बुधवार दिनांक ३० एप्रिल २०२५



जल्लोष आणि जल्लोषच…
शिवजयंतीही दणक्यात
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी शिवजयंतीचे औचित्य साधून दणक्यात महिलांच्या शोभायात्रेसह मिरवणूक पार पडली. दोन सत्रामध्ये झालेल्या या कार्यक्रमांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये महिला वर्गाने विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणासह जंगी शोभायात्रा काढली.
आजरा शहरासह तालुक्यातील महिला या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लेझीम, फुगड्या, लाठी काठी यासह विविध कार्यक्रमांचे सादरीकरण युवतींनी केले. दुचाकी वर पारंपारिक वेशात स्वार होऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणाऱ्या युवती मिरवणुकीचे खास आकर्षण ठरल्या.
शहरवासीयांनी या शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यंकटराव हायस्कूल येथून ही शोभायात्रा निघाली.
सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये वाघाची तालीम या मंडळाने नेत्र दीपक विद्युत रोषणाई व डॉल्बीची व्यवस्था केली होती. तरुणाई डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरून जल्लोष करताना दिसत होती.
शिवाजीनगर येथील नामदार प्रकाश आबिटकर प्रेमी कार्यकर्त्यांनी हरियाणा येथून आणलेल्या अघोरी या कार्यक्रमास उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
मिरवणुकीतील नंदी, महाकाली, शंकर, पार्वती, कांतारा यासह अघोरी नृत्य प्रकारांचे सादरीकरण नेटक्या पद्धतीने केले जात होते.रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती.

आज बुधवारी सकाळी संभाजीराव भिडे गुरुजी व वारकरी संप्रदायाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता श्री शिवतीर्थ आजरा येथे सर्वांसाठी महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे.

‘आजरा’ च्या साखर वाटपाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याकडून सभासद साखर वाटपाला आज सोमवारपासून शुभारंभ करण्यात आला. आजरा तालुका शेतकरी संघाच्या तालुक्यातील शाखांच्या माध्यमातून साखर वितरण करण्यात येणार आहे. आजरा येथे चेअरमन मुकुंदराव देसाई व तज्ज्ञ संचालक रशिद पठाण यांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन करून सभासद साखर वितरणाला प्रारंभ करण्यात आला.
याबरोबरच तालुका संघाच्या शिरसंगी शाखेत व्हा. चेअरमन सुभाष देसाई यांच्या हस्ते साखर वाटपाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आजरा तालुका खरेदी-विक्री संघ संचालक मधुकर यलगार, शिरसंगी शाखा मॅनेजर राजेंद्र कोलेकर, रवळनाथ विकास सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन भीमराव सडेकर, सचिव सुभाष चौगुले, धोंडीबा कुंभार, जगन्नाथ घोरपडे, महादेव देसाई, दत्तात्रय देसाई, प्रताप देसाई, अनिल मुळीक, बाबुराव देसाई, विजय देसाई, रमेश गिलबिले, शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

निधन वार्ता
तुकाराम होडगे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोमवार पेठ,आजरा येथील तुकाराम गोविंद होडगे (वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई , मुलगा
नातवंडे असा परिवार आहे.

उत्तूर मुस्लिम समाजाच्या वतीने दहशतवादी हल्ल्याचा निषेध
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध येथील मुस्लिम समाजाकडून करण्यात आला . अतिरेक्याविरुध्द सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली . नमाज पठणात अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यां निष्पाप बांधवांसाठी प्रार्थना करण्यात आली . यावेळी उत्तूर येथील मुस्लिम समाजाबरोबर बेलेवाडी, चिमणे, धामणे येथील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

शाहीर राजाराम कोपटकर यांची जिल्हा समितीवर निवड

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत बहिरेवाडी येथील शाहीर राजाराम राऊ कोपटकर यांची अशासकीय सदस्य म्हणून जिल्हा निवड समिती मध्ये नियुक्ती झाली आहे.
जवळपास २५ ते ३० वर्षांपासून गडहिंग्लज, आजरा, चंदगड या भागासाठी यापूर्वी कधीही सदस्य पदासाठी निवड झाली नव्हती. चालू वर्षी मानधन सन्मान योजनेत कोपटकर यांची निवड झाली आहे. ते सलग पंधरा वर्षे आजरा तालुक्यात विविध लोककला महोत्सव कार्यक्रम राबवतात, परिसरातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी देतात.लोक कला जतन करुन ठेवण्याचे काम ते सातत्याने करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.

आज उद्घाटन…
श्री भावेश्वरी सह. दूध व्याव. संस्था मर्या, मलिग्रे या नवीन दूध संस्थेचे उद्घाटन श्रीमती अंजना रेडेकर (संचालिका, गोकूळ दूध संघ) यांच्या अध्यक्षतेखाली आमदार श्री. सतेज उर्फ बंटी पाटीलसोो (जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस) यांच्या हस्ते व श्री. मुकूंददादा देसाई
(अध्यक्ष,साखर कारखाना) यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आज बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ठिक ६.०० वाजता…




