचंद्र लिचम,  श्रीपती जाधव, लिंगू गुंडू पाटील, प्रकाश जाधव, लुईस फर्नांडिस इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

वाटंगी फाट्यावरुन जाणार त्याच्या वाहनांना दणका बसणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – वाटंगी मार्गावर वाटंगी फाट्या नजीक चित्रानगर जवळ आजऱ्याकडून नेसरी कडे जाताना मोरी वर नव्याने सुरू असलेल्या रस्त्याच्या उंचवट्यावर मूळ रस्त्याला जोडणाऱ्या भागावर भराव न टाकल्याने वाहने सिमेंट रस्त्यावरून खाली येताना दणकत असून यामुळे वाहनांचे नुकसान तर होत आहे परंतु वाहन चालक व प्रवाशांनाही याचा त्रास होत आहे.

अवजड वाहने तसेच चारचाकीगाड्या, दुचाकी वाहने रोडचा अंदाज न आल्याने जोराने आदळत आहेत दुचाकी स्वारांबाबत तर अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.

रस्ता बांधकाम करणाऱ्या संबंधित कंपनीने बऱ्याच ठिकाणी बोर्ड, बॅरिकेट न लावता काम केलेले आहे. दिवसा तसेच रात्री या रोडवरून लहान वाहनांनी वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे. रस्त्याला जोडणाऱ्या भागांमध्ये भराव टाकावा अशी मागणी होत आहे.

निधन वार्ता
गंगुबाई काणेकर

मडिलगे ता. आजरा येथील गंगुबाई गोपाळ काणेकर ( वय ८० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उत्तम काणेकर यांच्या त्या आई होत.

विठाबाई आजगेकर


विठाबाई जयराम आजगेकर (वय ८० वर्षे ) रा. होनेवाडी तालुका आजरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा सुनिल, सुना, तीन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

छाया वृत्त 

नालासोपारा- आजरा एसटी बस फेरी चालू झाली आहे तरी  मुंबईसह आजरा तालुक्यातील प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा व एसटी नेच प्रवास करावा असे  आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

 आजचे पंचांग 

दिनांक : २० एप्रिल २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : तृतीया (सकाळी ०७.२७ पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : रोहिणी नक्षत्र (पहाटे ०२.०८ पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
योग : सौभाग्य योग (सायंकाळी ०४.१० पर्यंत) त्यानंतर शोभन योग
करण : गराजा करण (सकाळी ०७.२७ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण (सायंकाळी ०५.४९ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : वृषभ राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५४ ते सकाळी ०९.२८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१२ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.१९
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज

कोलकताने राजस्थानला चार गड्यांनी नमवत पहिला विजय मिळवला. या विजयामुळे गुणतक्त्यात मुंबईला फटका बसला असून मुंबई सर्वात खालच्या स्थानावर आली आहे.

दरम्यान सुरुवातीपासूनच फार्मात असणाऱ्या पंजाबने लखनौचा ५४ धावांनी पराभव केला प्रियांश आर्य सामनावीर ठरला.

आजचा सामना

गुजरात विरुद्ध मुंबई
स्थळ : अहमदाबाद.                                     वेळ : सायंकाळी ७.३० पासून

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

भावेवाडी येथे अपघातात जेऊर येथील एक जण ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातला बातमी… एक वाजता स्टॅन्ड चकाचक

mrityunjay mahanews
error: Content is protected !!