mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

पाणीपट्टी वाढ प्रकरणी शेतकऱ्यांचा धडक मोर्चा


                 आजरा:प्रतिनिधी

      वीज वितरण कंपनीच्या भरमसाठ येणारी वीज बिले, अन्यायकारक आकारली जाणारी पाणीपट्टी व जलमापक यंत्र सक्ती प्रकरणी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजरा तालुका मोटर पंप धारक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा तहसीलवर मोर्चा काढत आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

      मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले. शासनाच्या आणि पाणीपट्टी वाढ व विद्युत पंपांना जन्मापर्यंत बसवण्याच्या शक्ती विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुख्य बाजारपेठेतून मोर्चा आजारातील समोर आला.

      यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना काँ. संपत देसाई म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे धोरण वेळोवेळी राबवण्यास सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी आपला एक डोळा केवळ आपल्या जमिनी व शासनाची अन्यायकारक धोरणे यावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला पाहिजे . शेतकऱ्यांच्या योगदानातून तयार झालेल्या प्रकल्पांचे पाणी जर शेतकऱ्यांच्या ऐवजी उद्योगधंद्यांना प्राधान्याने दिले जात असेल तर यासारखे दुर्दैव काही नाही.

      तानाजी देसाई म्हणाले, शेतकऱ्यांनी पाणीपट्टी विरोधात एकत्र न आल्यास याची फार मोठी किंमत भविष्यात वर्षानुवर्षी मोजावी लागणार आहे.

       हरिबा कांबळे म्हणाले, धरणे ही शेतकऱ्यांच्या हितासाठी नाहीत तर आमदार-खासदारांच्या पिढ्यानपिढ्या जगण्यासाठी बांधली जात आहेत असे आता वाटू लागले आहे. धरणातील पाणी जर शेतकऱ्यांना उचलता येत नसेल व त्यावर अन्यायकारक पद्धतीने पाणीपट्टी लावली जात असेल तर या धरणाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना व त्यामध्ये योगदान देणाऱ्या बुडीत क्षेत्रातील जनतेला काय उपयोग ? असा सवाल ही त्यांनी केला. यावेळी शांताराम पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

      शासनाकडे मोर्चाच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या

▪️पाटबंधारे खात्याने सर्व मोटरपंप धारकांना जलमापकयंत्र (वॉटर मीटर) बसविण्याच्या केलेली सक्ती रद्द करावी.
▪️जलमापक यंत्र न बसवल्यास दीडपट दंडाची पाणी पट्टी शेतकऱ्यांवर लादू नये.
▪️अन्यायी पाणी पट्टी वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या शासन निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध असेल.
▪️ वीज वितरणने भरमसाठ वीज बिले आकारु नयेत.

      यावेळी तहसीलदार सुरज माने पाटबंधारे विभागाचे व विज वितरण कंपनीचे अधिकारी आणि आंदोलन यांच्यात बैठक पार पडली.

       कृषिपंपावर जलमापक यंत्र (मीटर) बसविण्याची सक्ती करू नये, अशी शेतक-यांची आग्रही मागणी आहे. महापुरात पाण्यात अधिकाऱ्याच्या मोटर व वीज मीटर बुडाले आहेत त्यामुळे अंदाजे भरमसाठ पद्धतीने केली जाणारी ही बील आकारणी थांबवावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या.

      यावेळी झालेल्या चर्चेमध्ये कॉ. संपत देसाई, तानाजी देसाई, तुळसाप्पा पोवार,मुकुंदराव देसाई आदींनी भाग घेतला. आंदोलन प्रसंगी जयवंतराव कोडक, संभाजीराव सावंत, शिवाजीराव देसाई आबासाहेब पाटील ( देवर्डे),उदय कोडक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सहाय्यक शिक्षक ते संचालक

प्राचार्य सुनील देसाई यांची वाटचाल कौतुकास्पद

       एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणे, त्यानंतर त्याच संस्थेत सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर स्वतःच्या गुणवत्ता व अध्यापन कौशल्याच्या जोरावर प्राचार्यपद भूषवणे व सेवानिवृत्त झाल्यानंतर संचालक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होणे, असे भाग्य काही मोजक्या व्यक्तींना लाभू शकते. त्यातील एक म्हणजे येथील आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक प्राचार्य सुनील देसाई होय.

       इंग्रजी विषयातून पदवी व शिक्षण क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर तयेथील व्यंकटराव प्रशालेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून ते रुजू झाले. सुमारे ३५ वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असताना त्यांच्यावर राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) विभागाची जबाबदारीही आली ती त्यांनी समर्थपणे पेलली.

      इंग्रजी अध्यापनामध्ये हातखंडा असलेल्या देसाई यांनी पुढे पर्यवेक्षक म्हणूनही काही कालावधी करता काम पाहिले व शेवटी त्यांनी प्राचार्य पदापर्यंत मजल मारली. त्यांचे शैक्षणिक योगदान लक्षात घेऊन आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व त्यांच्या सहकारी संचालकांनी त्यांना संस्थेत संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.

      याच दरम्यान त्यांना कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेत (को.जि.मा.शि.) अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. तेथेही त्यांनी आपल्या व्यवस्थापकीय कौशल्यांच्या जोरावर संस्था प्रगतीपथावर नेण्याचे काम केले. आज त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी सैन्य दल, वैद्यकीय क्षेत्र, प्रशासन,उद्योग, बँकिंग आयटी क्षेत्रासहसह विविध क्षेत्रांमध्ये समर्थपणे स्वतःला सिद्ध करून दाखवत आहेत.

अशा या हाडाच्या शिक्षकाला ६१ व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…

           ✍️✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत…

खून प्रकरणी संभाजी पोवार याला पोलिस कोठडी

               

                आजरा : प्रतिनिधी

      सुळे (ता. आजरा) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा हातोडीने डोक्यात घाव घालून संभाजी ईश्वर पोवार याने शनिवारी रात्री खून केला होता. पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे

त्याला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सोमवारी त्याला आजरा न्यायालयात हजर केले होते.

आजरा येथे संविधान संवाद यात्रेचे स्वागत    

                                                           .     .                   आजरा:प्रतिनिधी

      आजरा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्या वतीने सुरू असलेल्या संविधान संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले, यावेळी किसान भवन येथे, संवादक राजवैभव शोभा रामचंद्र यांनी संवाद यात्रेचे महत्व व संविधान जनजागृती ही तालुक्यातील गावात, खेड्यापाड्यांपर्यंत पोहचले पाहीजे. यासाठी सर्वानी प्रयत्न करणे, आवश्यक आहे.

       संविधानाने सर्वाना समान न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य, आपले अधिकार व कर्तव्य दिलेले आहेत हे आपण समजावून घेतला तर , सर्व जाती धर्मातील गोर गरीबावर अन्याय अत्याचार होणार नाही.आजच्या घडीला संविधान आणी लोकशाही महत्वाची असल्याचे सांगून, त्यांनी सविस्तर माहिती दिली.

       अंनिस शाखा आजरा, अपंग संघटना, सेक्युलर मुहमेंन्ट, गिरणीकामगार संघटना च्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले .

       यावेळी काॅ शांताराम पाटील, शांताराम हारेर, प्रा.नवनाथ शिंदे, प्रविण कश्यप, गिता पोतदार , सरिता कांबळे, निवृत्ती राणे, हिंदूराव कांबळे, प्रकाश मोरुसकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

    आभार काशिनाथ मोरे यांनी मानले.

आजरा कारखान्याची १५ नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा 


                 आजरा: प्रतिनिधी

        आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे दि. १५ नोव्हेंबर अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्र.मे.टन रू.३१००/- प्रमाणे विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खात्यावरती जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक यांनी दिली.

        हंगाम २०२३-२४ मध्ये करखान्याने ३.५० लाख मे.टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले असुन त्याकरीता बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणा ऊस तोडणी करीता कार्यरत ठेवणेचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले रू.३१००/- प्र.मे.टन प्रमाणे विनाकपात एकरक्कमी तसेच तोडणी वाहतुकीची बिले देखील नियमितपणे आदा केली जाणार आहेत.

        कार्यक्षेत्रातील ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून कारखान्याकडे जास्तीत जास्त कार्यक्षेत्रातील ऊस आणुन ऊस उत्पादकांना दिलासा दिला जाणार आहे. कांही क्षेत्रामध्ये जंगली जनावरांचा त्रास होत आहे अशा ठिकाणी यंत्रणा देवून सदर ठिकाणचा ऊस काढणेचे नियोजन देखील कारखान्या मार्फत केले जात आहे. आज देखील कार्यक्षेत्रात शिल्लक असलेल्या ऊसाची माहिती घेवून तो वेळेत गाळपास आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे. तरी ऊस उत्पादकांनी आपण पिकविलेला संपुर्ण ऊस आपल्या कारखान्यास गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती यांनी केले.

       शेतक-यानी आपला ऊस खुदद् तोड करून दिल्यास कारखान्यामार्फत वाहन उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे शेतक-यांचे तोडीसाठी होणा-या अवास्तव खर्चात बचत होवून शेतक-यांचा फायदा होईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांनी खुदद् तोड करून कारखान्यास ऊस पाठवावा असेही आवाहन केले आहे.

      यावेळी कारखान्याचे विभाग प्रमुख व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

आदरांजली सभा

        आजऱ्याचे सुपुत्र, सर्वसामान्य रुग्णांविषयी आत्यंतिक आस्था असेलेले सेवाभावी वृत्तीचे डॉ अशोक फर्नांडिस यांचे आकस्मिक निधन झाले. आजरा तालुक्याच्या या सुपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी समस्त आजरेकरांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित केली आहे.

तारीख व वेळ-
बुधवार दि ६ डिसेंबर २०२३ संध्या ५.३० वाजता

ठिकाण-
गंगामाई वाचन मंदिर, आजरा

 

 

संबंधित पोस्ट

बेलेवाडीत दर्शन…? लिंगवाडीत हल्ल्यात बैलाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कीणे येथे भिंत कोसळून महिला ठार

mrityunjay mahanews

भोंदू बाबाच्या जादूटोण्याने मलिग्रे पंचकोशी हादरली…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Test

Admin
error: Content is protected !!