mrityunjaymahanews
अन्य

पे द्रेवाडीच्या सरपंच सौ. लता रेडेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळला…

 

पेद्रेवाडीच्या सरपंचाविरोधतील अविश्वास ठराव फेटाळला…

पेद्रेवाडीच्या सरपंच सौ. लता उत्तम रेडेकर यांच्या विरोधात पाच सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार समिर माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत फेटाळण्यात आला.

सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये  सरपंचाविरोधात अविश्वास ठराव पारित होण्याकरता तीन चतुर्थांश इतके मतदान आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. आज झालेल्या बैठकीत या नियमानुसार ठरावाच्या बाजूने सहा सदस्यांनी(५.२५पेक्षा जास्त) मतदान करणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र ठराव दाखल केलेले पाच सदस्य अविश्वास ठरावाच्या बाजूने राहिले.

परिणामी सदर ठराव फेटाळत असल्याचे तहसीलदारांनी जाहीर केले. ठराव फेटाळण्यात आल्यानंतर सरपंच सौ. लता रेडेकर यांनी कायद्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. कायद्याने आपणाला न्याय मिळाला आहे असे स्पष्ट केले.

दाखल केलेल्या पाच सदस्यांनी मात्र याबाबत रेडेकर या इतर मागास प्रवर्गातून निवडून आल्या असून खुल्या प्रवर्गातील सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत,त्यामुळे अविश्वास ठराव पारित होण्याकरता दोन तृतीयांश इतके मतदान आवश्यक होते असा दावा केला आहे या निर्णया विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संबंधित पोस्ट

वाघाच्या हल्यात बैल ठार

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

बहिरेवाडी येथे मुलाकडून वृद्ध बापाचा खून…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीचा वाटंगीत धुमाकूळ…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!