mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार  दि.४ डिसेंबर २०२४              

आज-यात घर फोडीचे सत्र सुरूच…
आणखी एक घर फोडले

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी घरफोडींचे सत्र सुरूच असून शिवाजीनगर, आजरा येथील अजित विश्वासराव सावंत यांचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचे संसारोपयोगी साहित्य लंपास केले.

     सावंत कुटुंबीय हे नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याचे पाहून बंद घराची कौले काढून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. घरामधील तांब्या पितळेच्या साहित्यासह इतर संसारोपयोगी साहित्य लंपास केले.

चो-यांचे सत्र थांबणार कधी...?

     शहरासह तालुक्यात बंद घरांमध्ये सुरू असणारे अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून हे सत्र थांबणार तरी कधी ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गडहिंग्लज येथील घटनेचा मराठा महासंघाच्यावतीने आजऱ्यात निषेध

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गडहिंग्लज येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचा आजरा तालुका मराठा महासंघाच्या वतीने निषेध करण्यात आला. तर संबंधित नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी आजरा तहसीलदारांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. गडहिंग्लज येथील घटनेतील संशयितांना कठोर शिक्षा करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

      या निवेदनावर अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, कार्याध्यक्ष संभाजी इंजल, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सरचिटणीस प्रकाश देसाई यांच्यासह सुर्यकांत आजगेकर, धनश्री देसाई, शिवाजीराव इंजल, महादेव पोवार आदिंच्या सह्या आहेत.

आजरा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी समीर जाधव

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी समीर जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

       संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सचिवपदी अशोक कुंभार,खजानीसपदी वंदना शिंदे, जिल्हा संघटना सल्लागार पदी महादेव देसाई, जिल्हा पत संस्था संचालक पदी अजित बेलवेकर यांची एकमताने निवड करणेत आली.

       यावेळी संघटनेचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

बिएलओ आदेश रद्द करा…
शिक्षक समितीची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       बालकांचा मोफत व सक्तिच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २० नुसार शिक्षक अशैक्षणिक कामासाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच बीएलओ सारख्या अशैक्षणिक कामामुळे दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण केलं आहे त्यामधील संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयानुसार अशैक्षणिक कार्य अशैक्षणिक कामकाज देण्यात येऊ नये, तसेच संदर्भ क्रमांक २. नुसार प्राथमिक शिक्षिका व्यतिरिक्त सरकारी अर्ध सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देता येते. त्यांना हे आदेश लागू करावेत अशी मागणी प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

        याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून याप्रसंगी सुभाष विभुते, शिवाजी बोलके यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आजरा’ च्या ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर वाटप व मार्गदर्शन

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      स्व.वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे काम करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेक्टर लावणेचा कार्यक्रम नुकताच कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. यावेळी आजरा पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. नागेश यमगर व पोलीस हवालदार अनंत देसाई यांनी वाहतूकदार, चालक व मालक यांना रस्त्यावरील अपघात व वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी रिफ्लेक्टरचे महत्व पटवून देत वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

      यावर्षी संकेश्वर- बांदा महामार्गाचे काम पूर्ण झालेले असून महामार्गावर वाहतुकीची रेलचेल वाढली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे गाळपही पूर्ण क्षमतेने होत असलेले व तोडणी वाहतुकीचे दमदार नियोजन केले असल्याने रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी कारखाना व्यवस्थापन व आजरा पोलीस स्टेशन यांच्या वतीने रिफ्लेक्टर वाटप करण्यात आले तसेच वाहतुकीतील अडथळे, अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टरचे महत्व सांगण्यात आले त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

      यावेळी कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे व संचालक मंडळ मुख्यशेतीधिकारी युवराज पाटील, लेबर ऑफिसर सुभाष भादवणकर, उसपुरवठा अधिकारी अजित देसाई, केनयार्ड सुपरवायजर मोळे,शेती विभागचे हेड क्लार्क संदीप कांबळे तसेच वाहतूकदार, चालक, मालक उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

धक्कादायक… रोहन देसाई यांचा अखेर मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गवसेत आमदार आबिटकर यांच्या हस्ते आरोग्यकेंद्राचे उद्या भूमीपूजन

mrityunjay mahanews

फड सांभाळ तुऱ्याला ग आला… आता फड सांभाळायचा कसा…?

mrityunjay mahanews

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews
error: Content is protected !!