mrityunjaymahanews
अन्य

तीन महाविद्यालयीन तरुणींवर गव्याचा हल्ला.. दोघी जखमी .. आजरा तालुक्यातील घटना

तीन महाविद्यालयीन तरुणींवर पाठलाग करुन गव्याचा हल्ला… दोघी जखमी.

आजरा येथून सोहाळे (ता. आजरा) या आपल्या गावी परत असणाऱ्या तीन महाविद्यालयीन तरुणींवर गव्याने पाठलाग करुन दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. यामध्ये दोन तरुणी जखमी झाल्या आहेत. जखमींवर आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कु. शर्वरी सुनील कोंडुस्कर, सानिका मारुती कोंडुसकर व स्नेहल सतीश कोंडुसकर या तीन महाविद्यालयीन तरुणी आजरा येथील व्यंकटराव कनिष्ठ महाविद्यालयातून सोहाळे येथे घरी परतत होत्या. दरम्यान कळेकरची रागी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेताजवळ बसलेल्या एका गव्याने अचानक उठून त्यांच्या दिशेने धाव घेतली. तेथून तिघीनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु मागुन गव्याने जोरदार धडक दिल्याने शर्वरी कोंडुसकर व सानिका कोंडुसकर या जखमी झाल्या. गवा तसाच पुढे निघून गेला. अद्यपही गवा या परिसरात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.  सदरचे वृत्त समजताच सोहाळे ग्रामस्थांनी व वन विभागाचे बालेश न्हावी, कृष्णा डेळेकर यांनी घटनास्थळी  व व आजरा ग्रामीण रूग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. जखमींवर आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी वन्य प्राण्यांकडून हल्ला

सोहाळे येथे कालच वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दोघे जखमी झाले होते.या घटनेनंतर लागलीच आज पुन्हा एक वेळ गव्याकडून हल्ला झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

संबंधित पोस्ट

तालुका खरेदी – विक्री संघ निवडणूक…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!