mrityunjaymahanews
अन्य

तालुका खरेदी – विक्री संघ निवडणूक…

चर्चा थंडावली…

पॅनल रचना झाली

आजरा तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीबरोबरच विरोधी आघाडीचीही पॅनल रचना झाली असून बिनविरोधची चर्चा आता थंडावली असल्याचे स्पष्ट होत आहे. सत्ताधारी आघाडीतून ठराव धारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. जर बिनविरोध निवडणूक करायची असेल तर केवळ तीन जागा देण्याची तयारी सत्ताधारी आघाडीने दर्शवली असून यामध्येही शिंपी व चराटी कुटुंबीयांमधील कोणाचाही समावेश उमेदवारीत राहणार नाही. त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गातील एक जागा व इतर दोन अशा अटी असल्याने बिनविरोधची चर्चा जवळजवळ थंडावली आहे.

सत्ताधाऱ्यांनी पॅनल रचनेमध्ये ठराव धारक उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. तर तब्बल विद्यमान नऊ जणांना यावेळी विश्रांती मिळणार असे दिसू लागले आहे. पॅनल रचना करताना जिल्हा परिषद मतदार संघनिहाय प्रत्येकी सहा व आजरा शहरातून एक जादाची उमेदवारी अशी ही रचना दिसत आहे.

केवळ तीन जागा त्याही अटी शर्ती लादून असल्याने चराटी व शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांनी तडजोड मान्य करू नये असा तगादा नेतेमंडळीकडे लावल्याने व पाच जागांवर ठाम राहण्यासंदर्भात निर्णय घेतल्याने हा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडून स्वीकारला जाण्याची शक्यता मावळली आहे.

यामुळे सोमवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शिंपी-चराटी गटांनेही पॅनल रचना करून ठेवली आहे. आज माघारी नंतर आघाड्यांना मूर्त स्वरूप येईल.पॅनलमध्ये समाविष्ट नसणाऱ्यांना माघार घेण्यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे दोन आघाड्यांमध्ये थेट लढत होईल असे दिसते.

सत्ताधारी आघाडीचे संभाव्य उमेदवार…

सुधीर देसाई(वेळवट्टी),
एम.के.देसाई(सरोळी),
विठ्ठल देसाई(उचंगी),
संभाजी तांबेकर(चिमणे),
राजू होलम(पोळगव),
महादेव हेब्बाळकर(गवसे),                        दौलती पाटील(कोरीवडे),                          महादेव पाटील(धामणे),                             विक्रम देसाई(आजरा),                           राजाराम पाटील(गजरगव),                            सौ. राजलक्ष्मी देसाई(आजरा),                  सौ.छाया पोवार(मडीलगे),.                        मधुकर येलगार(शिरसंगी),                           महेश पाटील(आजरा),                       गणपतराव सांगले(उत्तुर),                .    ..   सुनील देसाई(खोराटवाडी),                 गणपती कांबळे (हाळोली)

बहिरेवाडी येथून इच्छुकांची संख्या जादा असल्याने इच्छुकांनी एकत्र बसून उमेदवार द्यावा असे सुचविण्यात आले आहे. याबाबत एकमत न झाल्यास हा निर्णय आ. हसन मुश्रीफ यांच्यावर अवलंबून राहील. त्याचबरोबर पेरणोली येथून नारायण सावंत आणि उदय पवार यांच्यापैकी एका उमेदवाराला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर वडकशिवाले येथील पांडुरंग दिवटे यांना देखील अंतिम क्षणी संधी देण्याची तयारी सत्ताधारी मंडळींनी ठेवली आहे.

दरम्यान रात्री उशिरा शिंपी- चराटी गटाची पॅनल निश्चिती झाली असून सक्षम असे तोडीस तोड व नेटके पॅनल तयार करण्यात आले असल्याचे समजते. याबाबत अधिक तपशील मिळू शकलेला नाही.

( विशेष सूचना:- सदर बातमी ही चॅनेलच्या स्त्रोतांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

संबंधित पोस्ट

जवाहर पतसंस्थेत सत्‍ताधारी पै. सुलेमानशेठ दिडबाग आघाडीची बाजी…. विरोधकांना धोबीपछाड

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रात्रीस खेळ चाले… पोलीसांकडून चौघांना अटक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मतदानात टोकाची ईर्षा… प्रस्थापितांना धक्का…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!