

गजरगाव येथे जुगार खेळताना आठ जण ताब्यात
५३ हजारांचा मुद्देमाल जप्त
आजरा तालुक्यातील गजरगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण, शाखा कोल्हापूर यांनी टाकलेल्या छाप्यात जुगार खेळताना आठ जण रंगेहात सापडले असून त्यांच्याकडून सुमारे ५३ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अंमलदार अमर मेघनाथ शिरढोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,
गजरगाव (ता. आजरा) येथील अशोक गणपती खुळे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली.या माहितीवरून सोमवार दिनांक १२ रोजी पोलिसांनी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता त्यामध्ये संजय भिकाजी पाथरवट, बाळू काशिनाथ पाटील, शंकर दत्तात्रय पाथरवट, तानाजी सत्यपा पाथरवट, किशोर श्रीपती पाथरवट, संतोष शंकर कलकुटकी, संतोष राजाराम पाथरवट व अशोक गणपती खुळे (सर्वजण रा. गजरगाव) हे पत्त्यांचा जुगार खेळताना आढळले. यापैकी अशोक खुळे सापडले नाहीत तर पोलिसांनी इतरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह प्रशांत सुरेश कांबळे, विलास पांडुरंग शिरोळकर, महेश सखाराम खोत, संजय गणपती इंगवले, अमर मेघनाथ शिरढोणे यांनी भाग घेतला.

🟠“प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी….’; वाढदिवसानिमित्त लेकीने व्यक्त केल्या भावना*

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय राजकारणातील मोठं नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय कृषीमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलवल्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. शरद पवार यांच्याकडे पाहिलं की अनेकांना संघर्षाची प्रेरणा मिळते. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या खासदार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस असून सोशल मीडियावरुन अनेकांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सुप्रिया सुळेंचाही समावेश असल्याचं यातून दिसून येत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर वडिलांसोबतचा एक फोटो आणि सुंदर कॅप्शन लिहत शुभेच्छा दिल्या आहेत.
“प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी लिहलं आहे.
❓❔❓शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा? निवडणूक आयोगाकडून सुनावणीसाठी पुढची तारीख, शिवसेना नेता म्हणाले…

🔹शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ राज्यातील महाविकासआघाडी सरकारच कोसळलं नाही, तर शिवसेना कोणाची हाही संघर्ष सुरू झाला. शिवसेनेचा धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचं यावर आज (१२ डिसेंबर) मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी माहिती दिली.
अनिल देसाई म्हणाले, “मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर सुनावणी झाली. त्यांनी दोन्ही बाजुंचं म्हणणं ऐकलं. त्यावर आज सुनावणी होईल अशी आमची अपेक्षा होती. मात्र, मुख्य सुनावणीबाबत इतर अनेक कागदपत्रे सादर झाली होती. तसेच आणखी दोन ते तीन अर्जही आले होते. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी सुरू होईल, असं सांगितलं.”
“आज केवळ पाच ते सात मिनिटांचं कामकाज झालं”*
“आज युक्तिवाद होऊ शकला नाही. आज केवळ पाच ते सात मिनिटांचं कामकाज झालं. आम्ही सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. मूळ दस्तावेज दिले त्यांची छाननी करून खरं काय, खोटं काय, चूक काय, बरोबर काय यावर प्रकाशझोत टाकला जाईल, असं आम्हाला आज अपेक्षित होतं,” असं मत अनिल देसाईंनी व्यक्त केलं.
“निवडणूक आयोगाकडे तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर”
“आम्ही निवडणूक आयोगाकडे तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. तसेच प्राथमिक सदस्यांच्या नोंदीची कागदपत्रेही दिली आहेत. या मूळ सुनावणीबरोबर अनेक अर्जही आहेत. त्या सर्व गोष्टींवर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उहापोह होणार आहे,” असंही देसाईंनी नमूद केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला असून ४० आमदार, १२ खासदार आणि अनेक पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी, काही आमदार व खासदार आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. शिंदे व ठाकरे गटाने आपल्या दाव्यांच्या पुष्टय़र्थ लाखो शपथपत्रे, कागदपत्रे आणि आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले सादर केले आहेत.
आयोगाने कागदपत्रे सादर करण्यासाठी दिलेली २३ नोव्हेंबरची मुदत संपल्यावर कागदपत्रांची छाननी केली आहे. यानंतर सुनावणी होऊन युक्तिवाद होतील आणि मग निवडणूक आयोग यावर आपला निर्णय देईल.
NEWS SOURCE:- https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq




