गुरुवार दिनांक ३ एप्रिल २०२५



पोक्सोतर्गत आजऱ्यात एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
१४ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीशी ती अज्ञानी असल्याचे माहित असून शारीरिक संबंध ठेवल्याचे उघडकीस आल्याने एहसान शेख या तरुणाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक/पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून सदर प्रकार सुरू होता असेही पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धोंडे पुढील तपास करीत आहेत.


कोळिंद्रे पोश्रातवाडी येथे जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत मार्गदर्शन.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोळिंद्रे- पोश्रातवाडी येथील मयत वारसांच्या नोंदी सात बारा पत्रकी नोंद घालण्यासाठी लागणारी कागदपत्रे व नियमांची माहिती तलाठी गजानन पाटील यांनी खातेदारांना दिली .६ ते २० एप्रिल पर्यंत मयताच्या वारसांनी अर्ज करावेत. दिनांक २१एप्रिल ते १० मे पर्यंत मंडल अधिकारी शासकीय आदेशा प्रमाणे जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत पूर्तता करणार आहेत.
त्यासाठी मयत खातेदारांना कमी करून वारस दाखल करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी मनोहर पाटील, नागोजी पाटील, अशोक शिंदे, पोलिस पाटील युवराज देसाई, दिपक गोंधळी, हरिबा शिंदे, संभाजी देसाई,सुभाष मेतके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


आजरा अर्बनचा १६८१ कोटी रुपयांचा व्यवसाय
अध्यक्ष चराटी व उपाध्यक्ष चव्हाण यांची माहिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा अर्बन बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांच्या सहकार्याने पूर्ण केला आहे. बँकेने गतवर्षी पेक्षा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १२६ कोटी ६६ लाख रुपयाने ठेवीमध्ये वाढ केली असून एकूण १ हजार २५ कोटी रुपये ठेवीचा टप्पा पार केला आहे. बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय १ हजार ६८१ कोटी ५२ लाख रुपये इतका झाला आहे. याच बरोबरीने निव्वळ एनपीएचे प्रमाण हे शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. बँकेने सर्व आवश्यक वैधानिक तरतुदी पूर्ण करून बँकेचा एकूण ढोबळ नफा ९ कोटी ८२ लाख इतका झाला आहे. बँकचे हे यश सभासद, हितचिंतक, ग्राहक व कर्मचारी यांना समर्पित आहे, असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन व आजरा येथील अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक अण्णा चराटी यांनी केले.
चराटी म्हणाले, आजरा अर्बन बँकेस रिझर्व्ह बँकेने तीन नवीन शाखा उघडणेसाठीच्या प्रस्तावास मंजूरी दिली होती. त्याप्रमाणे कर्नाटक राज्यामध्ये बेळगुंदी आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कल्याण (मुंबई) व फुलेवाडी (कोल्हापूर) येथे शाखा सुरू केल्या आहेत. अर्बन बँकामधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल (ठेवी ८५० कोटी रुपयेच्या वरील बँक) जिल्हा स्तरावरील सलग चार वेळा पुरस्कार मिळाला आहे. या वर्षी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यामध्ये सातत्य राखण्याचे काम हे बँकेचे हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले. बँकेने केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना राबविल्या आहेत. बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग यासह विविध सुविधा उपलब्ध आहेत याचा फायदा ग्राहकांनी घ्यावा. तसेच यापुढे बँकेने शेड्यूल्ड दर्जा प्राप्त करणेचे ध्येय निश्चित केले असून त्याप्रमाणे बँकेची घोडदौड सुरू असल्याचेही बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांनी सांगितले. बँकेच्या यशामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अविरत काम केल्यामुळेच बँकेची प्रगती होऊ शकते असे मत बँकेचे व्हा. चेअरमन संजय चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर सहाय्यक सरव्यवस्थापक तानाजी गोईलकर व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स तर्फे नुकसानग्रस्त शाळेला २० हजार रुपयांची आर्थिक मदत

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या ‘ चांगुलपणाची चळवळ ‘ या उपक्रमांतर्गत गडहिंग्लज येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. शाळेच्या दुरुस्तीकरिता संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या हस्ते २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुख्याध्यापक श्री. डी. व्ही. चव्हाण यांनी मदतीचा धनादेश स्वीकारला.
याप्रसंगी संचालक प्रा. विजय आरबोळे यांनी देखील वैयक्तिक ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, सौ. रेखा पोतदार, सीईओ श्री. डी. के. मायदेव यांच्यासह रवळनाथचे अधिकारी व कर्मचारी आणि शाळेचे शिक्षक श्री. एस. डी. चौगुले, श्री. ए. जे. हराडे, श्री. आर. बी. शिंत्रे उपस्थित होते.


निवड…

सरंबळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष रावण यांची बिनविरोध निवड झाली आहे.


पोलीस संचलन..

रामनवमी व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरातून पोलीस संचलन करण्यात आले.यामध्ये पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जमाल सहभागी झाले होते.


टॅलेंट प्लस परीक्षेत व्यंकटराव प्राथमिकचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
टॅलेंट प्लस परीक्षेत व्यंकटराव प्राथमिक शाळेने घवघवीत यश मिळवले असून १४ विद्यार्थी राज्य, जिल्हा,तालुका गुणवत्ता यादीत तर १३ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
यशस्वी विद्यार्थी…
इयत्ता पहिली:
राजवीर युवराज पोवार (१०० पैकी १०० ) राज्यात पहिला,
अविराज दयानंद पाटील (१०० पैकी ९८ )राज्यात दुसरा,
रीतुल विवेक चव्हाण (१०० पैकी ९६) जिल्ह्यात पहिला,
वरद एकनाथ वंजारे (१००पैकी ९४) राज्यात दुसरा,
स्वराली हणमंत गजरकर (१०० पैकी ९२) तालुक्यात पहिली,
एकनाथ नामदेव गुरव (१०० पैकी ९०)
विशेष प्राविण्य…
कनिष्क कुणाल पोतदार (१०० पैकी ९०) विशेष प्राविण्य,अन्विता अजित चौगुले (१०० पैकी ९०) विशेष प्राविण्य, प्रांजल नंदकुमार पाटील (१००पैकी ९० ) विशेष प्राविण्य (१८ विद्यार्थी प्रमाणपत्र धारक)
इयत्ता दुसरी :-
राजनंदिनी सचिन इंदुलकर (१०० पैकी ९८)राज्यात दुसरी,ज्ञाना विलास गवारी (१०० पैकी ९६ ) जिल्ह्यात पहिली,मनस्वी मनोज पंडित (१०० पैकी ९४)जिल्ह्यात दुसरी,
रणवीर रणजीत डोंगरे (९० मार्क विशेष प्राविण्य), विहान वसंत मस्कर(९० मार्क विशेष प्राविण्य), उत्कर्षा अमोल सुतार ( ९० मार्क विशेष प्राविण्य),उर्विता विक्रम देसाई (९० मार्क विशेष प्राविण्य)
इयत्ता तिसरी :-
अद्विता किशोर खोत (२०० पैकी १८० जिल्ह्यात पहिली ), दियती धीरज सनगर (२०० पैकी १६८ तालुक्यात दुसरी),
केतकी रामदास होरटे (२०० पैकी १६४ तालुक्यात चौथी),पार्थ रवींद्र केळकर (१५८ विशेष प्राविण्य), यश संतोष जाधव (१५२ विशेष प्राविण्य ),आर्यन विनोद दळवी (१५० विशेष प्राविण्य)(प्रमाणपत्र धारक ९ विद्यार्थी)
इयत्ता चौथी :-
शौर्य जीवन आजगेकर (२०० पैकी १८० जिल्ह्यात पहिला),रुही राहुल गुडुळकर( २०० पैकी १७६ जिल्ह्यात तिसरी),स्वरा मोहन मोटे(२०० पैकी १७०तालुक्यात पहिली)
विराज संजय कुमार पाटील (विशेष प्राविण्य),विहान रुपेश ढवळ (विशेष प्राविण्य)
(प्रमाणपत्र धारक विद्यार्थी २८)
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व संचालक मंडळ यांचे प्रोत्साहन लाभले तसेच मुख्याध्यापिका चव्हाण यांची प्रेरणा मिळाली.संजीवनी चव्हाण,माधुरी खोत,नयना हासबे ,नीता हरेर,रणजीत देसाई,दीपक डेळेकर ,लता कुंभार ,ऋतिका गजरकर यांचे मार्गदर्शन लाभले.




