mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

प्रकाश तोरगल्ले यांचे अपघाती निधन


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मासेवाडी ता. आजारा येथील प्रकाश विठू तोरगल्ले (वय ६२ वर्षे) यांच्या मोपेडला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

      याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी…

      सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज येथील एका हॉटेलमध्ये काम करणारे प्रकाश तोरगल्ले हे गडहिंग्लज – भडगाव मार्गावरील संत बाळूमामा मंदिराच्या दिशेने चालले असता अचानक पाठीमागून एका दुचाकी स्वाराची त्यांना धडक बसली यामधील ते मोपेड वरून खाली कोसळले व डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

      त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आज-यात रंगपंचमीचा जल्लोष

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहर व परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. बाल- गोपाळ, महिलांसह तरुणाई रंगपंचमीच्या रंगांमध्ये न्हाऊन निघाली.

     प्रथेप्रमाणे गुढीपाडव्याच्या आदले दिवशी आजरा शहर व परिसरात रंगपंचमी साजरी केली जाते. यावर्षीही रंगपंचमीचा जल्लोष कायम होता. सकाळपासूनच बालगोपाळांनी रंगांची उधळण करण्यास सुरुवात केली. दुपारनंतर मात्र रंगपंचमी चांगलीच बहरात आली. संगीताच्या तालावर ठेका धरत तरुणाईने रंगांची मुक्त उधळण केली.

     रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर दुपारनंतर मुख्य बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

मसोली वेळवट्टी जंगलात अग्नीतांडव

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     मसोली, वेळवट्टीच्या जंगलाला लागलेल्या वणव्यामध्ये पन्नास हेक्टरच्या वर जंगल व खासगी क्षेत्र जळाले. यामध्ये वन बारी दीड वाजता वणवा लागला. वणव्याचे नेमके कारण समजलेले नाही. सरपंच परिषदेचे पदाधिकारी व वनविभागाचे अधिकारी य खासगी क्षेत्र मोठ्या प्रमाणात जळाले असते.

     आज दुपारी दीडच्या सुमाराला मसोली गायरानात वणवा लागला. दु‌पारचे उन, वाळलेला पाला पाचोळा व वाऱ्यामुळे वणवा वेगाने पसरत गेला.यामध्ये खासगी क्षेत्रासह वनसंपदेची मोठी हानी झाली आहे. सरीसृप प्राणी, पक्षी, वन्यप्राणी यांचा आदीवास अडचणीत आला आहे.

     काजू, निलगीरीची बागेतील झाडे जळाली आहेत. आजरा-आंबोली मार्गावरून आगीचे राौद्र रुप दिसत होते.याबाबतची माहिती सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील यांना मिळाली. श्री. पाटील यांनी वनविभागाच्या पथकासह घटनास्थळी धाव घेत फांद्याचा वापर करून आग विझवण्यास सुरवात केली. आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. दरम्यान मसोलीचे सरपंच श्री. गुरव व स्थानिक ग्रामस्थ यांनी आग विझवण्यात पुढाकार घेतला.

     अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर वणव्यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. जी. एम. पाटील, वनपाल भरत निकम, वनसेवक शिवाजी मटकर, रमेश पाटील, गंगाराम कोकरे, श्री. माडभगत, श्री. शेटगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अखेर अन्याय निवारण समितीच्या प्रयत्नांना यश…

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     अखेर अन्याय निवारण समितीच्या प्रयत्नांना यश आले असून गांधीनगर रुग्णालय मार्गावरील शिव कॉलनी,आयडियल कॉलनी लगत असलेले गटर काम हे रस्त्यामध्ये झालेले आहे हे आमदार प्रकाश आबिटकर यांना पटवून देण्यात आले , याची तातडीने दखल घेत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवून रस्त्याच्या हद्दीप्रमाणे गटर लाईन मारून घेण्याचे आदेश दिले.

      त्यामुळे आयडियल कॉलनीमध्ये जाण्यासाठी असलेल्या मार्ग मोठा व प्रशस्त होईल व रुग्णालयाकडे जाणारा मार्गही मोठा होईल, त्यामुळे रवळनाथ कॉलनी शिव कॉलनी आडीयल कॉलनी येथील रहिवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे .या कामासाठी समिती गेले दोन महिने प्रयत्न करत होती. बांधकाम अधिकारी व नगरपंचायत मुख्याधिकारी स्वतः येऊन पाहणी करून गेले होते , अखेर आज म आमदार आबिटकर यांनी तातडीने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलावून घेऊन सूचना दिल्या.

     गटारीमुळे आता रस्ताही रुंद होणार असून वाहतूकीला सोईचा होणार आहे. समितीच्या वतीने अध्यक्ष परशुराम बामणे,विजय थोरवत,जावेद पठाण, पांडुरंग सावरकर व जोतिबा आजगेकर यांनी आम.आबिटकर यांच्याशी चर्चा केली .


राष्ट्रीय महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवाद अधिकारी नेमा…
शिवसेनेची मागणी.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      राष्ट्रीय महामार्गबाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लवाद अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

आजरा, गडहिंग्लज व सावंतवाडी तालुक्यांमध्ये संकेश्वर ते आंबोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ एच च्या रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी आजरा तालुक्यातील तेरा गावातील जमीन भूसंपादन करणेबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ कलम ३ (जी) अन्वये नुकसान भरपाईचा निवाडा निश्चित केला आहे.

       सदर विषयांमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्य अडचणी पूर्णपणे ऐकून न घेता निवाडा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भूमिका ऐकून घेऊन त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी लवादाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.

      सदर रस्त्याचे ठेकेदार हेतूपुरस्सर कांहीं शेतकऱ्यांचे बरोबर साटे- लोटे करून जमिनीच्या मोजणी रेखांकनामध्ये बदल करून इतर शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

     निवेदनावर तालुकाप्रमुख संजय पाटील यांच्यासह बाधित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

 

संबंधित पोस्ट

पवित्र क्षेत्र श्री रामतीर्थ आजरा येथे धबधब्याशेजारी लघुशंका , अश्लील चाळे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कककक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!