
मणिपूर घटनेचा आज-यात निषेध…
संविधानवादी व धर्मनिरपेक्ष व्यक्ती, संघटनांकडून तहसीलवर मोर्चा

भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना नेहमीच सन्मान देण्यात आला आहे अशावेळी मणिपूर सारख्या घटना म्हणजे राज्यकर्त्यांचे अपयश स्पष्ट करणाऱ्या व लांछनास्पद अशा आहेत. एकीकडे अशी घटना घडली असताना दुसरीकडे संबंधित आरोपींना राज्याश्रय देण्याचा प्रयत्न होत आहे. मणिपूर पेटले असताना पंतप्रधान मात्र विदेश दौरे करत आहेत ही लाजिरवाणी बाब आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेतील अधिकारानुसार आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. देशामध्ये मुस्लिम व ख्रिश्चन म्हणून जन्माला येणे हा गुन्हा आहे का? असा संतप्त सवाल करत आजरा येथील संविधानवादी धर्मनिरपेक्ष संघटना व व्यक्तींच्या वतीने मोर्चाद्वारे मणिपूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.
छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. सरकार विरोधी घोषणा देत मोर्चातील सहभागी आंदोलनकर्ते आजरा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

सभेमध्ये वक्त्यांनी मनोहर भिडे यांच्यावरही जोरदार टीका करून आम्हीच शिवरायांचे वारसदार आहोत असे स्पष्ट केले. बहुजन समाजातील तरुणांची माथी फिरवण्याचे काम भिडे यांनी थांबवावे असे आवाहनही केले.
आंदोलनकर्त्यांच्यावतीने आजरा तहसीलदारांना सदर घटनेचा निषेध नोंदवत निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी कॉ. संपत देसाई,फादर अंतोन डिसोझा,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंददादा देसाई, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा साखर कारखान्याचे संचालक तानाजी देसाई, प्रा. राजा शिरगुप्पे, शिवाजी गुरव,संजय तर्डेकर,सौ.गीता पोतदार, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे आदींची भाषणे झाली.
मान्यवरांची उपस्थिती…
यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष युवराज पोवार, राजेंद्रसिंह सावंत,माजी जि.प. सदस्या सौ.अलका शिंपी, नारायण भडांगे, सतीश कांबळे, संजय घाटगे, डॉ. अशोक फर्नांडिस, डॉ.बी. एफ. गॉडद,माजी उपसभापती निवृत्ती कांबळे,किरण कांबळे,संदीप कांबळे,नगरसेविका सुमैय्या खेडेकर,सौ. सीमा पोवार,सुनील पाटील,सुनील देसाई,माजी पं. स. सभापती भिकाजी गुरव,शिवाजी नांदवडेकर, विलास पाटील, पं. स. सदस्य बशीर खेडेकर ,अमित खेडेकर, प्रकाश पाचवडेकर,रामा शिंदे, दिनेश कांबळे, संभाजीराव इंजल, रणजीत देसाई, प्रा. बजरंग पुंडपळ,प्रा.मीना मंगळूरकर, काशिनाथ मोरे, नारायण राणे ,जुझे डिसोझा, व्हीक्टोरिया मस्करनेस, देवदीत कुतीनो, मिनिन लोबो, कय्युम बुड्डेखान, पॅरिस प्रिस्ट फादर मॅलविन पायस, हरिबा कांबळे, जोतिबा चाळके,कुदरत लतीफ,इब्राहिम मुल्ला, तौफिक माणगावकर, सौ.पुष्पलता घोळसे, निवृत्ती फगरे यांच्यासह मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


