mrityunjaymahanews
अन्य

आजरा तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान

तालुका खरेदी विक्री संघाकरीता आज मतदान

आजरा साखर कारखान्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे चित्र स्पष्ट करणा-या आजरा तालुका खरेदी – विक्री संघाच्या निवडणुकीकरिता आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तालुक्यातील एकूण २४ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असून १९ संचालक पदांच्या जागांकरिता रवळनाथ शेतकरी विकास आघाडी व रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीत प्रथमच जिल्हा बँकेचे संचालक देसाई त्यांच्या सहकारी मंडळींसमोर शिंपी – चराटी गटाने नेटके आव्हान ठेवले आहे.

सत्तारूढ रवळनाथ शेतकरी विकास आघाडीतून

व्यक्ती सभासद गटातून
सुधीर देसाई,एम के देसाई,महादेव हेब्बाळकर ,मधुकर एल्गार,गणपतराव सांगले,रवींद्र होडगे
सेवा संस्था गटातून
विठ्ठल देसाई,दौलती पाटील, महादेव पाटील,राजाराम पाटील,सुनील देसाई,अल्बर्ट डिसोझा,ज्ञानदेव पोवार
इतर संस्था गटातून उदय पवार ,महिला राखीव गटातून सौ.राजलक्ष्मी देसाई,
सौ. मायादेवी पाटील
इतर मागासवर्गीय गटातून संभाजी तांबेकर भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून-
महेश पाटील,अनुसूचित जाती जमाती गटातून
गणपती कांबळे हे निवडणुकीला सामोरे जात आहेत.

शिंपी – चराटी नेतृत्व करीत असलेल्या रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडीतून

व्यक्ती सभासद गटातून
अशोकअण्णा चराटी,अभिषेक शिंपी,
उत्तम देसाई, सदानंद व्हनबट्टे ,बाबुराव फडके,मुकुंदराव तानवडे, सेवा संस्था गटातून डॉ. इंद्रजीत देसाई,उत्तम रेडेकर,मनोहर पाटील,सुरेश सावंत,विजय देसाई,आनंदा कुंभार,पांडुरंग केसरकर,इतर संस्था गटातून विष्णू पाटील,
महिला राखीव गटातून
सौ. सुनीता रेडेकर, सौ. मनीषा गुरव, इतर मागास प्रवर्गमधून अनिरुद्ध केसरकर
भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून बयाजी मिसाळ,अनुसूचित जाती गटातून
शामराव कांबळे निवडणुकीला सामोरे जात आहेत.

मतदानाकरिता व्यक्ती सभासद गटातून १०६२७ विकास सेवा संस्था गटाचे ९४ तर इतर संस्था गटाचे १११ ठराव धारक पात्र आहेत.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता सहकार विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

 

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचऱ्यांचा

आज-यात सत्कार


 

आजरा तालुक्यातील रायवाडा / खानापूर येथे पडलेल्या ९ लाखांच्या सशस्त्र दरोड्याचा ठरा तासाच्या आत तपास करून दरोडेखोरांना जेरबंद करण्याबरोबरच मुद्दे माल जप्त करण्याची यशस्वी कार्यवाही केलेबद्दल आजरा येथील विविध संघटनांच्या वतीने यशस्वी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारूगडे यांनी जनतेकडून होणारा हा सत्कार प्रेरणादायी आहे. पोलिसांना जनतेतून पाठिंबा मिळत असेल तर, पोलिस नव्या उर्मीने काम करतील. पोलिसांविषयी असणारा जनतेतील आकस कमी होवून, पोलिस जनतेचे चांगले मित्र होतील. आजरा तालूक्यातील जनतेतून होणारा सत्कार, पुरस्कारापेक्षा मोठा असल्याचे मत व्यक्त केले.

या कामगिरीसाठी डी.वाय.एस.पी, एस.पी साहेबाचे मोलाचे सहकार्य मिळाले असून गडहिंग्लज, नेसरी,चंदगड व आजरा पोलिसांनी विशेष मेहनत घेतली. पी.एस्.आय. युवराज जाधव यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या संपूर्ण टीम मुळे दरोडेखोर हाती लागले. याचप्रमाणे हरियाणा येथील दरोडेखोरांचा पर्दाफाश करण्यात यशस्वी झालो. परंतू आजचा हा सत्कार निश्चितच प्रेरणादायी आहे. तालूक्यातील युवकांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून सरकारी सेवेत यावे. यासाठी गावागावातील वाचनालयांनी पुढाकार घ्यावा . यासाठी मार्गदर्शन करणारं असलेचे मतही व्यक्त केले.

सुरुवातीला प्रास्ताविकात काॅ. शिवाजी गुरव यांनी आजरा पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतूक करत जनतेच्या माध्यमातून चांगल्या कामाचे कौतुक केल्याने इतरांना देखील त्याची प्रेरणा मिळेल यासाठी हा सत्कार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी हवालदार दत्तात्रय शिंदे,संतोष घस्ती, सुनील कोईगडे, विशाल कांबळे, ड्रायव्हर परशुराम कोळी,गोपनीय पोलीस अनिल तराळ यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आजरा नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, प्रल्हाद गुरव,हनमंत गुरव, सुमन कांबळे , सुदाम गुरव, एकनाथ जाधव , युवराज जाधव, महादेव ढोकरे,सरपंच परिषदेचे राज्य प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, कासार कांडगावचे माजी.सरपंच शिवाजी गुरव, निवृत्ती मिसाळ यांचेसह सर्व श्रमिक संघटना , श्रमिक मुक्तीदल,गुरव समाज संघटना, महामार्ग बाधीत संघटना, मुक्तीसंघर्ष समिती, अंनिस,धरणग्रस्त संघटना,भूमीहीन संघटना, जनसेवा सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, आरदाळ, खानापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

आभार संजय घाटगे यांनी मानले.


सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र च्या प्रदेश सरचिटणीसपदी राजाराम पोतनीस

सरपंच परिषद मुंबई ,महाराष्ट्र या संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी देऊळवाडी (आजरा)गावचे माजी सरपंच राजू पोतनीस यांची नियुक्ती राज्य प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी केली आहे

राज्य परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.त्याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना दिले आहे

पोतनीस हे या संघटनेत गेली ५वर्ष काम करीत आहेत,संघटना बांधणीसाठी त्यांचे योगदान व त्यांनी केलेले उत्कृष्ठ कार्य पाहून त्यांना राज्य समितीवर घेण्यात आले आहे.याकामी प्रदेश उपाध्याय ऍड. विकास जाधव, मारुती मोरे,तालुकाध्यक्ष इंजि.जी.एम.पाटील, संभाजी सरदेसाई,तसेच आजरा तालुक्यातील सर्व सरपंच परिषदेतचे पदाधिकारी व सर्व सरपंच उपसरपंच ग्रा.प.सदस्य यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पोतनीस यांनी सांगितले.

ठाण्याचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड यांचा सत्कार


मुख्यमंत्री सडक ठाणे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि मूळचे आजरा येथील असलेले तुषार अरुण बुरुड यांचा निर्धार फाउंडेशनच्या वतीने रविवारी श्री रवळनाथ मंदिर येथे सत्कार करण्यात आला.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे मुख्यमंत्री सडक विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नुकतीच पदोन्नती झाली आहे.
स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी समीर देशपांडे, सुभाष नलावडे, अरुण बुरुड, सुधीर कुंभार, अडव्होकेट सचिन इंजल, अभिषेक रोडगी, बिरजे आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये चराटी-शिंपी यांचे महाविकासआघाडी समोर कडवे आव्हान राहणार….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शिंदेसेनेतही दोन गट…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!