कै. केदारी रेडेकर यांचा आज स्मृतिदिन
विविध कार्यक्रमांचे आयोजन.
पेद्रेवाडी (ता. आजरा) येथील मुंबईस्थित शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक कै. केदारी रेडेकर यांचा आज २४ वा स्मृतीदिन असून या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हातात बैल धरून पळवणेच्या खूल्या स्पर्धा पाच किलोमीटर अंतराची जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अनिरुद्ध केदारी रेडेकर व ‘गोकुळ’च्या संचालिका श्रीमती अंजनाताई केदारी रेडेकर यांनी दिली.पंचायत समिती सभा
कुमारभवनच्या जागेतील पार्किंगबाबत पंचायत समिती सभेत आक्षेप :अधिकारी धारेवर …रिंडीगप्रमाणे बिल देण्याची मागणीआजरा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुमारभवन या मराठी शाळेच्या जागेत आजरा नगरपंचायतीने अतिक्रमण करुन पार्किंग केले आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थीनी पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. हे चुकीचे असून नगरपंचायतीने तातडीने पार्किंग हटवावे. याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली अशी विचारणा करून सभापती उदयराज पवार यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
वीज वितरण कंपनीने कृषी पंपाची रिडिंग प्रमाणे बिल दयावीत बिल वाढवून येत असल्यामुळे अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकरी अडचणीत आले आहेत. याकडे शिरीष देसाई यांनी लक्ष वेधून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. उचंगी प्रकल्पग्रस्तांना चितळे ग्रामपंचायतीचे गायरान देतांना प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे अशीही सूचना बैठकीत करण्यात आली.
शिक्षण विस्तार अधिकारी सुनित यांनी शिक्षण विभागाचा अहवाल मांडला. या वेळी हस्तक्षेप करत सभापती श्री. पवार म्हणाले कुमारभवन शाळेच्या जागेत नगरपंचायतीने अतिक्रमण करून पार्किंग केले आहे. हे बेकायदेशीर असून याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघटनेने पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. त्याबाबत शिक्षण विभागाने काय कारवाई केली. यावर जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केल्याचे श्री. चंद्रमणी यांनी सांगताच श्री. पवार म्हणाले, केवळ पत्रव्यवहार करून काय साध्य करणार आहात. ही जागा तुमची असताना त्यांनी तुम्हाला न विचारला कसे काय अतिक्रमण केले, याला जबाबदार तुम्ही राहणार आहात. त्यामुळे तुम्ही हे अतिक्रमण हटवून जागे भोवती संरक्षक कुंपण करावे व ही जागा मुलाना खेळण्यासाठी खुली करावी. शहरातील जिल्हा परिषदेच्या जागांची माहीती घेवून ती पंचायत समितीकडे दोन दिवसात सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. शिरीष देसाई यांनी कृषी पंपाच्या बिलाबाबत वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता कलगुटगी यांच्याकडे विचारणा केली. बिले वाढून आली आहेत. त्याची तातडीने दुरुस्ती करावी. शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असल्याचे सांगीतले. बीज वितरणने बिल दुरुस्तीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून येणारी बिले दुरुस्त करून देणार असल्याचे सांगीतले.
बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला .यावेळी सर्व सदस्य व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
निपाणी येथील अपघातात आजऱ्यातील तरुण जखमी
निपाणी- मुरगुड रोडवरील देवचंद महाविद्यालय नजीक निपाणीहून धामणे ता. आजराकडे जाणारी दुचाकी व गायकवाडी येथून निपाणीकडे येणारी दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन एक ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. आकाश सुरेश मातीवडर (वय २६ रा. जुने संभाजीनगर, निपाणी) हा युवक जागीच ठार झाला. तर कृष्णा पांडुरंग मुगळे (वय 40 रा. धामणे ता. आजरा) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

रखमाबाई शिंदे यांचे निधन

रवळनाथ कॉलनी आजरा येथील रखमाबाई गोपाळ शिंदे ( वय ७५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आजरा तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे यांच्या त्या आई होत.









