mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

लक्ष्मीपूजनानिमित्त लुटलेल्या रोख रकमेसह दागिन्यावर डल्ला मारणारा गजाआड


                    आजरा : प्रतिनिधी

      लक्ष्मीपूजनानिमित्य खोराटवाडी ता. आजरा येथील येथले यांच्या किराणा दुकानामध्ये पुजलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह ९० हजारांवर रोकड लांबवणाऱ्या संतोष सखाराम शिंदे ( वय ४५ रा.हिरलगे ता. गडहिंग्लज) याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिंदे आणि सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.

      १२ नोव्हेंबर रोजी रात्री शिंदे यांना दुकानाची कौले काढून ९० हजार रुपये रोख व सुमारे ४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध  घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली होती.

        याबाबत खब-यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिंदे यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून सदर प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक चौकशी करता शिंदे हा व्यसनी असल्याचे समजते.

       आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.



सामाजिक एकोपा व सेवाभाव हेच ग्रामविकासाचे सूत्र…

वाटंगी येथे अप्पर सचिव चंद्रकांत मोरे यांचे प्रतिपादन…

                 आजरा: प्रतिनिधी

          संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाच्या एकत्रित स्पर्धेत राज्यस्तरासाठी पात्र ठरलेल्या १५ ग्रामपंचायती पैकी कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव पात्र ठरलेल्या आजरा तालुक्यातील वाटंगी या गावची तपासणी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई येथील अव्वल सचिव चंद्रकांत मोरे, कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे व सहाय्यक कक्ष अधिकारी रमेश पात्रे यांच्या त्रिस्तरीय समितीने आज केली.

        या समितीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०२०-२१ व २०२१-२२ च्या तपासणी निकषांच्या गुण तक्त्यातील विषयान्सार सर्वच बार्बीची, स्थळ पाहणी व कागदोपत्री अहवालांची सखोल दप्तर तपासणी केली. या समितीने गावामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून प्राथमिक शाळा, अंगणवाडी, वाचनालय, सेवाभावी वैद्यकीय केंद्र, सार्वजनिक नाडेप, सार्वजनिक शोषखड्डे, सार्वजनिक शौचालय, प्लॅस्टिक संकलन केंद्र, बायोगॅस, परसबाग, प्रा. आ. केंद्र, सेवा संस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी स्त्रोत्र व वितरण व्यवस्था इ. बाबींची स्थळ पाहणी केली व समाधान व्यक्त केले.

         यावेळी ग्रामस्थांना संबोधित करतेवेळी या समितीचे अध्यक्ष अव्वल सचिव चंद्रकांत मोरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. समितीने गावाची केलेली प्रत्यक्ष पाहणी दप्तर तपासणी व नागरिकांशी केलेले हितगुज या घटकांचा विचार करता, सामाजिक एकोपा व सेवाभाव हाच ग्रामविकासाचे सूत्र आहे. याची प्रचिती वाटंगी येथे आली असलेचे गौरवोद्‌गार अवर सचिव चंद्रकांत मोरे यांनी काढले.

        यावेळी जि. प. कोल्हापुर कडील पाणी व स्वच्छता विभागाकडील उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती माधुरी परीट, जिल्हा समन्वयक निशांत कांबळे, राम पाटील, गट शिक्षण अधिकारी बी. सी. गुरव, तालुका आरोग्य अधिकारी सोनवणे, प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री. रविंद्र ग्रव, विस्तार अधिकारी ए. बी. मासाळ, रविंद्र गवळी, काटकर तालुका समन्वयक सर्जेराव घाटगे, कुंडलिक शिर्सेकर, शाखा अभियंता सुयोग कुंभार शसतीश केदार, चिंतामणी लोंढे, रोजगार हमी तालुका समन्वयक शरद देशमुखतसेच माजी सभापती श्री. अल्र्बर्ट डिसोझा व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

         तपासणी समितीच्या अनुषंगाने पंचायत समितीचे नूतन गटविकास अधिकारी शरद मगर यांचे मार्गदर्शन लाभले. सुरवातीस ग्रामपंचायत वाटंगी यांच्या वतीने सरपंच  रोमन करवालो व ग्रामसेवक रणजित पाटील यांनी समितीचे स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदवडेकर यांनी समिती सदस्यांना या अभियानातून वाटंगी गावाने केलेल्या कामांची व ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. सदर तपासणी वेळी उपसरपंच सौ. स्वाती गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



भंडारी समाजाने एकसंघ रहावे

बाबूराव हळदणकर : आजऱ्यात मेळावा

                     आजरा:प्रतिनिधी

          भंडारी समाज एकसंघ नसल्याने सर्वसामान्य बांधवाना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. समाजाच्या समस्या मार्गी लागण्यासाठी समाजाने एकत्र यावे व एकसंघ रहावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर यांनी केले.

        आजरा येथील श्री विठ्ठल मंदिरात भंडारी समाजाचा मेळावा झाला. श्री. हळदणकर अध्यक्षस्थानी होते. प्रकाश हरमळकर, सुरेश डोणकर, तानाजी डोणकर, गजानन कवठणकर, कृष्णा हरमळकर, रामा भंडारी प्रमुख उपस्थित होते.

       श्री. हळदणकर म्हणाले, जातीच्या दाखल्यासह सध्या समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, उपवर मुलामुलींना स्थळे शोधणे यासारखी अनेक कामे संघटनेच्या माध्यमातून मागी लावता येतील. लवकरच तालुकास्तरीय संघटना स्थापन करून त्याची अधिकृत नोंदणी करण्याचे काम हाती घ्यावे. समाजाला प्रगतीच्या टप्प्यावर नेण्यासाठी समाज बांधवानी एकत्रीत यावे. या वेळी भंडारी समाजाच्या अडीअडचणीवर सविस्तर चर्चा झाली.

      सुरेश हरमळकर, अनिल गोवेकर, नरेश केरकर, सतीश पेडणेकर यांच्यासह भंडारी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मनोहर हरमळकर यांनी स्वागत केले. आनंद मनूनकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.



आज तालुक्यात…

निंगुडगे येथे श्री कार्तिक स्वामी दर्शन यात्रा



निधन वार्ता…
स्नेहलता चोडणकर

       आजरा येथील स्नेहलता बंडोपंत चोडणकर (वय ६६ वर्षै ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सराफी व्यवसायिक सागर चोडणकर यांच्या त्या मातोश्री होत.



संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!