

सरंबळवाडी येथे गोठा कोसळून म्हैस मृत्यूमुखी

सरंबळवाडी येथील महादेव कृष्णा मांडेकर यांचें गोठयातील पोटमाळा पडुन एक गाभण म्हैस मयत झाली आहे. सदर गोठ्याचा वरचा भाग कोसळला.त्याखाली बांधलेली म्हैस अडकून मृत्युमुखी पडली. यामध्ये मांडेकर यांचे अंदाजे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे.


आजरा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी …पहिल्याच दणक्यात आजरा मंडलमध्ये अतिवृष्टी
आजरा शहरासह तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच दिवशी आजरा मंडलमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण पावसाची बारीक रिमझिम होती. रात्री मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली.रात्रभर पाऊस कोसळतच होता. जोरदार झालेल्या पावसामुळे शेती कामांना वेग आला आहे. शनिवारी विवाहमुहूर्त असल्यामुळे शनिवारचे विवाहमुहूर्त धरलेल्या मंडळींमध्ये मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंडलनिहाय शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासातील पाऊस
आजरा मंडल 68 मि. मि.
मलिग्रे मंडल 48 मि. मि.
उत्तूर 26 मि.मि.
गवसे 42 मि.मि.
पावसाळ्यानंतर वातावरणात कमालीचा बदल झाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास हिरण्यकेशी नदी प्रवाहित होण्याबरोबरच रामतीर्थ धबधबा दोन दिवसात पूर्ण क्षमतेने कोसळू लागण्याची शक्यता आहे.
आंबोलीतही जोर वाढला
आंबोली येथेही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळेही हिरण्यकेशी नदी प्रवाहीत होण्यास मदत होणार आहे.
तीस हजाराच्या काजूबिया दाभिलवाडी येथून लंपास
दाभिलवाडी (ता. आजरा) येथील नंदकुमार आनंदा वाजे यांच्या शेतातील घरातून तीस हजार रुपये किमतीच्या काजूबिया अज्ञात व्यक्तीने लंपास केल्या. वाजे यांनी सदर बिया गोळा करून विक्रीसाठी ठेवल्या होत्या. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून या बिया लंपास केल्या याबाबतची फिर्याद नंदकुमार वाजे यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

छाया वृत्त :-

श्री हनुमान विकास सेवा संस्था वाटंगी च्या अध्यक्षपदी , अल्बर्ट डिसोजा तर उपाध्यक्षपदी गुंडू सुतार यांची निवड करण्यात आली आहे.
…………..
।
मराठा महासंघाच्या आजरा तालुका महिला अध्यक्षपदी सौ. मीनल यशवंत इंजल यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
……………

गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळू नयेत व त्यांचे मुंबईत पुनर्वसन होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सर्व श्रमिक संघाच्यावतीने आजरा येथे कॉ. अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाद्वारे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
…………………

सोफिया अब्दूलरशीद तकीलदार ही शिवाजी विद्यापीठामध्ये मध्ये परीक्षेमध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.तिचा सत्कारआलम नाईकवाडे, ( नगरसेवक,आजरा) हाजी शैफतल्ली दरवाजकर, अष्कर लष्करे,ऍड. जावेद दिडबाग, हुसेन दरवाजकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
………………




