गजरगाव बंधाऱ्यावरुन मोटरसायकल कोसळून एक जण जागीच ठार : एक जखमी
अर्जुनवाडी (ता.गडहिंग्लज )येथील श्रीधर रामचंद्र मंडलिक या २८ वर्षीय तरुणाचे गजरगाव बंधार्यावरून मोटरसायकल खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर त्याचा मित्र आकाश राजाराम सतबाळे हा जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीधर मंडलिक व आकाश राजाराम सतबाळे हे दोघेही इंचनाळ येथे राहणा-या त्यांच्या मावशी वआत्याला भेटण्यासाठी जात होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गजरगाव बंधा-यावर गाडी आली असता तोल जाऊन गाडी हिरण्यकेशी नदीपात्राशेजारील जागेत कोसळली. यामध्ये श्रीधर मंडलिक याला डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच मयत झाला तर आकाश सपकाळे हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी आजरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.
महत्वाचे…
आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत किटवडे येथील पाणी प्रकल्पाला विरोध….





