mrityunjaymahanews
अन्य

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू ; आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथील घटना…कोळींद्रे येथून एकजण बेपत्ता.

 

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍यांचा मृत्यू ; आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथील घटना

आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथे झाडाच्या फांद्या तोडत असताना शंकर धाकू माडभगत वय (४१) याना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला .

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास
शंकर माडभगत हे आपल्या गट नं. २२२ मधील शेतातील झाडांच्या फांद्या तोडत होते या वेळी झाडाची फांदी विद्युत प्रवाहित झाल्याने माडभगत यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची वर्दी उत्तम तुकाराम माडभगत यांनी आजरा पोलिसांत दिली आहे पुढिलत तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता शिंदे करीत आहेत त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील व एक  बहीण ,पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

कोळींद्रे येथून एकजण बेपत्ता

कोळींद्रे (ता. आजरा) येथून हणमंत तुकाराम पाटील (वय वर्ष 55) ही व्यक्ती बेपत्ता झाली आहे. याबाबतची वर्दी त्यांची पत्नी सौ. लता  पाटील यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

हणमंत पाटील हे 26 मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घरातून निघून गेले आहेत ते अद्याप परत आले नसल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

 

 

संबंधित पोस्ट

मणिपूर घटनेचा आज-यात मोर्चाद्वारे निषेध…

mrityunjay mahanews

झेप ॲकॅडमीचे मंगळवारी आजरा शाखा उद्घाटन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात राष्ट्रवादीचे मंत्री मुश्रीफ यांच्या फेर्‍या वाढल्या… कार्यकर्ते फुल रिचार्ज… जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मंत्री मुश्रीफ यांना मिळणार संधी…?

mrityunjay mahanews
error: Content is protected !!