

गव्याच्या धडकेत महिला जखमी

घाटकरवाडी ता.आजरा येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर गव्याने हल्ला केला. यामध्ये महिला जबर जखमी झाली. उज्वला जानबा यादव ( ४० वर्षे ) असे जखमी महिलेचे नाव आहे. डोंगरवाडी नावाच्या शेतात आज सकाळच्या दरम्यान सदर घटना घडली अशी माहिती परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांनी दिली.
आज सकाळी उज्वला या आपल्या घरासमोरच्या शेतामध्ये भांगलण करत होत्या. यावेळी अचानक समोरून आलेल्या गव्याने त्यांना धडक दिली. धडकेमध्ये त्या जखमी झाल्या. तातडीने त्यांना आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांनी सांगितले.


आजऱ्यात आज रस्सीखेच स्पर्धा

माजी ग्रामविकास मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आज गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता पंडित दीनदयाळ हायस्कूलच्या पटांगणावर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
स्पर्धेमधील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रुपये १५००१/-,१०००१/-,५००१/- रोख व शिल्ड देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त उत्कृष्ट संघास २००१/- चे बक्षीसही देण्यात येणार आहे.



आजऱ्यात आज मेंढ्यांच्या टक्करींचा कार्यक्रम

नगरसेवक अभिषेक जयवंतराव शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवार दिनांक ३० मार्च रोजी दुपारी चार वाजता शिमला मैदान, व्यंकटराव स्कूल आजरा येथे भव्य मेंढ्यांच्या टक्करीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
खुल्या गटामध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे अकरा हजार,सात हजार व पाच हजार रुपये रोख आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. सहा दाती गटातील विजेत्यांना सहा हजार, चार हजार व दोन हजार रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. दोन दाती गटामधून विजयी होणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांना तीन हजार, दोन हजार, एक हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त चषकही देण्यात येणार आहे.
बिन दाती गटाकरता अनुक्रमे २५००/-,१५००/- व १००० रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. आजरा शहरवासियानी या मेंढ्यांच्या टक्करींचा आनंद लुटावा असे आवाहनही करण्यात आले आहे.


🛑 सहाराच्या ठेवीदारांना सुप्रीम कोर्टाने दिली खूशखबर; ५००० कोटी परत करण्याचे आदेश

🔸तुमची गुंतवणूक सहारामध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सहारा समूहाने बाजार नियामक सेबीकडे जमा केलेल्या २४,००० कोटींपैकी ५,००० कोटी रुपये ठेवीदारांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
केंद्र सरकारच्या याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. सहारा समुहाने जमा केलेले पैसे गुंतवणूकदारांमध्ये वितरित करण्यासाठी सेबीची परवानगी मिळावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती.
आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर सुमारे १.१ कोटी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे न्यायालयाचा आदेश…
न्यायमूर्ती एम.आर शाह आणि सी.टी रविकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की 5,000 कोटी रुपये ठेवीदारांमध्ये वितरित केले जावे. या संपूर्ण प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी देखरेख करतील, असे खंडपीठाने सांगितले. सेबीने माहिती दिली होती की त्यांनी सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन, त्याचे प्रमुख सुब्रत रॉय आणि इतरांकडून ६.५७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. ऑप्शनली फुल्ली कन्व्हर्टेबल डिबेंचर (OFCD) जारी करताना नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित प्रकरणामध्ये ही वसुली करण्यात आली आहे.
ओएफसीडी (OFCD) देताना काही नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. त्याच वेळी, सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या जोखमींबद्दल योग्यरित्या माहिती दिली गेली नाही. या उल्लंघनासाठी SEBI ने सहारा प्रमुख आणि इतरांना जून २०२२ मध्ये ६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१२ मध्ये सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन (SIRECL) आणि सहारा हाउसिंग इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेड (SHICL) यांना सहारा समूहाच्या दोन कंपन्यांना गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिल्यानंतर सेबी-सहारा खाती उघडण्यात आली होती.ज्यामध्ये पैसे जमा करण्यात आले होते. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याच खात्यातून रक्कम देण्याची विनंती केली होती.
News Source:- https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq





