mrityunjaymahanews
अन्य

गुरूवार – सातच्या बातम्या

गुरूवार

१८ जून २०२६

आजरा महाविद्यालयात भव्य रोजगार मेळावा; १५ कंपन्यांचा सहभाग, ५३ विद्यार्थ्यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाविद्यालयाच्या मराठी, हिंदी व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात १५ नामांकित औद्योगिक कंपन्यांनी सहभाग घेतला असून सुमारे १०० विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी ५३ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास घाटगे इंजिनिअरिंग ऑटोमेशन सर्व्हिसेसचे संचालक इंजी. रणजीत घाटगे, आकार इंडस्ट्रीजचे अनंत पाटील, अश्विन घोरपडे, कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील, प्रा. मनोजकुमार पाटील, प्रा. प्रज्ञा उपराटे, प्रा. पुंडलिक पाटील उपस्थित होते.

कॅम्पस मुलाखतींमध्ये सत्यजित मेकॅनिझम, रत्ना उद्योग, ॲडव्हान्स मेजरिंग, मेनन बेअरिंग, मेनन अल्कोप, सिएनुमेरो इंडिया, आकार फाऊंड्री, एस. के. प्रिसिजन, अच्युरेट मेजरिंग, टाटा आयटीटीएफ, कॉन्सेंट्रिक पंप, दुर्गा मॅक टेक, ट्रिनिटी मेक, गल्फ इंजिनिअरिंग आणि शेडा इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांनी सहभाग घेतला.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किमान २४ हजार रुपये मासिक वेतनापासून विविध रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना यापेक्षाही अधिक वेतनाच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.

यावेळी घाटगे इंजिनिअरिंग ऑटोमेशन सर्व्हिसेसचे संचालक इंजी. रणजीत घाटगे यांनी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, आवश्यक कौशल्ये आणि करिअर विकासाबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. त्यांच्या पुढाकारामुळे आणि सहकार्यामुळे विविध नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.

प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना रोजगाराभिमुख शिक्षण आणि उद्योग क्षेत्राशी असलेला समन्वय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गांधीनगर, आजरा येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची वर्दी संबंधित मुलीच्या पालकांनी आजरा पोलिसात दिली आहे. संबंधित मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे पुढील तपास करीत आहेत.

आजरा ग्रामिण रुग्णालयात आढावा बैठक ..
दर्जेदार सेवा देण्याचा सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

‘ मृत्युंजय ‘ कार शिवाजी सावंत आजरा ग्रामीण रुग्णालयाचा नावलौकिक चांगला आहे. येथे डॉ. अशोक फर्नाडीस यासह अन्य वैदयकिय अधिक्षकांनी रुग्णांना चांगली सेवा दिली आहे. त्याचा वारसा जपावा. रुग्णांना दर्जेदार सेवा द्यवी. आमच्या पर्यंत तक्रारी येवू देवू नका. अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी केली.

येथील आजरा ग्रामिण रुग्णालयात सर्वपक्षीय आढावा बैठक झाली. वैद्यकिय अधिक्षक डॉ. अमोल पाटील अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार प्रमुख उपस्थित होते.

भूषण इंगवले यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा मांडला. सुधीर देसाई म्हणाले, काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला येथे चांगली वागणूक मिळाली नाही. परिचारीकेने ही रुग्णालयाची वेळ नसल्याचे संबंधीत रुग्णाला सांगीतले. रुग्णांची सेवा करायला मिळणे हे पुण्याचे काम आहे. आरोग्याची अडचण असल्याशिवाय कोणीही तुमच्याकडे येत नाही याची जाणीव ठेवावी. असे प्रकार घडणे हे चुकीचे आहे. याबाबत संबंधीतांना ताकीद द्यावी. डॉ. पाटील म्हणाले, अशी गोष्ट घडली असल्यास आम्ही माफी मागतो. पुढे असले प्रकार घडणार नाहीत. याची काळजी घेतली जाईल. मलिग्रे, वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्वच्छता पहा. येथे मात्र स्वच्छतेचा अभाव दिसत आहे. रुग्ण स्वच्छ जागेत उपचार घेत असला तर त्याची प्रकृती चांगली राहील. डॉ .पाटील म्हणाले, स्वच्छतेसाठी दोन कर्मचारी आहेत. दिवसातून तीन वेळा स्वच्छता करावी लागते. त्यामुळे त्यांच्यावर ताण येत आहे. आणखीन स्वच्छता कर्मचारी मिळावेत अशी स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या कंपनीला कळवले आहे. ऑक्सिजन प्लॅन्ट बंद असल्याचे युवराज पोवार यांनी सांगीतले. यावर डॉ. पाटील म्हणाले, रुग्णालयाचा ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु आहे. ज्या वेळी गरज असते त्यावेळी तो सुरु करतो. सर्पदंश, श्वानदंशाची लस पुरेशी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

या वेळी बाह्यरुग्ण विभाग, अंतररुग्ण, नैसर्गिक बाळंतपण, सिझेरीन गयासह विविध विषयावर चर्चा झाली. समीर चॉंद, काशिनाथ मोरे, दिनेश कांबळे, नारायण कांबळे, संजय घाटगे यानी सूचना मांडल्या. डॉ. वृषाली केळकर, डॉ. अभिषेक नरहट्टी यांनी चर्चत भाग घेतला.

तक्रार असल्यास थेट संपर्क साधा…

येथे रुग्णांच्या सेवेला कायमच प्राधान्य राहीले आहे. काही तक्रार असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा. रुग्णांच्याकडून कोणीही पैसे घेतल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे कोणेतही कृत्य येथे घडलेले नाही. महात्मा फुले जीवनदायी योजनासह शासनाच्या आरोग्याबाबतच्या विविध योजनाचा लाभ घ्या, असे डॉ. अमोल पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

मार्च २०२७ मधील एसएससी परीक्षेत पं. दीनदयाळ विद्यालयाची विद्यार्थिनी तालुक्यात प्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पंडित दीनदयाळ विद्यालय व जुनिअर कॉलेज आजराच्या शिरपेच्यात मानाचा तुरा मिळवून देणाऱ्या कु. खदिजा मुल्ला या विद्यार्थिनीने मार्च २०२६ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत पुनर्मूल्यांकनामध्ये ९८.६० % गुण मिळवून आजरा तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

निधन वार्ता
येसूबाई निऊंगरे

मडीलगे ता. आजरा येथील येसूबाई राऊ निऊंगरे ( वय ८७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सुरेश निऊंगरे यांच्या त्या आई होत.

थोडक्यात बातम्या 

♦ शिवसेना उबाठा गटात पुन्हा एकदा फूट पडली असून सहा खासदारांनी लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन वेगळा गट स्थापन करण्यास मंजुरीसाठी मागणी केली आहे. 

♦ गोकुळशी संलग्न व सहाय्यक निबंधक ( दुग्ध) विभागाने ६४४ संस्था अवसायानात काढल्या आहेत यामध्ये ५७९ गोकुळच्या सभासद सभासद तर ७५ इतर संघांशी संबंधित आहेत.

♦ हयात प्रमाणपत्र नसल्यास जुलैपासून विविध शासकीय पेन्शन बंद केल्या जाणार आहेत. प्रमाणपत्र सादर करण्यासाठी जून २०२६ अखेरची मुदत देण्यात आली आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : १८ जून २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्थी (सायंकाळी ०६.५८ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : पुष्य नक्षत्र (सकाळी ११.३२ पर्यंत) त्यानंतर आश्लेषा नक्षत्र
योग : व्याघात योग (सायंकाळी ०५.३४ पर्यंत) त्यानंतर हर्षण योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०८.१३ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : कर्क राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१९ ते दुपारी ०३.५८ पर्यंत.
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०६
सूर्योदय : सकाळी ०६.०३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

राष्ट्रवादीचा प्रचाराचा नारळ फुटला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!