आजरा आंबोली मार्गावर वेळवट्टी नजीक बर्निंग कारचा थरार… धावती कार आगीच्या भक्ष्यस्थानी

गोव्याहून जालन्याच्या दिशेने जाताना वेळवट्टी येथे सकाळी चार वाजण्याच्या सुमारास रामप्रसाद नरहरी कावळे यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या या आगीमध्ये रस्त्याशेजारील एक झाडही जळून खाक झाले. या गाडीतून चौघेजण जालन्याच्या दिशेने आजरा मार्गे चालले होते.xuv ५०० या मॉडेलची ही गाडी असून अचानक लागलेल्या आगीमुळे गाडीतील चौघेही बाहेर पडल्याने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. गाडी मात्र जळून खाक झाली आहे. आजरा पोलीस याबाबतची अधिक माहिती घेत आहेत.
( सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.)


