

महिलेच्या मृत्यूस जबाबदार…
एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुशिला तुकाराम सावंत ( वय ६५ रा. जाधेवाडी ता. आजरा) ही महीला दि.२५ ऑगस्ट रोजी २ वाजण्याच्या सुमारास भादवणवाडी बस स्टॉप येथे बाजार करुन गडहिंग्लज ते आजरा बसने भादवणवाडी येथील बसस्टॉपवर बसमधुन उतरुन रस्ता ओलांडत असताना गडहिंग्लज कडुन भरधाव वेगाने येणारे बोलेरो पिकअप गाडी (नंबर MH09FL0287)ची जोरदार धडक बसली व त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचेवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेने त्यांना उपचाराकरीता दि.२५ रोजी हत्तरकी हॉस्पीटल गडहिंग्लज येथे ॲडमीट केले असता त्याच्यावर औषधोपचार चालु असताना त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी रेखा परशुराम बामणे (रा.उत्तूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल शिवाजी केळेकर ( रा. हिरलगे ता. गडहिंग्लज) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पेरणोली येथे गांजा विक्री करणाऱ्या रंगेहात पकडले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे सोहाळे फाट्यावर गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेला हर्षवर्धन उर्फ हर्षद धनाजी लोंढे (वय ३० रा. पेरणोली. ता. आजरा) याला आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून फॅकल्टी पिशवीमध्ये असणाऱ्या ६१२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. यांची एकूण किंमत १० हजार इतकी आहे आजरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सदर कारवाई केली आहे.
आजरा पोलीस स्टेशनचे हवालदार महेश गळवी यांना गोपनीय बातमीदार मार्फत पेरणोली सोहाळे फाटा येथुन सोहाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक जण गांजाचे सेवन करतो व आजुबाजूच्या परिसरात विक्री करत आहे अशी बातमी बातमीदाराकडुन समजली. याच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले, आजरा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक, नागेश यमगर यांनी पोलिसांकडून सापळा रचून लोंढे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून दहा हजार रुपयांच्या गांजासह ७५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.


नाभिक समाज अध्यक्ष पदी गौतम भोसले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका नाभिक समाजाचे अध्यक्षपदी गौतम भोसले यांची तर उपाध्यक्षपदी देव पाचवडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
संत सेना महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत सदर निवड करण्यात आली आहे.

आजरा परिक्षेत्र वन अधिकारी पदी मनोजकुमार कोळी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा परीक्षेत्र वन अधिकारी पदी मनोज कुमार विनायक कोळी यांची नियुक्ती झाली आहे.
सामाजिक वनीकरण कवठे महांकाळ येथून त्यांची बदली आजरा येथे झाली आहे. तर यापूर्वी या पदावर असणाऱ्या स्मिता डाके- होगाडे यांची कागल सामाजिक वनीकरण विभागाकडे वन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


