mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हा

आजरा तालूक्यातील उत्तूर येथे एकाची आत्महत्या..उत्तूर येथे मारामारी… एक जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

उत्तूर येथे एकाची आत्महत्या

 

उत्तूर ता आजरा येथील रवींद्र यल्लाप्पा कामत ( वय ४२) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत अधिक माहिती अशी की रवींद्र कामत याचा मृतदेह राहत्या घरातील वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये आढळून आला. रवींद्र याने नायलॉनच्या दोरीने गळ्याला गळफास लावून घेऊन सदर आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकत नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास व्हावा अशी वर्दी कृष्णा गोविंद कांबळे (रा. उत्तूर) यांनी पोलिसात दिली आहे. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

खाजगी सावाकारीला कंटाळून सदर कामत् याने आत्महत्या केल्याचीही चर्चा आहे.
…….

.

उत्तूर येथे मारामारी… एक जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

जमिनीच्या हद्दीच्या वादातून उत्तूर (ता. आजरा) येथे झालेल्या मारामारीत संदीप गणपतराव गिलबिले( वय ३९ ) हे जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसांनी सचिन नाईक (रा. बहिरेवाडी) ,शांतादेवी केरबा मोरवाडकर, शिवदत्त केरबा मोरवाडकर, पांडुरंग गोविंद मोरवाडकर, संजय विष्णू बामणे (रा. उत्तूर, ता. आजरा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की गिलबिले व मोरवाडकर परिवारामध्ये जमिनीच्या हद्दीच्या कारणावरून वाद आहे व सदर वाद न्यायप्रविष्ट आहे. दिनांक २२ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संदीप गिलबीले यांच्या घराचे बांधकाम सुरू होते.यावेळी मोरवाडकर यांनी सदर बांधकाम थांबवणे विषयी त्यांना विनंती केली. त्याचवेळी शाब्दिक वाद होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यामध्ये संदीप गिलबिले हे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद संदीप गिलबिले यांनी पोलिसात दिली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

संबंधित पोस्ट

राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक… संभाजी चौकात केले जोडे मारो आंदोलन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शिक्षक भरतीत शासनाची फसवणूक, मुख्याध्यापकासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंद…डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार

mrityunjay mahanews

चोरीच्या सात मोटरसायकलसह आज-यात एकाला घेतले ताब्यात… उत्तूर येथे देशी दारू विक्री करताना एकास अटक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कुडाळनजीक दुचाकी अपघातात कानोली येथील तरुण ठार… एक जखमी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!