mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

तरुणावर गव्याचा हल्ला.. सुदैवाने तरुण बचावला

हाजगोळी येथील घटना

                    आजरा:प्रतिनिधी

       लघुशंकेसाठी  थांबलेल्या अठरा वर्षीय साहिल विश्वनाथ जाधव हा तरुण हाजगोळी खुर्द येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाला असून सुदैवाने तो बचावला आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हाजगोळी बंधाऱ्याच्या पुढील बाजूस सदर घटना घडली.

       याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की…

       साहिल व वडील विश्वनाथ जाधव हे दोघे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून गावी चालले होते. बंधारा पार करून आल्यानंतर जाधव यांच्या पोल्ट्री शेड जवळ ते लघुशंकेसाठी थांबले. दरम्यान अचानक चार गव्यांचा कळप झुडुपातून बाहेर आला. त्यातील एका गव्याने साहिल याला जोरदार धडक दिल्याने तो बाजूला फेकला गेला. प्रसंगावधान राखल्याने विश्वनाथ हे बचावले. साहिल याला रात्री उशिरा आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आजरा कारखान्याची जानेवारी अखेरची ऊस बिले जमा

                     आजरा: प्रतिनिधी

          वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे दि.१६ जाने.ते ३१ जानेवारी अखेर गाळपासाठी आलेल्या ऊस बिलाची रक्कम विनाकपात १२ कोटी संबंधित पुरवादार शेतक-यांच्या रोजी बँक खातेवर जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी दिली. तरी संबंधी ऊस पुरवठादार शेतक-यांनी आपलया बँकेशी संपर्क साधुन बिल उचल करावे

        हंगाम २०२३-२४ मध्ये कारखान्यास कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाची बिले विनापात एकरक्कमी तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील आदा केली जात आहेत.

        यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. मधुकर देसाई, जिल्हा बैंकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी श्री. सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक श्री. विष्णु केसरकर, श्री. मुकुंदराव देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री. सुभाष देसाई, श्री. अनिल फडके, श्री. दिपक देसाई, श्री. रणजित देसाई, श्री.संभाजी रामचंद्र पाटील, श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री.राजेंद्र मुरुकटे, श्री. राजेश जोशीलकर, श्री. संभाजी दत्तात्रय पाटील, श्री. गोविंद पाटील, श्री. अशोक तर्डेकर, श्री. काशिनाथ तेली, श्री. हरीबा कांबळे, संचालिका सौ. रचना होलम , सौ. मनिषा देसाई, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर श्री. रशिद पठाण आणि प्र.कार्यकारी संचालक श्री. व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

भारत मानक ब्यूरोने प्रमाणित उत्पादने खरेदी करणे हिताचे :हर्षमोहन शुक्ला

                   आजरा : प्रतिनिधी

         भारतीय मानक ब्यूरो ही जगात सर्वात जास्त उत्पादन प्रमाणंन योजना चालवणाऱ्या संस्थांच्या पैकी एक आहे. उत्पादकांना मानक चिन्ह (आयएसआय) वापरण्यासाठी परवाना मंजूर करते. यांन प्रमाणित केलेली उत्पादन खरेदी करणे हे ग्राहकांच्या हिताचे आहे. असे प्रतिपादन पुणे येथील भारतीय मानक ब्युरोचे मानक संवर्धन अधिकारी हर्ष मोहन शुक्ला यांनी केले.

         येथील आजरा पंचायत समितीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कार्यशाळा झाली. या वेळी विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात श्री. शुक्ला यांनी भारतीय मानक ब्यूरो व उत्पादक मानक चिन्ह (आयएसआय) या विषयी माहीती दिली. या वेळी समन्वयक संजय जोशी प्रमुख उपस्थित होते. सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

         शुक्ला म्हणाले, चारशे पेक्षा जास्त उत्पादने अनिवार्य प्रमानना खाली आहेत. सुमारे ७७१ उत्पादने एवेच्छिक प्रमाननाखाली आहेत. खादय पदार्थ बाटलीतील पाणी, इलेक्ट्रीक उपकरणे, घरगुती गॅस यासह वैदयकिय तपासणी व एक्सरे उपकरणे यासह अन्य उत्पादने याबाबत ग्राहकांनी जागरूक रहावे. त्यांनी आयएसआ) मानांकन याची माहीती घ्यावी. त्याचबरोबर सोन्या चांदीचे हॉल मार्क असलेले दागीने खरेदी करावे. आयएसआय मार्क असलेली उत्पादने गुणवत्तेचे प्रतिक असतात. यातून आरोग्यही जपले जाते. या वेळी झालेल्या कार्यशाळेत बसवराज वाडेकर, विस्तार अधिकारी श्री. मासाळ, श्री. गवळी, शाखा अभियंता अरुण मोरे, श्री. केदार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी तालुकास्तरावर चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यांचा यावेळी पारितोषक देवून सत्कार झाला.

         कार्यशाळेला कुंडलिक शिर्सेकर, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. सर्जेराव घाटगे यांनी स्वागत, प्रास्ताविक व आभार मानले.

कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेतील वंचित शेतकऱ्यांना लाभ दयावा

विविध कार्यकारी सेवा संस्था असोसिएशनची मागणी

                   आजरा: प्रतिनिधी

         महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदान योजनेतंर्गत लाभ न मिळालेल्या सभासद कर्जदार यांना सदर योजनेचा तातडीने लाभ मिळावा अशी मागणी विविध कार्यकारी सेवा संस्था असोसिएशन आजरा यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन येथील सहाय्यक निबंधक सुजयकु‌मार येजरे यांना दिले आहे. निवेदनात म्हंटले आहे, महाराष्ट्र शासनाकडून सेवा संस्थेचे सभासद कर्जदार नियमित कर्ज वेळेत परतफेड करीत आहेत. परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान शासनाकडून देण्याचे जाहीर केलेले आहे. परंतु आपल्या तालुक्यातील अद्याप बन्याच सभासद कर्जदारांना सदर योजनेची रक्कम मिळालेली नाही. तरी लाभ न मिळालेल्या सभासद कर्जदारांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. याबाबत अद्याप हालचाली दिसून येत नाहीत. सहाय्यक निबंधक कार्यालयातून याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

         निवेदनावर शिवाजी इंगळे, श्रेयश सावंत, पाडुरंग सावरतकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांच्या सह्या आहेत.

उत्तुरच्या जनतेचा विश्वास विकासकामांमधून सार्थ ठरवेन ; राजे समरजितसिंह घाटगे

सोलर हायमास्ट दिव्यांचे केले लोकार्पण

                    उत्तूर : प्रतिनिधी

       माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये उत्तुरच्या जनतेचे योगदान मोठे मिळाले आहे .२०१९ मध्ये विधानसभेची अपक्ष निवडणूक लढवताना येथील जनतेने भरभरून सहकार्य केले आहे. येत्या काळातही या अनमोल सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे.येथील जनतेने माझ्यावरती टाकलेला हा विश्वास या गावच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून सार्थ ठरवेन असे प्रतिपादन भाजपाचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

       उत्तुर ( आजरा) येथे राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून येथील इंदिरानगर वसाहतीतील श्री. दत्त पंत समर्थ मंदिराच्या प्रांगणात तसेच कन्या विद्या मंदिर येथे हायमास्ट दिव्यांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

       श्री.घाटगे पुढे म्हणाले, आपल्याकडे कोणतेही घटनात्मक पद नसतानाही या परिसराच्या विकासासाठी जवळपास १३ कोटी रुपयांचा विकासनिधी खेचून आणला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा मी वारस आहे .माझ्यावरती स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे संस्कार आहेत.त्यामुळे त्यांना अभिप्रेत असणारा या गावासह परिसराचा शाश्वत विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

        यावेळी बोलताना अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी म्हणाले,राजे समरजितसिंह घाटगे हे तळागाळापर्यंत पोहोचणारे नेते आहेत.त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व येथील जनतेने स्वीकारलेले आहे. अशा नेतृत्वाच्या पाठीशी पाठबळ उभा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.

        यावेळी अतिषकुमार देसाई, मारुती दिंडे (अध्यक्ष, अवधूत भजनी मंडळ), डॉ .शिवाजी पन्हाळकर, तानाजी उत्तुरकर (मेजर), भास्कर भाईगडे, मंदार हाळवणकर,सुजित कुराडे, बाळासो सावंत ,एम.डी. सावंत,दादु घोरपडे, रघुनाथ कातोरे यांच्यासह कार्यकर्ते,महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक सुधीर जाधव यांनी केले.आभार विजय यमगेकर यांनी मानले.

इंदिरानगरमधील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील…..

येथील इंदिरानगर मधील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे.याची मला जाणीव आहे. आपले हे प्रलंबित काम मी हाती घेतले असून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी राजे समरजीतसिंह घाटगे यांनी सांगितले.

आज-यात उद्या ‘ इत्तेहाद बनाव संविधान बचाव ‘ कार्यक्रम

                    आजरा: प्रतिनिधी

        आजरा शहरातील मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी सामाजिक ऐक्य व संविधान बचाव या उद्देशाने दिनांक ७ मार्च २०२४ रोजी बाजार मैदान, आजरा येथे सर्वधर्मीय मंडळींच्या उपस्थितीत इत्तेहाद बनाव… संविधान बचाव हा कार्यक्रम आयोजित केला आहे आहे.

      हजरत मौलाना सय्यद अरशद साहब यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या -१

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातील सहकार आदर्शवत… माजी खासदार महाडिक

mrityunjay mahanews

शिंदेसेनेतही दोन गट…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!