

आर.टी.कांबळे यांचे निधन
पेरणोली (ता.आजरा) येथील डॉ. झाकीर हुसेन हायस्कुलमधून सेवानिवृत्त झालेले माध्यमिक शिक्षक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.रंगराव तुकाराम कांबळे उर्फ आर.टी.सर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी रात्री निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे, मुलगी,पत्नी,जावई,सुना, नातवंडे असा परिवार आहे.आजरा पंचायत समितीच्या माजी सभापती भारती कांबळे यांचे ते पती होत.
निवडणुकांबाबत संदिग्धता ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर तूर्त भूमिका न घेण्याचा सरकारचा सूर
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात संदिग्धता असल्याने त्याबाबत आताच काही भूमिका न घेता मध्य प्रदेशच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर पुढील दिशा ठरवावी, असा सूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत उमटला.
मध्य प्रदेशच्या निकालानंतर पुढील दिशा
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात संदिग्धता असल्याने त्याबाबत आताच काही भूमिका न घेता मध्य प्रदेशच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर पुढील दिशा ठरवावी, असा सूर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत उमटला. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी शक्य ते सर्व कायदेशीर मार्ग वापरण्याचेही या बैठकीत ठरले.
राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दोन आठवडय़ात सुरु करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ज्येष्ठ मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया दोन आठवडय़ात सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी दोन आठवडय़ांत निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्या लागणार असे नव्हे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदार यादी आणि आचारसंहिता ही निवडणुकीची प्रक्रिया सर्वच ठिकाणी प्रलंबित आहे. राज्य सरकारचा कायदा रद्द किंवा स्थगित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात कसलाही उल्लेख नाही. त्यामुळे राज्य सरकारचा कायदा तूर्त अबाधित आहे. मात्र १० मार्चला असलेली प्रक्रिया पुढे नेण्याच्या उल्लेखामुळे कायदा होण्याआधी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपलेली होती त्या ठिकाणी कायदा लागू होणार नाही व ११ मार्चनंतर मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्य सरकारचा कायदा लागू होईल असा त्याचा अर्थ निघतो. मात्र त्याबाबत संदिग्धता असल्याची भूमिका काही अधिकाऱ्यांनी मांडली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत. त्यासाठी शक्य ते सर्व कायदेशीर मार्ग चोखाळावेत, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. त्याला सर्वाना दुजोरा दिला.
अनेक प्रश्न..
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश स्पष्ट नसल्याने संभ्रम असल्याचा अभिप्राय महाधिवक्ता कुंभकोणी यांनी दिला. त्यावर राज्य सरकारने केलेल्या कायद्याचे काय, त्याची अंमलबजावणी होणार की नाही, होणार तर कुठे होणार, प्रभाग रचना कोण करणार, असे प्रश्न मंत्र्यांनी उपस्थित केले.
आदेश स्पष्ट होण्याची गरज..
न्यायालयाच्या आदेशात स्पष्टीकरणाला वाव असल्याने राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे या आदेशाबाबत मुद्देसूद स्पष्टीकरण मागायला हवे, असे मत या बैठकीत मांडण्यात आले.
सरकारपुढे आव्हान..
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण ठेवायचे असल्यास शास्त्रीय सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डेटा) तयार करणे आणि कायदेशीर तरतूद करणे, ही प्रक्रिया दोन महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, असे संकेत राज्य निवडणूक आयोगातील उच्चपदस्थांनी दिले असून प्रभाग आरक्षणाचा टप्पा येईपर्यंत दोन महिन्यांचा अवधी आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून ओबीसींना आरक्षण द्यावे, त्याशिवाय निवडणुका घेवू नयेत, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

आज-यात छत्रपती शाहूंना अभिवादन…
‘व्यंकटराव’प्रशाला परिवार
मराठा महासंघ
आजरा महाविद्यालय
देवर्डे प्राथमिक विद्यामंदिर व रवळनाथ हायस्कुल

दर्गा गल्ली आजरा

………
आजरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात प्रकाश सापळयांद्वारे हुमणी किडीचे प्रात्यक्षिक …
आजरा साखर कारखाना कार्यक्षेत्रात जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कमी होत असुन उसाचे सरासरी उत्पादन घटत आहे. ऊस पीक हे वर्षभर शेतात राहते, उसाचा खोडवा ही एक दोन वेळा घेतला जातो. अशा अनेक कारणामुळे किडींच्या संख्येत आणि त्यांच्या प्रसारात वाढ होवून प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत आहे.
एप्रिल व मे महिन्याचा कालावधी हुमणीच्या प्रजननाचा असुन त्यांना याच कालावधीमध्ये पकडून त्यांची संख्या कमी करणे प्रकाश सापळ्यांच्या माध्यमातुन शक्य आहे.
परिणामी उसाच्या नुकसानी पासुन वाचण्यासाठी एकात्मिक पध्दतीने प्रकाश सापळे सर्व हुमणीग्रस्त उस क्षेत्रातील शेतक-यांनी एकाच वेळी लावणे गरजेचे आहे.यासाठी कारखान्याच्या उस विकास विभागामार्फत कायम स्वरूपी गटनिहाय हुमणी ग्रस्त प्लॉटची पाहणी करून शेतक-यांना प्रकाश सापळे लावणेबाबत जनजागृती केली जात आहे त्यासाठी कारखान्याच्या प्रत्येक गट ऑफीसच्या क्षेत्रातील हुमणी ग्रस्त शेतक-यांना प्रकाश सापळयाचे प्रात्यक्षिक कारखान्यामार्फत केले जात आहे. याप्रमाणे आजपर्यंत पेरणोली, भादवण, देवर्डे व किटवडे या कारखाना कार्यक्षेत्रातील गावांमध्ये प्रकाश सापळे शेतक-यांना मार्गदर्शन देवून लावले आहेत आणि त्याला यशही येत आहे. तरी नदीकाठच्या कार्यक्षेत्रात असे हुमणी ग्रस्त प्लॉट आढळलेस आपले जवळच्या शेती सेंटरकडे याबाबत नोंद देवून प्रकाश सापळयांद्वारे हुमणी किडीचे एकात्मीक व्यवस्थापन करण्याचे नियोजन कारखान्यामार्फत मार्गदर्शन करून केले जात आहे त्यानुसार कार्यक्षेत्रातील शेतक-यांनी हुमणी किडीचा प्रार्दुभाव रोखणेसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा व त्याबाबतचे मार्गदशन कारखान्याचे उस विकास विभागामार्फत केले जात असलेबाबतची माहिती चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे यांनी दिली,

हाळोली येथील वैभव गुरव परिवाराने मुलीचा वाढदिवस केला अनोख्या पद्धतीने…

वैभव गुरव, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मेंढोली यांची मुलगी कुमारी राजकन्या उर्फ एकादशी वैभव गुरव हिच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसमध्ये पैशाची उधळपट्टी न करता सदर वाढदिवसाला प्राथमिक शाळा श्री गणेश विद्या मंदिर हाळोली या शाळेला ग्रंथालय कपाट व पुस्तके हे रक्कम रुपये 15000/-किमतीची देऊन वाढदिवस प्राथमिक शाळा या ठिकाणी साजरा केला.
ग्रंथालय कपाट व पुस्तके आजरा तालुक्याचे तहसीलदार विकास अहिर व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी.डी. वाघ साहेब यांच्या हस्ते शाळेला प्रदान करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री पाटील, सहशिक्षिका सुरेखा नाईक, वैभव गुरव ग्रामसेवक संपूर्ण परिवार तसेच गावातील बंधू-भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार यांनी गुरव ग्रामसेवक यांनी मुलीचा पहिला वाढदिवस हा कोरोना काळात जे परप्रांतीय मजूर यांच्या अन्नदानाचे( शिवभोजन) एक हजार परप्रांतीय मजुरांना जेवण देऊन अन्नदान केले याशिवाय त्यांनी दुसरा वाढदिवस देखील कोरोनाचे संकट असल्याने घरच्या घरी साध्या पद्धतीने केला आणि आज तिसरा वाढदिवसानिमित्त शाळेला ग्रंथालय कपाट व पुस्तके देऊन हे ज्ञानदानाचे काम केलेले आहे हे कौतुकास्पद आहे असे उद्गार काढले.






